mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरराजकीय

आता आमची सटकले… आमास्नी रागबी यायलाय…


आता आमची सटकली …. आमास्नी राग यायलाय….

 

ज्योतिप्रसाद सावंत

आता आमची खरच सटकलेय …. सटकल नाहीतर राहील..? बंटी आणि मुन्ना परत एक येळा आमनेसामने येणार म्हणून आमी मतदारांनी काय काय प्लॅनिंग केलं व्हत. उमेदवार कुणीबी असला तरी लढत बंटी आणि मुन्ना अशीच व्हणार व्हती. मुन्नाच्या घरातनच उमेदवार असावा म्हणून जोतीबासकट ठीक-ठिकाणी साकडंबी घातलं व्हतं. जोतिबानपण आमचा ऐकलंसुद्धा. दोन पारंपारिक इरोधक पुन्हा एकमेकांना भिडणार हे बघून मन कसं उडू उडू व्हायला लागलतं. मतदानाआधी व्हणारी सहल… खर्चासाठी टोकन म्हणून दिलेलं पैसं… समद कसं कल्पनेच्या पलीकड सुरू व्हतं. त्यो दाढीवाला बाबा म्हणतोय ते अच्छे दिन हेच असावंत असं वाटायला लागलंत. एकदा मतदान झालं की वरचा मजला बांधाय काढायसाठी इस्टिमेट आणलं व्हतं. सोन महाग झाल्यापास्न लई दिस दागिन्यांची खरेदी केली न्हव्ती. दिवाळीत सोनाराच्या दुकानातन मुद्दामच फेरफटका मारून आल्तो. काचेतला सोन्याचा गोफ कधी एकदा गळ्यात ईल असं वाटत व्हत. ‘सामान भराय लागा… गाड्या तयार हाईत’ असा चार दिसापूर्वी सांगावा आल्यानंतर गडबडीनं बॅगा भरल्या. पोरांटोरानी कायकाय आणायचं याचं लिस्टबी दिलं व्हतं. गाडीत बसलाव . आता पंधरा दिस नुस्त खायचं,प्यायचं आणि लोळायचं. मज्जाच मज्जा… तीबी पदरचा रुपयाबी खर्च न करता. आमच्यातल्या काही मंडळींनी तर अंडरपॅन्ट बन्यानसुद्धा नवच घ्यायला लावलं. दाताला लावायची पेस्ट,ब्रशसुद्धा नवीनच. लई भारी वाटत व्हतं. मागच्या येळच्या गमतीजमती ऐकून व्हताव. मागच्या येळपेक्षा सहा वर्षात महागाई दांडगी वाढली त्यामुळे उमेदवाराकडून घसघशीत लक्ष्मीदर्शन व्हणार हेदेखील दिसायल लागलतं. कधी एकदा मतदान हुतय आणि कधी एकदा लक्ष्मी दर्शन व्हईल असं झालतं. गाडीत बसल्यावर दोनच दिसात बिर्याणीवर ताव मारून तासभर पडावं असा बेत सुरु व्हता आन अचानक सांगावा आला ‘बंटीसायेब बिनइरोध निवडून आलं .गाप्पद-यान सगळीच खालीच बसलाव. काळजाचं पाणी पाणी झालं. बिर्याणीच्या जागी फोडणीचा भात दिसाय लागला. डोळ्यासमोर अंधारी आल्यागत झालं. गळ्यातला सोन्याचा गोफ कोणतरी वडून घेतल्याचा भास व्हाय लागला. कुणाची चारचाकी घ्यायची -हाणार.. तर कुणाचा मजला चढवायचा प्लॅन इसकटला. जोतीबाच्या डोंगराजवळ -हाणा-या दाढीवाल्या बाबानं म्हण पुढ व्हत निवडणूक बिनइरोध केली. आमच्या मनाचा जरा तरी इचार करायचा? बरं आमचं राहूदे त्या गाडीत बसवायला आलेल्या पोराटोरांचा तरी विचार करायचा… किती आशेनं पोरांनी साहित्याची लिस्ट दिलती. समदा इस्कोट करून टाकल्यानी. गावाकड जातानाबी जीवावर आल्त. कसबस घरात गेलाव. म्हातारा मेल्ता तवाबी नसल येवढी शोककळा घरावर पसरलीती. कवा आलसा म्हणून सुद्धा कुणी इचारल न्हाई. चार दिसापूर्वी सीमेवर युद्धाला चालल्यागत सगळी पोचवायला गाडीच्या भोवत्यान जमा झालीती. आता मात्र सैन्यातून पळून आलेल्या सैनिकाकड बघावं तसं सगळी बघायला लागल्यात. असं कधी असतय व्हय …? आता आमची खरंच सटकलेय आणि आम्हाला आता रागबी यायला लागलाय…       ………………(9637598866)………………..



संबंधित पोस्ट

बेकायदेशीर गाळे प्रकरणी सत्ताधारी नगरसेवकाचे उपोषण सुरू…. रामतीर्थ परिसरात लिंबुटाचन्यांचा खच…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दहावी बारावी परीक्षांचे  संभाव्य वेळापत्रक जाहीर…

mrityunjay mahanews

GROUND REPORT

mrityunjay mahanews

BIG BREAKING

mrityunjay mahanews

उत्तूर येथील दुचाकी अपघातात नवविवाहीत तरुणाचा मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!