

एरंडोळ येथील पुन्हा एका तरुणाची आत्महत्या…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दहा दिवसापूर्वी स्वागत भिवा पाटील या विवाहित तरुणाने भोसरी/ पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आज सिद्धेश अरविंद परीट या सतरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने यरंडोळ परिसर हादरुन गेला आहे.
सिद्धेश हा आजरा येथील एका शैक्षणिक संस्थेत अकरावीच्या वर्गात शिकत होता. दुपारी पेपर देऊन घरी परतल्यानंतर त्याने घराच्या माडीवर दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सिद्धेश याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पोलीस एरंडोळ येथे घटनास्थळी रवाना झाले असून पुढील माहिती घेत आहेत .अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.


