गुरुवार दि.१२ फेब्रुवारी २०२६

आजरा तालुका सेवानिवृत प्राथ . शिक्षक संघटनेचे अधिवेशन उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका प्राथ. शिक्षक संघटनेचे ३१ वे वार्षिक अधिवेशन आनंदराव नादवडेकर पतसंस्था आजरा येथे उत्साहात पार पडले . अध्यक्षस्थानी जेष्ठ अध्यापक श्री आप्पासाहेब जाधव होते .
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर श्री. संभाजी पाटील यांनी मान्यवरांना श्रध्दांजलीचा ठराव मांडला .
संघटनेचे उपाध्यक्ष बळवंत शिंत्रे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.अधिवेशनाच्या निमित्ताने ७५ वर्षे पुर्ण झालेल्या २५ सेवानिवृत गुरुजनांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . त्याचबरोबर अहवाल सालात सेवानिवृत झालेल्या १६ शिक्षकांचे संघटनेत शाल , पुष्य देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री विष्णु मोरे सर यांनी गेल्या दोन वर्षापासुन संघटनेने सेवानिवृत शिक्षकांच्यासाठी केलेल्या विविध कामांचा व भविष्यात संघटनेने योजलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला .
संघटनेचे सचिव श्री.जथ जनार्दन पाटील यांनी तालुक्यातील ३२८ सेवानिवृत्त सभासदांची सेवा उपदान व अंशीराशीकरण , गट विमा , वेतन वाढ प्रस्ताव ,अपंग निवृती वेतन कुटुंब निवृती वेतन , सेवा पुस्तक नामावली , हयातीचे दाखले , याबाबत सखोल मार्गदर्शन व सुचना मांडल्या यावेळी श्री. शिवाजी गालबिले ,श्री. जनार्दन निऊंगरे , श्री. श्रीपती पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी श्री शिवाजी बिरजे यांनी अभिनंदन ठराव व विरुगंळा केंद्र , शिष्यववृती विद्यार्थी गुणगौरव , संघटना देणगी , विविध सहलींचे आयोजन , शिक्षक भवन उभारणी याबाबत विविध ठराव करण्यात आले.
अधिवेशनाला माजी अध्यक्ष श्री.मनोहर नाईक , श्री. गंगाराम पन्हाळकर , श्रीपती नाईक , गोविंद जाधव भगवान पवार , बाळकृष्ण गुरव तसेच कार्यकारी मंडळ सदस्य सुभाष केसरकर , मारुती वरेकर , म्हंकाळी चौगले , प्रकाश देऊस्कर , बाळासाहेब पाटील , रघुनाथ येसणे , भिमराव कोरवी , बंडु पाटील , पांडुरंग आजगेकर , तुकाराम तर्डेकर , तानाजी चव्हाण , जयसिंग पाटील , दशरथ तेजम , निवृती मुरकुटे , तुकाराम संकपाळ , विनायक अमणगी , सौ सुचिता लाड , सिंधु माळवकर मालती धुरे , मंगला नादवडेकर , प्रेमा साठे , सौ. कमल पाटील सौ शीला देसाई व सेवानिवृत शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. मारुती डेळेकर यांनी केले व आभार श्री. संजय मोहिते यांनी मानले.

धामणे घाटातील धोकादायक वळण ठरतंय जीवघेणं

उत्तूर : मंदार हळवणकर
उत्तूरहून जाताना धामणे घाटातील सुरुवातीच्या तीव्र वळणावर संरक्षण कठडा उभारण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी अत्यंत धोकादायक वळण असून बाजूलाच खोल उतार आहे. सध्या येथे कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या परिसरात शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. बांधकामासाठी ये-जा करणारी वाहने, तसेच नियमित प्रवासी यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यातच ऊस वाहतुकीनंतर परतणारे रिकामे ट्रॅक्टरही या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर धावतात.
संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे जाणारा मोठा कर्मचारी वर्गही याच मार्गाचा वापर करतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून या धोकादायक वळणावर मजबूत संरक्षण कठडा उभारण्याबाबत शासनाचे लक्ष वेधले जाणे आवश्यक आहे.
यापूर्वी देखील येथे मोठे अपघात झाल्याने वेळीच उपाययोजना झाल्यास संभाव्य दुर्घटना टाळता येतील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

