



मंत्री केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा व लेखी आश्वासनानंतर लॉंग मार्च स्थगित

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
महाराष्ट्रातील वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसून या शाळा बंद होणार नाहीत असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्यानंतर आजरा येथून मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आलेला लाँग मार्च स्थगित करण्यात आला.
वीस पटाखालील शाळा बंद करण्याबरोबरच इतर काही शासनाच्या जाचक निर्णयाविरोधात आजरा येथून मंत्री केसरकर यांच्या सावंतवाडी येथील घराच्या दिशेने शनिवारपासून लाँग मार्च सुरू करण्यात आला होता. याची गांभीर्याने दखल घेत मंत्री केसरकर यांनी आंदोलकांची आंबोली येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शासनाचा वाड्या वस्त्यावरील शाळा बंद करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काँ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर यांच्यासह आंदोलकांशी त्यांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर अशा शाळा बंद करण्यात येणार नाहीत असे लेखी पत्रही दिले. मंत्री केसरकर यांच्या लेखी आश्वासनानंतर लॉंग मार्च स्थगित करण्यात आला.
यावेळी संपत देसाई,संजय तर्डेकर ,बालेश नाईक, अमर चव्हाण, शिवाजी गुरव, प्रकाश पाटील, निवृत्ती कांबळे, प्रकाश मोरूस्कर, सुभाष निकम, गोविंदा नारळकर इत्यादी आंदोलनकर्ते उपस्थित होते.


बाबुरावजी म्हणजे भाजपाचा उपेक्षित परंतु एकनिष्ठ कार्यकर्ता : प्रा.सुनील शिंत्रे

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
भाजपाची पाळेमुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात रुजवण्यात स्व. बाबुराव कुंभार यांचे मोठे योगदान आहे.आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला परंतु त्यांच्या पदरी उपेक्षाच आली एखाद्या महामंडळावर त्यांच्या कामाची दखल घेऊन वर्णी लागणे अपेक्षित होते परंतु त्यांना शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. असे असूनही कोणतीही नाराजी न दाखवता भाजपाशी एकनिष्ठ राहून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले.
भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. बाबुरावजी कुंभार यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील विविध मान्यवरांच्या कार्यगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मारुतीराव परितकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पं. दीनदयाळ उपाध्याय व बाबुरावजी कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते सूर्यकांत शंकर दोरुगडे (कृषीक्षेत्र),सुनील ईश्वर शिवणे(क्रीडाक्षेत्र), मुरलीधर पुंडलिक कुंभार (प्रशासकीय क्षेत्र),उदय मारुती मोहिते (वैद्यशास्त्र विभाग),शिवार फिल्म्स अँड एंटरटेनमेंट (नाट्य-कला क्षेत्र) यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी नाथाजी पाटील व मारुतीराव परितकर यांचीही भाषणे झाली.आभार सुधीर कुंभार यांनी मानले.
कार्यक्रमास जनता बँकेचे उपाध्यक्ष बापू टोपले, डॉ. सुधीर मुंज, अरुण देसाई,अशोकअण्णा चराटी, संभाजी पाटील, जनार्दन टोपले, श्रीमती अंजनाताई रेडेकर, मलिककुमार बुरुड, विजयकुमार पाटील,सौ. शुभदा जोशी, आनंदराव कुंभार, महेश नार्वेकर, दशरथ अमृते, दयानंद भुसारी, दयानंद भोपळे, युवराज पोवार, मुकुंद कांबळे, गुरु गोवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


पं. दीनदयाळ विद्यालयात स्व. बाबुरावजी कुंभार यांचा स्मृतिदिन साजरा

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. बाबुरावजी कुंभार यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे मार्गदर्शक प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मलिककुमार बुरुड, संचालक रमेश कारेकर,अरुण देसाई, मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


