mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५       

कत्तलीसाठी आणलेली वासरे गोशाळेत रवाना… जानकीताईचा पुढाकार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      १० एप्रिल २०२६ रोजी विनापरवाना कत्तलीसाठी नेण्यात येणारी नुकतीच जन्मलेली पाच वासरे पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यादिवशी कोल्हापूर येथे पांजरपोळ व इतर गोशाळेत त्वरित जागा उपलब्ध होत न्हवती. वेळ न घालवता सौ. जानकीताई सातोसकर- मडगांवकर उपाध्यक्ष भाजपा पुणे शहर, सेविका राष्ट्र सेवा समिती यांनी प्रथम पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत यांच्याशी संपर्क साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्याशी संपर्क साधला. रीतसर वासरे जानकीताईच्या ताब्यात देण्यात आली.

     वासरांना दोन दिवस सुखरूप स्थळी ठेवण्यात आले त्यानंतर ती गोशाळेत सोडण्यात आली. या सर्व प्रक्रियेचा खर्च जानकीताई सातोसकर यांच्या ‘ दीपस्तंभ फौंडेशन ‘ तर्फे करण्यात आला. व् युवा कार्यकर्ते अभिषेक रोडगी यांनीही एकवेळ दुध स्व:खर्चाने पाठवले. लाटगावचे उपसरपंच संदेश दळवी यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेतला. वासरे सुखरूप कागल येथे गोशाळेत सुपूर्द करण्यात आली. यासाठी बजरंग दल, आजराचे राहुल नेवरेकर, स्वप्निल सावंत, यांचे सहकार्य लाभले.

    लवकरच आजऱ्यात गो पालन सुरुवात केली जाणार आहे. गोहत्या मुक्त हिंदुस्थान घडविण्यासाठी ‘गोरक्षणार्थ धर्मकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी जानकीताई मडगावकर-सातोसकर यांनी केले.

जोतिबा यात्रेत प्रचंड उत्साह…
लाखो भाविकांची उपस्थिती…

          कोल्हापूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दख्खनचा राजा श्री जोतिबा चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. गुलालाची उधळण व चांगभलं च्या गजरात मोठ्या उत्साहात सदर कार्यक्रम झाले.

      पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. महापूजेनंतर देवाची सरदारी रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई,आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे जोतिबा मंदिर व्यवस्थापक धैर्यशीला तिवले, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.

     या यात्रेवेळी मानाच्या सासनकाठीचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कांही काळ सासनकाठी नाचवण्याचा आनंद घेतला.

     या दरम्यान त्यांनी श्री जोतिबा देवाचे दर्शन घेऊन राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्यसंपन्न, सुखी व आनंदी राहू दे… अशी प्रार्थना केली.सासन काट्यांच्या मिरवणुकीत १०८ मानाचा सासन काट्या सहभागी झाल्या होत्या.

     यात्रेसाठी सुमारे १३०० पोलिसांचा व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती शिवरायांच्या मुर्ती  लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू…
तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार असून या सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींच्या बैठका दणक्यात सुरू आहेत. नेटक्या नियोजनासाठी तरुण मंडळी सरसावली आहेत.

       आजरा शहरातील विविध मंडळांच्या बैठकांचे सत्र सुरू असून कार्यक्रम देखणा करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याकरीता महिला वर्गाकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला वर्गाकडून सादर केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सरावही सुरू करण्यात आला आहे.

      सदर कार्यक्रम अधिक देखण्या पद्धतीने साजरा होण्यासाठी आर्थिक निधीची गरज असून इच्छुक दात्यांनी आपला निधी तातडीने जमा करावा जेणेकरून पुढील कार्यक्रमाचे नियोजन करणे सोयीचे होईल असे आवाहनही करण्यात आले आहे.

आजऱ्यात आज दत्त भेळ सेंटरचे उद्घाटन

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      इचलकरंजी येथील सुप्रसिद्ध श्रीदत्त ओली भेळ चे आजरा येथे शाखा उद्घाटन आज रविवार दिनांक १३ रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती सौ. नेहा पेंडसे यांनी दिली.

      या सेंटरच्या माध्यमातून सुमारे ५० प्रकारच्या विविध भेळ, नमकीन, चाट, मोमोज, पाणीपुरी, रगडापुरी, व्हेज पुलाव, व्हेज बर्गर, कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, स्प्रिंग रोल, शेवपुरी, पाणीपुरी, साबुदाणा खिचडी आदी पदार्थ उपलब्ध होणार आहेत.

       आजरा बाजारपेठेतील महागावकर कॉम्प्लेक्स येथे सदर सेंटर असून अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते सदर उद्घाटन होणार आहे.

डॉ. अनिल देशपांडे यांचा आजरा सूतगिरणी मार्फत सत्कार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आण्णा भाऊ आजरा सूतगिरणीचे व्हा.चेअरमन डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांची नुकतीच सहकार भारती आजरा तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल अशोक आण्णा चराटी यांचे हस्ते व सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा का. चराटी यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.

      याप्रसंगी डॉ. अनिल देशपांडे म्हणाले, सहकार भारती ही संस्था सहकारातील सर्व संस्थांची देशपातळीवरील संघटना आहे. जिचे मुख्य कार्य हे सहकारातील संस्थाना त्यांच्या कामकाजातील अडचणी दूर करणेसाठी तांत्रिक आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करणे व त्यांचे पदाधिकारी अधिकारी यांना सतत मार्गदर्शन करत राहणे हे आहे. तरुण महिला वर्ग बचत गट भूमिहीन यांच्यासाठी विशेष काम करण्यासाठी या माध्यमातून आपण प्रयत्नशील राहणार आहोत.

      यावेळी संस्थेचे संचालक जयसिंग देसाई, अविनाश सोनटक्के, नारायण मुरूकटे, जी.एम. पाटील, राजु पोतनीस, डॉ. संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, मालुताई शेवाळे, मनिषा कुरूणकर अनिकेत चराटी, हसन शेख यांचेसह जनरल मॅनेजर अमोघ वाघ, दत्तात्रय दोरूगडे, सचिन सटाले उपस्थित होते.

आम.सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी मार्फत फळे वाटप

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      विधान परिषदेचे गटनेते व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ.सतेज उर्फ बंटी डि.पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ मृत्युंजय ‘कार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

       यावेळी संजयभाऊ सावंत, रविंद्र भाटले, विक्रम देसाई, नौशाद बुड्डेखान, निसार लाडजी, बाकीव खेडेकर, आप्पासाहेब पाटील, रवी तळेवाडीकर, डॉ. सचीन शिंदे, डॉ. सागर तिऊरवाडकर, महादेव सुतार,नामदेव शिवणगेकर इत्यादी मंडळी उपस्थित होती.

रामतीर्थ येथे हनुमान जयंती उत्साहात...

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रामतीर्थ येथे पिंपळ्या मारुती जवळ श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

      जयंतीनिमित्त सकाळच्या सत्रात अभिषेक,जन्मकाळ आरती व मंत्र पुष्प,भजन व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले.दुपारी महाप्रसादाच्या झालेल्या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

      येथील पिंपळ्या मारुती मंदिर परिसराला फुलांची सजावट करण्यात आली होती.

 

संबंधित पोस्ट

आजरा तालुक्यात सरासरी ७९.५७ टक्के मतदान

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पे द्रेवाडीच्या सरपंच सौ. लता रेडेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!