कोरीवडे येथील चाळोबा यात्रा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोरीवडे (ता. आजरा) येथील श्री. चाळोबादेवाची यात्रा पारंपारिक पध्दतीने व उत्साहात पार पडली.
श्री. चाळोबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पेरणोली पंचक्रोशीसह आजरा, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील नातेवाईक, मित्र परिवार व भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर घरोघरी मांसाहरी व शाकाहारी जेवणाचा कार्यक्रम झाला. यात्रा समितीन नेटके नियोजन केले आहे.
आजऱ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर कोरीवडे हे छोटे गाव आहे. या गावात महादेव मंदिरालगत श्री चाळोबाचे मंदिर आहे. यापूर्वी श्री. चाळोबादेव मंदिराची यात्रा ही तब्बल चाळीस वर्षानंतर सन २००१ मध्ये झाली. त्यानंतर दर पाच वर्षानी यात्रा होत आहे. यंदा श्री. चाळोबादेवाची यात्रा आठ वर्षांनी होत आहे. यानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेनिमित्त माहेरवाशिणी गावात दाखल झालेल्या आहेत. मंगळवार (ता. १०) श्री, चाळोबादेवाच्या मंदिर धार्मिक विधी पूजा झाली. मंदिरात रात्री काकडा आरती झाली. मानकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य यात्रेच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. जागर कार्यक्रम झाला. या वेळी शाहीरी कार्यक्रम झाला. बुधवार (ता. ११) पहाटेही श्री. चाळोबा मंदिरात काकड आरती व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
ग्रामदैवत महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, लिंगनाथ मंदिर आणि मरगुबाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारनंतर स्नेहभोजनाचे कार्यक्रम झाले. यात्रेनिमित्त मेवामिठाई, आईस्क्रीम, खेळण्याची दुकाने मांडण्यात आली होती.

NSUI ने दिला वृद्ध आजोबांना, अंधारात प्रकाशाचा सहारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील डोंगरवाडी या जंगलातील गावात गुंडू शेळे हे ९७ वर्षीय वृद्ध एकटेच राहतात, जंगली भागात घर असल्याने त्यांच्या घरी विजेची व्यवस्था नव्हती. तेलाचा छोटासा दिवा काही साहित्य, सोबत ४ जनावरे इतकाच त्यांचा प्रपंच, सागर मांडवकर व बाळकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी ह्या आजोबांची NSUI टीमशी भेट झाली होती. त्यावेळी आजोबांची वयोमानामुळे दृष्टी कमी झाली असुन लाईट अभावी समस्या उद्भवत असल्याचे या टीमच्या लक्षात आले होते.यावेळी त्यांना ४ बल्ब लागतील असे छोटे सोलर पॅनल लावून देऊ असे आश्वासन देण्यात आले होते.
काल सर्व टीमने आजोबांच्या घरी जाऊन सोलर पॅनल व लाईट बसवून दिली, घरी लाईटचे लागलेले बल्ब बघून आजोबांचा चेहऱ्यावरचा आनंद मनाला भावणारा होता.
यावेळी NSUI चे अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ,अथर्व चौगुले,निपुन चौगुले,प्रणव पाटील,गौरव कांबळे,सागर मांडवकर,समर्थ जगताप उपस्थित होते.
सदर उपक्रमास मा.सतेज पाटील साहेब,मा.ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगण्यात आले.

छायावृत्त

गजरगाव ता. आजरा येथील सरिता नेताजी गुरव ही मुलगी बीएसएफ मध्ये भरती झाल्याबद्दल व प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर ग्रामस्थांकडून तिची मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. बीएसएफ मध्ये भरती होणारी ती गजरगाव येथील पहिलीच कन्या आहे.
फोटो क्लिक

अखेर गांधीनगर मार्गावरील परोली फाट्यावर कोसळलेल्या अवस्थेत असणारा वटवृक्ष अज्ञाताने पेटवल्याची घटना काल घडली. पूर्ण वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.


