mrityunjaymahanews
अन्य

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

आजरा साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला…?

सहा नोव्हेंबर पासून निवडणूक कार्यक्रमास सुरुवात

         बहुचर्चित आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून ६ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचेकडून निश्चित झालेल्या कार्यक्रमाची माहिती आज सोशल मीडियावर  व्हायरल झाली आहे.

        या माहितीनुसार नामनिर्देशन पत्र सहा नोव्हेंबर रोजी दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दहा नोव्हेंबर पर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत चालणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता छाननी होणार आहे.

      माघार घेण्याचा कालावधी १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ हा आहे. मतदान प्रक्रिया रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते पाच या कालावधीत होणार आहे.

      मतमोजणी करता १९ डिसेंबर(मंगळवार ) हा दिवस असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

        सदर कार्यक्रम जाहीररित्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होण्याआधीच अनेकांच्या हाती सोशल मिडियावरून पीडीएफ फाईल स्वरूपात लागला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे चे सचिव वसंत पाटील यांच्या सही शिक्क्यांनीशी सदर कार्यक्रमाची प्रत सोशल मीडियावर व्हायरलझाल्याने इच्छुकांची धावपळ  उडाली आहे.     


           ….संक्षिप्त


◼️एकूण जागा.                               २१


◼️गट क्र.१ उत्तुर- मडिलगे             ३ जागा

◼️गट क्र. २ आजरा शृंगारवाडी.     ३ जागा

◼️गट क्र. ३ पेरनोली गवसे             ३ जागा

◼️गट क्र.४  भादवण गजरगाव.      ३ जागा

◼️गट क्र.५  हात्तीवडे मलिग्रे           ३ जागा

◼️सहकारी संस्था गट.                   १ जागा

◼️अनु.जाती जमाती गट.               १ जागा

◼️महिला राखीव गट.                     २ जागा

◼️इतर मागास गट.                         १ जागा

◼️भटक्या विमुक्त जाती गट.             १ जागा

पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन…
इच्छुकांची घालमेल

                  ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         आज-यात १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. इच्छुकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली असतानाच अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने एकही अर्ज भरला गेला नाही. परिणामी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस वेळ कमी असल्याने इच्छुकांची घालमेल होत असल्याचे दिसत होते.

          आजरा तालूक्यात सर्व्हर डाऊनलोड होण्यास सतत अडथळा येत असल्याने शासकीय कामकाजात गोंधळ उडाला आहे. सर्व्हर डाऊनलोड होण्यास विलंब होत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकितील पहिल्या दिवशीच अर्ज दाखल करणे ठप्प झाले .तालूक्यात अनेक दिवसापासून मतदार नोंदणीचे काम सुरू आहे.बीएलओच्या माध्यमातून गावातील प्रत्येक प्रभागातून मतदार नोंदणी करण्यात येत आहे.ही सर्व माहिती संगणक प्रणालीमधून पाठवण्यात येते. परंतु संगणक प्रणालीतील सर्व्हर डाऊनलोड होण्यास सातत्याने विलंब होत आहे.यामूळे नवीन मतदार नोंदणी होण्यासही दिरंगाई होत आहे.

        दरम्यान तालुक्यातील दहा ग्रामपंचायती करीता निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात कालपासून झाली आहे. सकाळपासून अर्ज दाखल करण्यात येत होते. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरणे ठप्प झाली . काल दिवसभरात एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

मुळातच उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता कालावधी कमी आहे आणि त्यातच सर्व्हर डाऊन यामुळे इच्छुकांची  दिवसभर चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसत होते.


   खा.संजय मंडलिक यांच्याकडून आजरा शहरासाठी भरीव निधी

                ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

          खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मार्फत व नगरसेवक अभिषेक जयवंतराव शिंपी यांच्या प्रयत्नातून आजरा शहरा साठी रुपये एक कोटी चाळीस लाखांचा निधी मिळाला असल्याची माहिती नगरसेवक शिंपी यांनी दिली.

           यामध्ये ९० लाखरुपये किंमतीचे २० सोलर हायमास्ट दिवे व आपटे कॅालनी येथील ओपन स्पेस मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक प्रेरणा उद्यान, बगीचा विकसित करणेसाठी रुपये ५० लाख असा एकत्रित १ कोटी ४० लाख रुपयांच्या मंजुर निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया होवुन प्रत्यक्ष काम सुरु होईल.

       खा.संजयदादा मंडलिक यांच्या मार्फत आत्तापर्यंत

🔳१. सौर प्रकल्प १४ लाख रुपये
🔳२. शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी १० लाख रुपये
🔳३. अंतर्गत गटर्स साठी ७० लाख रुपये
🔳४. वडाचा गोंड नदी घाट १५ लाख रुपये
🔳५. आवंडी वसाहत स्ट्रिट लाईट १५ लाख रुपये
◼️६. सोलर हायमास्ट ९० लाख रुपये
🔳७. आपटे कॅालनी बगीचा विकास ५० लाख रुपये

           असा करोडोंचा निधी देवुन आजरा शहर विकासासाठी भरीव योगदान दिले असल्याचे शिंपी यांनी सांगितले.

