mrityunjaymahanews
अन्य

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आज-याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलिसांनी संशयास्पदरित्या जाणाऱ्या चारचाकीची  झडती घेतली असता त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणात पोलिसांनी दोघाविरोधात गुन्हा नोंद करून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.सुनिल शिवाजी कोईगडे , आजरा पोलीस ठाणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की….

सर्वेश सुभाष मुळये (वय २९ रा. बांदा ता. सावंतवाडी जि.सिदुधुर्ग) व राजन गुरव रा. माजगांव ता. सांवतवाडी जि. सिंदुधुर्ग ( फरारी ) हे आजरा पोलीस ठाणे हददीतील गवसे ते देवकाडगांव रोडवर विनायकवाडी येथे एम.एच. ०७- ए. जे-२६४४ या मारूती सुझकी कंपनीची गॅरी छोटा टेम्पोतून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याची माहिती आजरा पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळले.

पोलिसांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. मुळ्ये व गुरव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून  पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बँकेकडून जप्त मालमत्तेचे सील व कुलूप तोडले…
उत्तूर येथील दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंद

थकीत कर्जापोटी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने सौ. भारती मधुकर चव्हाण व मधुकर चाळू चव्हाण रा. उत्तूर् यांच्या स्थावर मालमत्तेला सील लावून कुलूपबंद केले होते. दरम्यान चव्हाण दांपत्याने अनधिकृतरित्या संगनमताने सदर मिळकतीमध्ये प्रवेश करून सील व कुलूप तोडून बँक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दिनकर विष्णू पावले या बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी उत्तुर पोलिसात फिर्याद दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे चव्हाण दांपत्याने उल्लंघन करण्याबरोबरच बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आजरा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

वाटणीच्या वादातून झुलपेवाडी येथे मारामारी…

चौघे जखमी: पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

वाटणीच्या वादातून झुलपेवाडी ता.आजरा येथे मातले कुटुंबियात यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मातले कुटुंबीयांमध्ये वाटणीचा वाद आहे.या वादातून सोमवारी दोन्ही कुटुंबीयांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.अखेर याचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये संजीवकुमार जानबा मातले, सौ. सुरेखा संजीवकुमार मातले, बाबासो जानबा मातले व सौ. माधुरी बाबासो मातले असे चारजण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी बाबासो मातले व संजीवकुमार मातले यांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून चौघा जखमींसह ओमकार संजीवकुमार मातले अशा पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आत्महत्या…

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले जमा अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची माहिती

mrityunjay mahanews

डॉ. अनिल देशपांडे यांचा एकसष्ठीपूर्ती कार्यक्रम उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तलाठ्याच्या प्रतापांची तक्रार थेट आयुक्तांकडे…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!