शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५


सौम्या विनयन यांची पेरणोली व दाभिल परिसरातील घनसाळ शेतीस भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संशोधिका डॉ.सौम्या विनयन सहकारी प्रमिका शहा यांनी आजरा तालुक्याचा जीआय मानांकन प्राप्त आजरा घनसाळ अभ्यास दौरा केला. त्यांनी पेरणोली, दाभिल येथील घनसाळ शेतीला भेट दिली. उत्पादक शेतकरी, विक्रेते यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर आजरा शेतकरी उत्पादक कंपनी, आजरा राईस क्लस्टरलाही भेट दिली.
आजरा घनसाळला सन २०१५ मध्ये भागोलीक मानांकन (जीआय) मिळाला आहे. त्यानंतर येथील घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात झालेले आर्थिक व सामाजिक बदलाची त्यांनी माहीती घेतली. रोजगाराच्या संधीबाबतही त्यांनी विक्रेत्याशी चर्चा केली. पेरणोली (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीमधे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रियांका जाधव होत्या. सौ. जाधव यांनी सौम्या विनियन व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. रणजित कालेकर यांनी पेरणोली व परिसरातील घनसाळ उत्पादक, क्षेत्र याचा आढावा घेतला. राजेंद्र सावंत, अमर पवार यांनी घनसाळबाबत माहती दिली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, सहाय्यक
परिसरातील घनसाळ उत्पादक, क्षेत्र याचा आढावा घेतला. राजेंद्र सावंत, अमर पवार यांनी घनसाळबाबत माहती दिली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, गटविकास अधिकान संतोष नागटिळक, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, कृषी विस्तार अधिकारी श्री. मासाळ, उदसिंह सरदेसाई, मंगेश पोतनीस, पी. जी. पाटील, वैभव जा दाळ, प्रदिप पारपोलकर, अमित यमगेकर, सचिन निळकंठ, ग्रामसेविका अमिषा देवर्डेकर यांनी आभार मानले.
दाभिल येथील घनसाळ शेतीला श्रीमती सौम्या विनयन यांनी भेट दिली. दाभिलचे सरपंच युवराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कमलाकर पाटील नामदेव पाटील, बंडू नेवगे यांनी घनसाळची लागवडीची पध्दत, लागवडीपासूनची कापणी पर्यंतची जोपासना, काढणी व्यवस्थापन, काढणी पश्चात विक्री व्यवस्थापन, मिळणारे उत्पन्न याबाबत माहीती घेतली.
येथील आजरा घनसाळ राईस मिल क्लस्टरमधे अध्यक्ष महादेव पोवार यांनी श्रीमती विनयन यांचे स्वागत केले. त्यांनी क्लस्टरबाबत माहीती दिली या वेळी नचिकेत भद्रापुर, शिवाजी पाटील उपस्थित होते. आजरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांनी घनसाळचा इतिहास व त्यासाठी केलेले प्रयत्न याबाबत माहीती दिली. या वेळी संभाजी इंजल, ए. के. पावले, हिंदुराव कालेकर, निवृत्ती कांबळे आदी उपस्थित होते.

‘ स्वामी विवेकानंद’ एकपात्री प्रयोगाचे डॉ . शिंदे यांनी केले सादरीकरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षण तपस्वी डॉ .जे. पी. नाईक पतसंस्था व चैतन्य सृजन सेवा संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रा. नवनाथ शिंदे यांचे मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद हे एकपात्री प्रयोगाचे चैतन्य सांस्कृतिक सभागृहात यशस्वीपणे सादरीकरण झाले. या एकपात्री प्रयोगामधून प्रश्नोत्तराच्या रूपाने स्वामी विवेकानंद यांचे जीवनाचे पैलू अगदी सरळ व सोप्या भाषेत उलगडत आजच्या सामाजिक परिस्थितीचे विदारक दृश्य प्रभाविपणे मांडत त्यांच्या क्रांतिकारी विचारामधून माणूस बनण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे काम या एकपात्री सादरीकरणातून करण्यात आल्याचे दिसून आले.
यावेळी डॉ. शिवशंकर उपासे, बळवंत शिंत्रे, चंद्रशेखर बटकडली, भरत बुरुड, नागेश भाटी, सौ. पुष्पलता घोळसे,मीना शिरगुप्पे, संतोष जाधव, जीवन शेवाळे, शिवाजी सम्राट, परशुराम कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते.
शिवाजी बिद्रे यांनी आभार मानले.