‘ त्या ‘ घटनेचा आजरा भाजपाकडून निषेध

                ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

            सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काढलेल्या शाईफेक प्रकरणाचा आजरा तालुका भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा निषेध नोंदवला.

          यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई, उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी, आजरा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, प्रा. राजेंद्र ठाकूर, विकास बागडी, विनय सबनीस यांच्यासह भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आजरा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळावा

◼️आजरा : प्रतिनिधी◼️

           ग्रामीण रुग्णालय आजरा येथे  आरोग्य मेळावा आयोजित करणेत आला होता. त्यांसाठी संत गजानन महाराज रुरल हॉस्पीटल, महागाव येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी व सदर कार्यक्रमाचे उदघाटन देवदास बोलके ,विजय थोरवत, जितेंद्र भोसले यांचे हस्ते करणेत आले.

     त्याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष पाटील, अधिपरिचारक यांनी केले.त्यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल पाटील ,डॉ. भद्रीनाथ कदम वैद्यकीय अधिकारी,तसेच श्री.संतोष भाटले,रणजितकुमार सरदेसाई व आजरा ग्रामीण रुग्णालयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

पारंपारिक वेशभूषा दिन

               ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

           दिनांक १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान नवरात्री उत्सवानिमित्त दसरा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राज्य शासनाने राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला आहे.

          याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शाही दसरा महत्त्वाचा दुसरा दिवस हा पारंपारिक वेशभूषा दिवस म्हणून संपूर्ण जिल्हाभर साजरा करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा समन्वय अधिकारी यांच्याकडून पारित करण्यात आला आहे या महोत्सवाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेतली जाणार आहे याच अनुषंगाने पंडित दीनदयाळ विद्यालयात पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांपासून शिक्षकेतर कर्मचारी ते विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा करून आपल्या रूढी परंपरा जपण्याचाच  प्रयत्न केला .

        उत्तूरला आंतरशालेय जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन ! जिल्ह्यातील शाळांना आवाहन

                 ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

           उत्तूर ता. आजरा येथील पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेत कोल्हापूर जिल्ह्यातील व सीमावर्ती भागातील कोणत्याही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

        १४ वर्षाखालील इयत्ता आठवी पर्यंतचा ज्युनियर गट राहील. १७ वर्षाखालील इयत्ता ९ वी ते १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सिनियर गट राहील. स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्या सही शिक्यासह स्पर्धेवेळी सादर करावेत.या

         स्पर्धा रविवार दि. २२ऑक्टोबर २०२३ रोजी ठीक ११ वाजता सुरू होणार आहे .होतील.

           दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे अनुक्रमे १००१/-रू, ७०१/- रू, ५०१/-रू.रोख बक्षिसे व आकर्षक प्रशस्तीपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.प्रवेश अर्जात स्पर्धकाचे नाव, इयत्ता, शाळा, जन्मतारीख व आताचे वय यांचा उल्लेख असवा नाव नोंदणीसाठी बी. बी. पाटील ९४ ०० ४४ १९२३ ६ या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधावा .

अभिनंदनीय निवड
हरीबा कांबळे

        जय शिवराय किसान संघटनेच्या आजरा तालुका अध्यक्षपदी प्रगतशील शेतकरी हरिबा पुंडलिक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी त्यांना नुकतेच दिले.

   आज शहरात… नवरात्र विशेष

        ♦श्री रवळनाथ नवरात्र उत्सव – महिलांसाठी कुंकुमार्चन (सायं.५ ते ७ वा.) भजन ( वेळ – रात्री ९ वा.)

          ♦लायन्स किंग फ्रेंड्स सर्कल – महाप्रसाद (वेळ – दु.१२ ते ३ वाजेपर्यंत )

          ♦भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ – महाआरती ( वेळ – सायं.७-३० वाजता)

           ♦छ.शिवाजी नगर नवरात्र उत्सव मंडळ – बुद्धिबळ स्पर्धा व रास दांडिया ( वेळ – रात्री ८.३० वा.)

           ♦क्रांतिकारी तरुण मंडळ नवरात्र उत्सव -रेणुका भक्त वसंत मुळीक यांची कथा ( वेळ- रात्री )

 दुर्गामाता दर्शन
छ.शिवाजी नगर नवरात्र उत्सव मंडळ आजरा

अध्यक्ष : सूरज जाधव
उपाध्यक्ष : सुधाकर वंजारे
सचिव : अभिजीत इंजल
खजिनदार: विजय सावंत

मूर्ती देणगीदार; सुधाकर वंजारे

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!