उमेदवारांचा घोळ… निवडून येणार कोण ?
पेरणोली येथील लढतीकडे तालुक्याचे लक्ष

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा तालुक्यातील पेरणोली ग्रामपंचायती करीता नेत्यांना न जुमानता अनेक कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने उमेदवारीचा प्रचंड घोळ निर्माण झाला असून नेमके निवडून कोण येणार ? याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
सर्वपक्षीय नेत्यांचे व तालुक्याच्या राजकारणावर पगडा असणारे गाव अशी पेरणोलीची ओळख आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता या गावात नाही असे नाही. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आघाड्यांच्या जोडण्या करत असताना नेत्यांच्या नाकीनऊ आल्याने नाराजीतून अनेक उमेदवारांनी मिळेल त्या आघाडीत प्रवेश करून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या राजकीय पटलावर सध्या तरी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रचंड ईर्षा व अंतर्गत हेवेदाव्यांमधून तयार झालेल्या या आघाड्यांपैकी निवडणुकीत कोणती आघाडी बाजी मारणार याबाबत उलट- सुलट चर्चा सुरू आहे.
निवडणुकीतील उमेदवार पुढील प्रमाणे…
श्री रवळनाथ कुरकुंदेश्वर युवा आघाडी
सरपंचपद
सौ. प्रियांका संतोष जाधव
प्रभाग एक –
सौ. अश्विनी गौतम कांबळेसौ,.रुपाली पांडुरंग पाईम,रणजीत धनाजी फगरे
प्रभाग दोन –
अमोल राजाराम जाधव,सौ संध्या संतोष कालेकर,संदीप निवृत्ती नावलकर
प्रभाग तीन –
संकेत बाळासो सावंत,सौ.धनश्री रवींद्र देसाई
सौ.सुषमा नामदेव मोहिते
रवळनाथ ग्राम विकास आघाडी
सरपंचपद
सौ. राजश्री दीपक देसाई
प्रभाग एक
सौ. कमल तानाजी कांबळे,सौ. अनिता संजय सोले ,कृष्णा शिवाजी सावंत
प्रभाग दोन
शंकर रानबा मांग,सौ.सुनीता बाळासो कालेकर
संतोष शंकर नावलकर
प्रभाग तीन
अविनाश तुकाराम सुतार,सिद्धू निवृत्ती मोहिते सौ.शुभदा अमित सामंत
कुरकुंदेश्वर लोकशाही विकास आघाडी
सरपंचपद
सौ. विद्या शिवाजी तिबिले…प्रभाग १ मधून कीर्ती उर्फ रेखा किशोर परब व प्रभाग ३ मधून सौ. गीता कृष्णा लोंढे हे दोन उमेदवार आहेत.
श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी
सरपंचपद
सौ दिपाली सचिन देसाई….प्रभाग दोन मधून आघाडीचे उमेदवार दीपक राणबा लोखंडे,सौ. संजीवनी मारुती नावलकर व औदुंबर तुकाराम हवालदार यांची उमेदवारी आहे.
स्वाभिमानी ग्रामविकास आघाडी
सरपंचपद
सौ.माधवी जयवंत येरुडकर….या आघाडीतून प्रभाग एक मधून सौ. स्वाती राजेंद्र कालेकर तर प्रभाग तीन मधून अरविंद नावलकर हे निवडणुकीला सामोरे जात आहेत.
या व्यतिरिक्त प्रभाग दोन मधून सर्जेराव जाधव व प्रभाग तीन मधून संदीप सासुलकर हे देखील निवडणूक रिंगणात आहेत.



आज-यात ‘ सकल मराठा ‘ च्या वतीने आमरण साखळी उपोषण

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा येथे सकल मराठा च्या वतीने आरक्षण प्रश्न मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषणास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे आज सकाळपासून कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनात मारुती मोरे,बंडोपंत चव्हाण, बंडोपंत कातकर, संभाजीराव इंजल, चंद्रकांत सरदेसाई, दशरथ कुंभार, शिवाजीराव इंजल, प्रभाकर कोरवी, गणपतराव डोंगरे, राजू होलम, नामदेवराव नार्वेकर, दत्तात्रय मोहिते, विठ्ठलराव देसाई, शिवाजीराव पाटील, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला असून स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.
उत्तूरला साखळी उपोषण सुरू…
उमेश आपटे यांचा पुढाकार

मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे- पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी उत्तुर जिल्हा परीषद मतदार संघातील मराठा आरक्षणास पाठींबा असणाऱ्या नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीने माजी जिल्हा परीषद सदस्य उमेश आपटे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ उत्तुर येथे आजपासून साखळी उपोषणास प्रारंभ झाला .
यावेळी बोलताना उमेश आपटे म्हणाले, जो पर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील. मराठा समाजास आरक्षण मिळावे या न्याय मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना आमचा जाहीर पाठींबा आहे.
यावेळी सरपंच किरण आमनगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, भास्कर भाईगडे, व्यंकटेश मुळीक, अजित गुरव, निशांत पाटील, प्रवीण तवकरी, प्रतीक यमगेकर, संग्राम घोडके, सुहास पोतदार, श्रीपती यादव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवसभर उत्तूर परिसरातील नागरिकांनी उपोषणस्थळी उपस्थीत राहुन मराठा आरक्षणास आपला पाठींबा दर्शविला.


कृषी निविष्ठा विक्री केंद्र तीन दिवस राहणार बंद..जाचक कायद्यांच्या पार्श्वभूमीवर चालकांचा निर्णय

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईसाठी सध्या पुरेसे प्रचलित कायदे असतानाही पुन्हा नवीन जाचक कायदे केले असल्याच्या कारणास्तव विक्री केंद्र बुधवार दिनांक २ नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर अखेर बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे कीटकनाशके खते व्यापारी यांनी घेतला आहे.
आजरा तालुका असोसिएशनने या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.यावेळी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील, उपाध्यक्ष संदीप पाटील, जनार्दन बामणे, भगवान पाटील, चंद्रकांत बोलके, विष्णू कुंभार, मनोज लकांबळे, बाबुराव पोटे, मधुकर परीट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


सेवानिवृत्ती…
अनिल चौगुले

आजरा आगारातील वाहक अनिल चौगुले हे राज्य परिवहन मंडळाच्या २५ वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्य आज मंगळवार दि. ३१ रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर विभागाचा विभागीय कामगार मेळावा व निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास एस.टी. कामगार संघटनेचे नेते हनुमंतरावजी ताटे व संदीप शिंदे उपस्थित राहणार आहेत.



.

