mrityunjaymahanews
अन्य

Crime News

अपघातात आजऱ्यातील महिला ठार…

मुलगी गंभीर जखमी

                   आजरा : प्रतिनिधी

         कोल्हापूर येथे रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने आमराई गल्ली, आजरा येथील सौ. जयनम्मा तय्यब मनेर ही ३८ वर्षीय विवाहित महिला जागीच ठार झाली तर मुलगी सद्धिका तय्यब मनेर ( वय २० वर्षे) ही गंभीर जखमी झाली आहे.

         सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथे ताराराणी विद्यापीठासमोरील रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने, जयनम्मा व सद्धीका यांना जोराने धडक दिली. दोघीही बाजूला फेकल्या गेल्या. यामध्ये दुचाकीच्या हॅण्डलचा जबर मार लागल्याने जयनम्मा या जागीच ठार झाल्या तर सद्धीका गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

          या घटनेमुळे आजरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मारहाण करून सोन्याची चेन लंपास …

आज-यात गुन्हा नोंद

                    आजरा : प्रतिनिधी

       आजरा येथील प्रताप पांडुरंग नाईक (रा.महाजन गल्ली) यांना शिवीगाळ व मारहाण करून तीन तोळ्याची सोन्याची चेन घेऊन पलायन केल्याप्रकरणी प्रताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात सहा जणांविरोधात पुन्हा नोंद करण्यात आला कोआहे.

      चाफे गल्ली येथे रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमधील सहा संशयीत तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे करीत आहेत.


निधन वार्ता…

शारूबाई सुतार

सिरसंगी गावातील श्रीमती शारुबाई मसणू सुतार (वय ८८)यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

पाऊसपाणी…

आजरा शहर व परिसरात रात्री ११ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.


 

संबंधित पोस्ट

आजरा तालुक्यातील सहकार आदर्शवत… माजी खासदार महाडिक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

विहिरीत बुडाल्याने वृद्धाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सुळे येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!