mrityunjaymahanews
अन्य

दरोड्याचा २४ तासात तपास ….

दरोड्याचा २४ तासात तपास..
बेळगाव येथून एक जण ताब्यात…
गुन्ह्याची दिली कबुली….

 

बुधवारी पहाटे पडलेल्या आजरा तालुक्यातील रायवाडा येथील सशस्त्र दरोड्याचा तपास करण्यात आजरा पोलिसांना यश आले असून पोलिसांनी रुक्मिणी नगर बेळगाव येथून रवी लक्ष्मण नाईक यास ताब्यात घेतले आहे.

आपल्या साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे पुढील तपास करीत आहेत.

अवघ्या २४ तासात दरोड्यासारख्या गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रायवाडा येथे सशस्त्र दरोडा…दहा लाखांचा मुद्देमाल लंपास..

आजरा तालुक्यातील रायवाडा येथे सुमारे १५ दरोडेखोरांनी बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अक्षरशः धुमाकूळ घालत तलवारींसह हत्यारांचा धाक दाखवत प्रल्हाद गुरव व त्यांच्या कुटुंबीयांना बांधून घालून वराह पालन युनिटवर कब्जा मिळवला. दोनशेवर डुक्करे, काजू प्रक्रिया उद्योगातील काजूगर, घरातील दागदागिने  असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

या दरोडा नाट्याने गुरव कुटुंबीय हादरले असून चोरट्यांचा माग शोधण्यासाठी पोलीस यंत्रणाही सक्रीय झाली आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कन्नड व मराठी भाषा बोलणाऱ्या सुमारे १५ दरोडेखोरांनी प्रल्हाद गुरव यांच्या रायवाडा येथील वराह पालन युनिट व काजू प्रक्रिया युनिटसह घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये असणाऱ्या प्रल्हाद गुरव यांच्यासह त्यांची  पत्नी सौ. पूनम गुरव व राजेश गुरव यांना मारहाण करून खुर्च्यांना बांधून वराह पालन युनिटमधील सुमारे २२० लहान मोठी डुक्करे, दीडशे किलो काजूगर व त्यांच्या तिजोरीतील दाग-दागिने व रोकड लंपास केली.

आयशर चारचाकी गाडीतून आलेल्या या दरोडेखोरांनी सुमारे तासभर धुमाकूळ घातला. यावेळी गुरव कुटुंबीयांकडील मोबाईलही त्यांनी काढून घेतले होते . मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे दहा लाखाचा हा मुद्देमाल असून चोरटे कर्नाटक भागातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधित पोस्ट

तालुका खरेदी विक्री संघाच्या समझोता एक्सप्रेस ला ब्रेक…?

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींचा सविस्तर निकाल

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक निकाल…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!