mrityunjaymahanews
अन्य

आज-यात किरीट सोमय्या यांचा निषेध…

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक आजऱ्यात निषेध

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह अशा क्लिप प्रकरणी आजरा तालुका शिवसेना आक्रमक झाली असून आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून सोमय्या यांचा निषेध करण्यात आला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिक मोठ्या संख्येने येथील संभाजी चौकात एकत्र आले यावेळी तालुकाध्यक्ष युवराज पवार यांनी झालेला प्रकार हा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख राजेंद्रसिंह सावंत, महेश पाटील, शिवाजी चाळके, नारायण कांबळे, जयसिंग पाटील, राजू बंडगर, सुनील डोंगरे, अशोक लोहार, गुड्डू खेडेकर, संकेत देसाई रोहन गिरी भिकाजी विभूते, राजेंद्र बंडगर, अरुण कांबळे, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजरा येथे गोवा बनावट मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई 

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आजरा – आंबोली रस्त्यावर व्हिक्टोरिया पुलाजवळ, आजरा येथे गोवा बनावट मद्याची वाहतूक करीत असताना टाटा इंडिका कार वाहन क्रं.MH-१२-DY- ४५९३ ताब्यात घेवून गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये गोवा बनावट मद्याचे ३५ बॉक्स जप्त करून वाहनासह ४.४८,५२०/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला.  रविंद्र आवळे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांचे आदेशानुसार गोवा बनावट मद्याची विक्री व वाहतूक कोल्हापूर जिल्हयात होवू नये यासाठी कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने आजरा तालुक्यात गस्त घालत असताना निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लन कार्यालयाने सदर कारवाई केली. सदर कारवाईत शिवाजी अनंता धायगुडे,(वय५५, रा. फातिमानगर, पूणे) यास वाहनासह ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
                         ……..

रामतीर्थ येथे आजरा महाविद्यालय व वन विभागाकडून वृक्षारोपण


महाराष्ट्र शासन वन विभाग परिक्षेत्र आजरा आणि आजरा महाविद्यालय, आजरा मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ( एनएसएस ) भूगोल व पर्यावरण शास्त्र विभाग आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ वन महोत्सव सप्ताहा ‘ चे औचित्य साधून आजरा येथील रामतीर्थ पर्यटन क्षेत्र व वन विभाग परिसरात वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, काजू, करंज, शिसम, अर्जुनसादळा, खाया, हेळा, येन, अशा ३०० विविध देशी व उंच रोपांची लागवड करण्यात आली .

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका, प्रकल्प अधिकारी प्रा.डॉ. रणजीत पवार, प्रा. विठ्ठल हाके, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे.
तसेच आजरा वन विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती स्मिता डाके, वनरक्षक
तानाजी लटके, गुरुनाथ नावगेकर, वन सेवक पुंडलिक शिंदे, नामदेव पाटील, मधुकर दोरुगडे, रुपेश गवळी, सौरभ डेळेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या वृक्ष लागवड कार्यक्रमात आजरा महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राचार्य डॉ.अशोक सादळे, उपप्राचार्य प्रा.दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील तसेच आजरा वनविभागातील वनरक्षक, वनसेवक यांच्या सक्रिय सहभागातून ३०० पेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आले .
                         …..,.

 

संबंधित पोस्ट

आजऱ्याजवळ चित्री नदीपात्रात महीलेचा मृतदेह आढळला… ‘उत्तर’ च्या लढतीकडे आजरातालुकावासियांचे लक्ष लागून….

mrityunjay mahanews

आज आजरा येथील रामतीर्थ यात्रा

mrityunjay mahanews

चालत्या चारचाकी वर गव्याची उडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात महिला ठार

mrityunjay mahanews

Crime News

mrityunjay mahanews
error: Content is protected !!