

पोश्रातवाडी येथून वृद्ध बेपत्ता

पोश्रातवाडी, तालुका आजरा येथील महादेव जानबा पाटील (वय वर्षे ७५)हा वृदध शनिवार दिनांक २१ मे पासून बेपत्ता असल्याची वर्दी विलास महादेव पाटील यांनी आजरा पोलिसात दिली आहे. घरामध्ये काहीही न सांगता महादेव हे निघून गेले असून अद्याप ते परतले नसल्याचे वर्दीमध्ये म्हटले आहे आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


व्यंकटराव ज्युनिअर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेचे शासकीय चित्रकला परीक्षेत सुयश..
व्यंकटराव हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला परीक्षा २०२१ या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.या प्रशालेतील एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेसाठी एकूण ६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कु. नाईक संचीता सुभाष हिने या परीक्षेत ‘A’श्रेणी मिळविली. तसेच २२ विद्यार्थी ‘B’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.इंटरमिजिएट परीक्षेसाठी इयत्ता १० वी चे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामध्ये ७० विद्यार्थी परीक्षेला बसली. पैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २२ विद्यार्थ्यांना ‘B,’श्रेणी प्राप्त झाली.
या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी , संचालक मंडळ, प्राचार्य एस.बी. गुरव, पर्यवेक्षक एस. जी.खोराटे यांचे प्रोत्साहन लाभले. व कलाशिक्षक श्री .कृष्णा दावणे यांचे मार्गदर्शन मिळाले.
……………..
दिलगिरी….
पोश्रातवाडी येथील बातमीमध्ये नजरचुकीने ‘वृद्ध’ च्या जागी ‘बुद्ध’ असा शब्द प्रसिद्ध झाला.तो दुरुस्त करून घेतला आहे.चुकीबद्दल वाचकांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत.
……………….मुख्य संपादक……………



