mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

सोमवार  १७ नोव्हेंबर २०२५

माघारी पूर्वीच अबूताहेर तकीलदार  निवडणूक रिंगणातून बाहेर पडणार
२४ तासात माघारीचा निर्णय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतींच्या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणारे माजी पंचायत समिती सदस्य व आजरा कारखाना संचालक अबूताहेर तकीलदार यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तकीलदार यांनी नगराध्यक्ष पदाचे दावेदार समजले जात होते . त्यांनी तशी तयारीही केली होती. शहरात त्यांनी आपल्या उमेदवारी इच्छुक उमेदवारीबाभत फलकही लावले होते.आजऱ्यात अशोक चराटी यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले होते. अशोकण्णा चराटी यांच्या विरोधातील आघाडीमध्ये ते सामील झाले होते.या आघाडीत त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. अनेक बैठकाही झाल्या होत्या.

उमेदवारीसाठी त्यांनी काल अर्जही भरला असे असताना त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपले मन दुखावल्याने आपण निवडणूक रिंगणातून बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. आपण सध्या माघार प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून सर्वप्रथम माघारही घेणार असल्याचे सांगितले.

तकीलदार यांच्या निर्णयामुळे नगरपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल रविवारी सुट्टीच्या दिवस असूनही अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तकिलदार यांनी हा निर्णय सहजासहजी घेतला नसल्याचेही बोलले जाते. तकिलदार यांच्या या भूमिकेनंतर ते विरोधी आघाडीतच राहतील याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचेही समजते.

आजरा नगरपंचायतीकरीता एकूण ११२ उमेदवारी अर्ज दाखल 

आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक साठी रविवार अखेर नगरसेवक पदासाठी ९९ तर नगराध्यक्ष पदासाठी १३ असे ११२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. एका दिवशी नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी ४५ असे ४९ अर्ज दाखल झाले.

रविवारी दाखल झालेले अर्ज … .

नगराध्यक्ष

१) श्रद्धानंद ठाकूर
२) अशोक चराटी
३) परशुराम बामणे
४) सुधीर कुंभार

नगरसेवक

प्रभाग १
१) भैरवी राजेंद्र सावंत(२अर्ज)
२) अश्विनी संजय चव्हाण

प्रभाग २
१) पूजा अश्विन डोंगरे

प्रभाग ३
१) समीना वसीम खेडेकर (२अर्ज)

प्रभाग ४
१) मुसासरफराज इस्माईल पटेल (२अर्ज)
२) आदम निसार खेडेकर
३) बाकियू निसार खेडेकर
४) सोयल सलाम पठाण
५) रशीद महमद पठाण

प्रभाग ५
१) नाझिया अल्लाउद्दीन खेडेकर
२) जस्मिन मी महमद इरफान सय्यद
३) असमा अनिस दरवाजकर

प्रभाग ६
१) शाहीन फरहान तकीलदार
२) अन्वी अनिरुद्ध केसरकर
३) साधना अमोल मुरुकटे

प्रभाग ७
१) अंजना महेश कांबळे

प्रभाग ८ निरंक
प्रभाग ९ निरंक

प्रभाग १०
१) वसिम सिकंदर दरवाजकर
२) सिकंदर इस्माईल दरवाजकर
३) सिकंदर इस्माईल दरवाजकर (अपक्ष)
४) ताहिर रहिमबक्ष लमतुरे

प्रभाग ११
१) गिता संजय सावंत (२अर्ज)
२) साक्षी अनिरुद्ध फडके
३) स्मिता सुधीर परळकर
४) वृषाली विजय केळकर

प्रभाग १२
१) अनिकेत अशोक चराटी

प्रभाग १३
१) परेश कृष्णाजी पोतदार (२ अर्ज)

प्रभाग १४
१) सिद्धेश विलास नाईक (२)
२) विक्रम अरुण पटेकर

प्रभाग १५
१) शैलेश नारायण सावंत (२अर्ज)
२) सतिश परशराम बामणे

प्रभाग १६
१) आसावरी महेश खेडेकर (२अर्ज)
२) शफुरा इरफान मुराद
३) अश्विनी विजय कांबळे