निधन वार्ता
पुंडलिक पाटील

गवसे ता. आजरा येथील पुंडलिक लिंगू पाटील यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी लिंगू पाटील यांचे ते वडील होत.

स्व. रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहतारण संस्थेची निवडणुक बिनविरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्व. रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहतारण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक (सन-२०२५-२०३०) बिनविरोध पार पडली. या कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रमोद फडणीस यांनी काम पाहिले व श्री. सुजयकुमार येजरे सहाय्यक निबंधक आजरा तालुका यांचे सहकार्य लाभले. यानंतर संस्थेच्या चेअरमनपदी श्री. इंद्रजित रावसाहेब देसाई यांचे नाव श्री. श्रीधर गोरे यांनी सुचविले त्यास श्री. सदानंद देसाई यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदी श्री. अवधूत यशवंत शिंदे यांचे नाव श्री. श्रीकांत कळेकर यांनी सुचविले त्यास श्री. शिवाजी गुरव यांनी अनुमोदन दिले. यावेळी श्री. सुजयकुमार येजरे सहाय्यक निबंधक, आजरा तालुका यांचे हस्ते चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीची पत्रे देऊन सत्कार करणेत आला, यावेळी सर्व संचालक श्री. श्रीधर गोरे, श्री. श्रीकांत कळेकर, श्री. सदानंद देसाई, श्री. अमित निकम, श्री. ज्ञानदेव गावडे, श्री. शिवाजी गुरव, श्री. शिवाजी खवरे, सौ. मंगल निर्मळे, सौ. स्वाती कुंभार व सर्व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेने वर्षपुर्तीपुर्वीच २ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण केला असुन, कर्ज वितरण १ कोटी ३५ लाख केले आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक ६५ लाख आहे.

जय भवानी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री जयभवानी सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित लाटगावची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
नूतन चेअरमनपदी श्री. प्रकाश बाबुराव सरदेसाई तर व्हा. चेअरमनपदी श्री. आनंदा दादासाहेब देसाई यांची निवड झाली आहे.
नूतन संचालक….
श्री. नंदकुमार अमृतराव सरदेसाई,
श्री.बाजीराव आत्माराम सरदेसाई ,श्री.संदीपकुमार जयसिंगराव सरदेसाई,श्री. किरण व्यंकटराव सरदेसाई, श्री. वसंत दत्तू कांबळे, सौ.शोभाताई बाळकृष्ण पाटील,सौ.वत्सला बाळू सुपल
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
श्री. दौलतराव सावंत यांनी काम पाहिले.

तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आजरा हायस्कूल प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा हायस्कूल आजराले १४ वर्षाखालील हॉलीबॉल तालुकास्तरीय स्पधेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाची जिल्हास्तरीय स्पधेसाठी निवड झाली. या संघामध्ये सिद्धेश नांदवडेकर, मनिष पेंडसे, आयान संनदी, पराग पाटील रोचक पाटील, संभव जाधव या खेळाडूनी सहभाग घेतला होता. विजयी संघाला क्रीडा शिक्षक सी. एम. पी. चव्हाण व श्री. एम. एस. गोरे योनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा श्री अशोकअण्णा चराटी सो, सर्व संचालक, सल्लागार, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापक सौ. एस्.एस्. कामत पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हसकोटी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन मिळाले.


छाया वृत्त
गणेश विसर्जनानिमित्त आजरा येथील शिवाजीनगर घाट परिसरात ट्रॅक्टरसह मोठ्या वाहनांचा वापर केला गेल्याने या परिसरातील घाट बांधणीचे दगड पूर्णपणे उखडले आहेत. यामुळे घाट परिसराला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाविकातून याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.



