mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हा

आजरा आंबोली मार्गावर गव्याची कारला धडक… दानोळी (चंदगड )येथे ६३ लाख ६९ हजार रूपयांची विज चोरी उघडकीस… जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

आजरा -आंबोली मार्गावर  गव्याच्या धडकेत कार चक्काचूर

शनिवारी पहाटेच्या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या गव्याने आजरा – आंबोली मार्गावर चारचाकीला जोरदार धडक दिल्याने चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.  शासकीय ठेकेदार के.सी. शिवाण्णा यांचा मुलगा दिपक शिवाण्णा हे या गाडीतून प्रवास करत होते . या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ग गाडीच्या पुढच्या बाजूचा मात्र चेंदामेंदा  झाला आहे. मुंबईहून कोल्हापूर मार्गे सावंतवाडीच्या दिशेने जात  असताना आंबोलीजवळील नांगरतास येथे हा अपघात झाला.

शिनोळी  येथे ६३ लाख ६९ हजारची वीज चोरी उघडकीस

शिनोळी (ता. चंदगड) येथील श्रीराम स्टील या उच्चदाब वीज जोडणीधारक ग्राहकाने वीज मीटरमध्ये फेरफार करीत ३ लाख ४० हजार ८०० युनिटची वीज चोरी केली असून त्याची रक्कम ६३ लाख ६९ हजार २५० रुपये इतकी होते. याकरीता त्याने रिमोटचा वापर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मालक प्रल्हाद जोशी यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.भरारी पथकाने १२ नोव्हेंबर रोजी शिनोळी येथील श्रीराम स्टील या उच्चदाब वीज जोडणी धारक ग्राहकाच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष केलेल्या तपासणीत वीज मीटरच्या सीटी व पीटी टर्मिनल बसविण्याचे ठिकाणी मीटर फुटला असल्याचे दिसून आले. हे मीटर तपासणीसाठी ग्राहक व पंचांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात आले. मीटरची ग्राहक व पंचासमक्ष मीटर तपासणी प्रयोग शाळेत तपासणी केली. तपासणी वेळी जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे रिमोट देऊन या रिमोटच्या साहाय्याने मीटरचा डिस्प्ले बंद-चालू करीत असल्याचे सांगितले. मीटर तपासले असता डिस्प्ले बंद पडून हे वीज मीटर १०० टक्के मंद गती होऊन विजेच्या वापराची नोंद मीटरमध्ये होत नसल्याचे दिसून आले. या पद्धतीने ग्राहकाने वीज चोरीच्या हेतूने वीज मीटरमध्ये फेरफार केला.५ महिने १२ दिवस इतक्या कालावधीत चोरी सुरू होती. या कालावधीत ३ लाख ४० हजार ८०० युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम ६३ लाख ६९ हजार २५० रूपये व तडजोड रक्कम ७५ लाख रूपये (मंजूर भारानुसार) एवढे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. ग्राहकास वीजचोरी व दंडाचे बिल दिलेले आहे.या वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

न्हावेलीत  गोवा बनावटीची एक लाख तीस हजाराची दारु हस्तगत

न्हावेली (ता. चंदगड)  येथे गोवा बनावटीच्या बेकायदा दारु साठ्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३० हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी न्हावेली येथील संतोष महादेव गावडे (पाटील) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित संतोष याने  घराच्या मागील बाजूस असलेल्या जनावरांच्या गोठ्यात  बेकायदेशीररित्या दारूसाठा करून ठेवला होता. पोलिसांना सदर माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. पोलीसांच्या  छाप्यावेळी संशयित पळून गेला. दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली झायलो गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्याचे पो.कॉ. युवराज संभाजी पाटील यांनी फिर्याद दाखल केली. स्पष्ट झाले आहे

रविवारी लोकशाहीर द.ना. गव्हाणकर स्मृती पुरस्काराचे वितरण

रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी महात्मा फुले स्मृतीदिनी लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती
पुरस्काराचे वाहरू सोनवणे यांना समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.पद्मश्री डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण होणार असून या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री नाम.हसन मुश्रीफ,खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर आमदार राजेश पाटील उपस्थितराहणार आहेत.महागोंड (ता.आजरा) येथे सकाळी ११.३०वा. सदर कार्यक्रम होणार आहे.

जिल्हा बँक निवडणुक कार्यक्रम

-अर्ज दाखल करणे -२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर

-छाननी-       ६ डिसेंबर

-माघार –       ७ ते २१ डिसेंबर

-मतदान-      ५ जानेवारी २०२२

-मतमोजणी- ७ जानेवारी

गजरगाव येथे हिरण्यकेशी नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू.

उंबरवाडी (ता.गडहिंग्लज) येथील सुधीर भरमगोंडा पाटील (वय २७ )हा तरुण बुधवार दि.२४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरात किरकोळ वाद करून घरातुन निघुन गेला होता. त्याचा शोध घेऊनही न मिळाल्याने गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.सुधीर याचा त्याचे कुटुंबीय शोध घेत असताना गजरगाव(ता.आजरा) येथील पुलावर सुधीर यांचे चप्पल आढळले. नदीपात्राची पाहणी केली असता सुधीर याचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना दिसले. याबाबतची वर्दी चंद्रकांत इराप्पा पाटील (वय ४३ धंदा- नोकरी रा. महागाव ता. गडहिंग्लज ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

संबंधित पोस्ट

आजरा तालूक्यातील उत्तूर येथे एकाची आत्महत्या..उत्तूर येथे मारामारी… एक जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास परिषद संपन्न…. भाजपाची मंगळवारी आजऱ्यात बैठक…उचंगी प्रकल्पस्थळी मंगळवारी धरणग्रस्त लढा परिषद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

इटे येथे घरफोडीत दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

error: Content is protected !!