प्रभाग १७
१) जयश्री नेताजी पटेकर (२अर्ज)
२) पूनम किरण लिचम (२अर्ज)

आज सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अशोकण्णा चराटी हे शक्ती प्रदर्शनाने आज अर्ज दाखल करणार आहेत. आज आणखी २० ते २५ अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

बिबट्या आला रे…

बिबट्याला पाहून अक्षयने ठोकली धूम

 पेरणोली जंगलातील थरार.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

पेरणोली ता आजरा जंगलानजीक  जनावरे चारण्यासाठी गेलेल्या अक्षय कांबळे याला बिबट्या समोर असल्याचे दिसले. तो जनावरांवर हल्ला करणार होता. त्याला समोर पाहून अक्षय कांबळे यांनी गावाकडे धूम ठोकली. त्यांनी ग्रामस्थांना सगळा प्रकार सांगितला. शनिवारी दुपारी अडीच वाजता हा थरारक प्रसंग घडला. अक्षय हा म्हैशी व बकऱ्यांचा कळप घेऊन जंगलात गेला होता.

बकऱ्याचा कळप व म्हशी चरत तळीच्या पाण्यावर आली. झुडपात काहीतरी हालचाल झाल्याचे अक्षयला जाणवले. त्याने समोर पाहताच बिबट्या दिसला.  जनावरे व बकऱ्याच्या कळपावर हल्ला करणार इतक्यात प्रसंगावधान राखून त्यांनी आरडाओरड केला.  पाठीमागे न पाहताच तो गावाकडे पळत सुटला. जनावरांचा कळप बिबट्याच्या भीतीने आजूबाजूला पळाला. त्याने घटना ग्रामस्थांना येऊन सांगितली.  ग्रामस्थांना सोबत घेऊन घटनास्थळाचा रस्ता धरला. त्यांना कुठेही बिबट्या दिसला नाही. मात्र जाताना बिबट्याने आपल्या आगमनाच्या खुणा मागे ठेवल्या होत्या.

 या घटनेमुळे पेरणोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वन विभागाने याची माहिती घेतली आहे. त्याच्या पाऊल खुणांची  पाहणी केली जात आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करून होत आहे.

उत्तूरमध्ये स्वच्छतेचा एकजूट संदेश : पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग

उत्तूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्तूर गावात रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. ‘दर रविवारी एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी’ या संकल्पनेनुसार या आठवड्यात वडभाव परिसरातील ओढा, स्मशानशेड, तसेच स्मशानभूमी ते झेंडे वसाहत या संपूर्ण पट्ट्याची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमामध्ये गावातील महिला, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष करून महिलांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. सारिका घेवडे, शांताबाई पावणे, जयश्री कातोरे, विमल कातोरे, सविता चव्हाण, उषाताई चव्हाण, लक्ष्मी बामणे, कमल बामणे, रेखा दोरुगडे, वैशाली बामणे, शांतादेवी मोरवडकर, मालुताई मोरवडकर, कदम, पूजा इंगळे, दिपाली गाडीवड्डर, हर्षाली गाडीवड्डर तसेच कार्यक्रमाला सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संदेश रायकर, भैरू कुंभार, सरिता कुरुणकर, तसेच माजी ग्रा.प. सदस्या उषा चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमादरम्यान ओढा परिसरातील कचरा, झाडांची पाने व गवत काढून साफसफाई करण्यात आली. स्मशानभूमी ते झेंडे वसाहत पर्यंतचा रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. या मोहीमेमुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती वाढत असून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजू लागले आहे. गावातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतल्यास उत्तूर गाव स्वच्छ आणि आरोग्यदायी बनेल असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला.

निधन वार्ता

मुक्ताबाई मोरवाडकर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

मुम्मेवाडी ता. आजरा येथील मुक्ताबाई बबन मोरवाडकर (वय ६६ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष रामदास मोरवाडकर यांच्या आई व पोलिस पाटील वैशाली मोरवाडकर यांच्या त्या सासूबाई होत.

 

संबंधित पोस्ट

कारखान्याची निवडणूक दणक्यात होणार… आजरा साखर कारखाना वार्षिक सभेत गोंधळ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले जमा अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची माहिती

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!