शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६

नेते फार्मात…
कार्यकर्ते संभ्रमात…

ज्योतिप्रसाद सावंत…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची असणारी मोठी संख्या, या संख्येतून तयार झालेले संघर्षाचे वातावरण व कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही असा निर्धार करून मिळेल त्या पक्षाचे लेबल लावून घेऊन नेतेमंडळींनी घेतलेल्या उमेदवाऱ्या पाहून कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. एक पक्ष मोठा केला आणि दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवले अशी विचित्र परिस्थिती सध्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची झाली आहे.
मुळातच तीन आमदारांमध्ये विभागल्या गेलेल्या आजरा तालुक्याला दोन जिल्हा परिषद मतदार संघ व चार पंचायत समिती मतदार संघ वाट्याला आले आहेत. यामुळेच हा विचित्र प्रकाराचा तालुकावासियांना पुरेपूर अनुभव येत आहे. तीन आमदारांपैकी दोन आमदार तर मंत्रीपदी विराजमान झाले आहेत. आमदार शिवाजीराव पाटील हे आमदार असले तरीही त्यांची राज दरबारी ताकद फार मोठी आहे. त्यामुळे महायुतीचे तीनही प्रमुख नेते जिल्हा परिषदेकरीता आग्रही असणे स्वाभाविक आहे. उमेदवारी बाबत यापूर्वीच त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना शब्दही दिले आहेत. कार्यकर्त्यांना दिलेले शब्द पाळण्याबरोबरच आपापल्या मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी स्वतंत्रपणे सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.तर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोयीच्या भूमिका घेतल्या. यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून बस्तान बसवलेले उमेश आपटे हे भाजपा पुरस्कृत ताराराणी आघाडीचे उमेदवार झाले तर काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष उत्तम देसाई यांनी भाजपाशी जवळीक करून पत्नी सौ.स्मिता यांची उमेदवारी पदरात पाडून घेतली. भाजपाचे विठ्ठल उत्तूरकर यांनी शिवसेना शिंदे गटातून उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसरकर यांनीही शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो याचा पुरेपूर अनुभव घेत असलेल्या कार्यकर्त्यांची मात्र अवस्था विचित्र होऊ लागली आहे.
कालपर्यंत ज्या पक्षाच्या विरोधात आपण बोलत होतो त्याच पक्षाचे आता गुणगान गाण्याशिवाय कार्यकर्त्यांना पर्याय नाही.
पक्षप्रवेशही नाही…
ज्यांनी सोयीप्रमाणे विविध पक्षांच्या उमेदवाऱ्या घेतलेल्या आहेत त्यांचे त्या पक्षात अद्याप पक्ष प्रवेशही झालेले नाहीत अथवा जुन्या पक्षांच्या पदांचे राजीनामेही दिलेली नाहीत.
महायुतीच्या घटक पक्षांची सूज वाढली…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाल्याने तूर्तास या पक्षांची सूज वाढली आहे. निवडणूक निकालानंतरच ही सूज की बाळसे हे स्पष्ट होईल…

नो ऑब्जेक्शन…
दोन अर्ज अपात्र

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननीत पंचायत समिती भादवण गणातून स्वप्नाली किरण केसरकर यांचा जात टोकन नसल्या कारणावरून तर राजू पोतनिस यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिज्ञापत्र पंचायत समितीच्या अर्जासोबत झेरॉक्स कॉपी जोडल्याने हे दोन उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. आली. मंगळवार (दि. २७) रोजी माघारीनंतर अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. छान मी वेळी कोणीही कोणावरही आक्षेप घेतला नाही.
छाननी नंतर पात्र अर्ज पुढील प्रमाणे…
पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :
अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस
संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे गट,विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट,सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट,महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष
चंद्रकांत ईश्वर गोरुले (बहिरेवाडी), अपक्ष
व्यंकटेश बंडेराव मुळीक (उत्तूर), अपक्ष
पंचायत समिती भादवण मतदार संघ :
जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट,भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे गट,साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष,विजया जनार्दन निऊंगरे (मडीलगे), अपक्ष,श्रीदेवी महादेव पाटील (गजरगाव), अपक्ष,वर्षा विकास बागडी (कोवाडे), अपक्ष
पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भारतीय जनता पार्टी,श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट,अस्मिता दत्तात्रय कांबळे,(कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी,जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष,मनीषा गोविंद गुरव (हरपवडे), अपक्ष,रेखा रणजीत पाटील (गवसे), अपक्ष,रूपाली धनंजय पाटील (साळगाव), अपक्ष,वंदना राजाराम पाटील (देवर्डे), अपक्ष,सुमन राजाराम पोतनीस (सातेवाडी), अपक्ष,यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष,रचना राजाराम होलम (पोळगाव), अपक्ष
पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :
समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी,कृष्णा विष्णू पाटील (होनेवाडी), शिवसेना ठाकरे गट,सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट,राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट,किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष,शंकर गोविंद कुराडे (लाकूडवाडी), अपक्ष
संजय अर्जुन तरडेकर (जेऊर), अपक्ष,बळवंत जानू शिंत्रे (आजरा), अपक्ष,अशोक मारुती शिंदे (मलिग्रे), अपक्ष,नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष,संजय बाळू सांबरेकर (चितळे), अपक्ष
जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट,शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष,वैशाली उमेश आपटे (उत्तूर), अपक्ष,परशुराम ईश्वर कांबळे (मडीलगे), अपक्ष,धनश्री मानसिंग देसाई (आजरा), अपक्ष,अश्विन अर्जुन भुजंग (जाधेवाडी), अपक्ष
जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी,विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट,सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट,सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष,संदीप मारुती चौगले (शिरसंगी), अपक्ष,रामचंद्र भिकू पाटील (घाटकरवाडी), अपक्ष,राजाराम पांडुरंग पोतनीस (सातेवाडी), अपक्ष,सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष,रणजीतकुमार सूर्यकुमार सरदेसाई (लाटगाव), अपक्ष.

निधन वार्ता
पांडुरंग डोणकर

नाईक गल्ली, आजरा येथील पांडुरंग गोविंद डोणकर (वय ९२ वर्षे) यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजी डोणकर यांचे वडील होत.
त्यांच्या मृतदेहावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विजय कातकर

मडिलगे ता.आजरा येथील मडिलगे ग्रामस्थ मंडळ, मुंबई चे उपाध्यक्ष विजय केरबा कातकर ( वय ५६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय व बहीण असा परिवार आहे.

महाराष्ट्र गौरव पुरस्काराने उत्तूरचे अनंत तिबिले सन्मानित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील अनंत तिबिले यांच्या अवयव दान व देहदान याची व त्यांना पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियाची दखल कोल्हापूर येथील मंथन फाऊंडेशनने घेतली . कोल्हापूर येथे झालेल्या मंथन फाऊंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अनंत तिबिले व त्यांच्या पत्नीला प्रा .किसनराव कुराडे संचालक शिवराज कॉलेज यांच्या हस्ते व फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शेळके यांच्या उपस्थितीत मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वच मान्यवरांनी अनंत तिबिले यांच्या देहदान व अवयवदान उपक्रमाचे कौतुक केले .



