mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरूवार १४ मे  २०२६

पाऊस मिनिटभर…
वीज गायब तासभर…
आज-यातील प्रकार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सध्या अवकाळी पावसाची हजेरी वारंवार सुरू आहे. अवकाळी पाऊस सुरू होतो ना होतो तोच वीज गायब होत असल्याने व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाच दहा मिनिटाचा पाऊस झाला तरीही दोन चार तास वीज गायब होत असल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मे महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. कुलर, पंखे, वातानुकूलित यंत्रे यांच्याशिवाय जगणे अशक्य बनले असताना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्रभर जागे राहण्याची वेळ शहरवासीयांसह तालुका वासीयांवर येत आहे. शहरात मच्छरांचे प्रमाण वाढल्याने व पंखे चालू नसल्याने अनेक कुटुंबे रात्र जागून काढत आहेत.

मुळात वीज उपलब्ध नाही आणि पर्यायी व्यवस्थाही नाही अशी अनेकांची अवस्था आहे.देखभालीच्या नावाखाली अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित केला जात असतानाही पाऊस सुरू होताच वीज गायब होत असेल तर नेमकी देखभाल कशाची होते ? हा प्रश्न हे आता उपस्थित केला जात आहे.

मागेल त्याला काजू कलमे
शासनाचा उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मागेल त्याला काजू कलमे हा उपक्रम शासनामार्फत राबवला जात असून तालुका कृषी विभागाकडून स्थानिक पातळीवर काजू कलमांचे वाटप करण्यात येणार आहे.

०.०५ हेक्टर ते ०.२५ हेक्टर इतकी क्षेत्र मर्यादा असणाऱ्या शेतकऱ्यांना परमिट द्वारे मोफत १० ते ५० काजू कलमे शासकीय रोपवाटिकेतून देण्यात येणार आहेत.

यासाठी ७/१२ उतारा, ८अ उतारा, फार्मर आयडी, आधार कार्ड, अर्ज इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार असून अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रास जि.प. आरोग्य समिती सभापतींची भेट

उत्तूर : जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर यांनी आज उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे यांनी त्यांचे स्वागत केले.
सभापतींनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जि.प. सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, सरपंच किरण आमणगी तसेच अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे यांनी प्रास्ताविक करून आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा सादर केला. बैठकीत कर्मचारी निवासस्थानांची गरज, नवीन डॉक्टर व शिपाई नियुक्ती, तसेच वेळेवर औषध पुरवठा यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी सभापती सारिका नांदेकर यांनी डिलिव्हरीसाठी येणाऱ्या रुग्णांना गडहिंग्लज येथे न पाठवता शक्य तितक्या सुविधा उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध अडचणी सभापतींसमोर मांडल्या. बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी रविंद्र गुरव, विस्तार अधिकारी काटकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व कर्मचारी ओळखपत्र परिधान करून उपस्थित असल्याचे दिसून आले.

उत्तूर येथे उद्या मॅरेथॉन स्पर्धा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिंदवी स्वराज्य यांचे मार्फत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त उत्तुर येथे शुक्रवार दिनांक १५ मे रोजी सकाळी आठ वाजता मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुले व मुलींच्या मोठ्या व खुल्या गटाकरता पाच किलोमीटर हे अंतर असून प्रथम तीन क्रमांकाला ३००१/- रुपये, २००१/- रुपये, १००१/- रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.

१४ वर्षाखालील लहान गटाकरता २.५ किलोमीटर इतके अंतर असून मुले व मुलींच्या गटामध्ये पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ११०१/- रुपये , ७०१/-, रुपये ५०१/- रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.

हातात कासरा धरून बैल पळवण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून पहिल्या तीन क्रमांकाला ३००१/- रुपये, २००१ रुपये व १००१/- रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.

छायावृत्त

सुलगाव ता. आजरा येथे श्री जगदंबा राजेश्वरी भावेश्वरी देवी प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभाला काल बुधवार दिनांक १३ मे २०१७ रोजी सुरुवात झाली आहे. पुण्याहवाचन, गणेश पूजन, वरूण देवता पूजन, मातृका पूजन, कलश मिरवणूक, होम हवन ,धार्मिक कार्यक्रम व ह.भ.प. कृष्णदेव ढालगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम काल बुधवारी पार पडला.


आजरा येथील प्रभाग क्रमांक १७ मधील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेट देऊन नगरसेविका सौ. पुनम लिचम  आणि नागरिकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रा अरुण सुरंगले प्रा पुनम लिचम प्रा.सामंत  प्रा. अल्बर्ट फर्नांडिस यांनी पुढील करिअर संदर्भात मार्गदर्शन  केले.  यावेळी शंकरराव पाटील किरण लिचम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विशेष बातम्या…

♦ आयात शुल्कवाढीमुळे सोने प्रति दहा ग्रॅम ८००० रुपयांनी तर चांदी प्रति किलो वीस हजारांनी महागली.

♦ ‘नीट’ पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचे छापे. पाच जणांना अटक.

♦ सलग दुसऱ्या दिवशी आजरा तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी.

♦ गडहिंग्लज येथील मोबाईल शोरूमच्या संगणकातील सिस्टीम मध्ये बनावट आयडी तयार करून एक कोटी २७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जमीर मुजावर/कापशी याला अटक.

नारायण देसाई यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सुलगाव ता .आजरा गावचे माजी उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण यशवंत देसाई (वय ८८ वर्षे ) यांचे मंगळवार दि. १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन आज गुरूवार दि. १४ रोजी सकाळी होणार आहे.

आयपीएल न्यूज 

काल बुधवारी झालेल्या बंगरूळू विरुद्ध कोलकाता सामन्यामध्ये बंगळूरू ने कोलकाताचा पराभव केला. विराट कोहलीने नाबाद १०६ धावांसह आयपीएल मध्ये नववे विक्रमी शतक झळकावले.

आजचा सामना

पंजाब विरुद्ध मुंबई

वेळ : सायंकाळी ७.३० पासून

गुण तक्ता

बंगळुरू.   १६
गुजरात.    १६
हैदराबाद.. १४
पंजाब.      १३
चेन्नई         १२
राजस्थान.  १२
दिल्ली.       १०
कोलकाता  ०९
मुंबई          ०६
लखनऊ.    ०६

आजचे पंचांग 

दिनांक : १४ मे २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (सकाळी ११.२० पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (रात्री १०.३३ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : प्रीति योग (सायंकाळी ०५.५३ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : तैतुला करण (सकाळी ११.२० पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मीन राशी (रात्री १०.३३ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१३ ते दुपारी ०३.५० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

पेद्रेवाडीच्या सरपंच सौ.रेडेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!