आजरा साखर कारखान्याच्या वतीने परिसंवाद व ऊस परिषद संपन्न
आजरा सहकारी साखर कारखान्यामार्फत वतीने ऊस उत्पादन वाढीकरिता ऊस परिसंवादाचे आयोजन केले होते. सदर परिसंवादात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने- पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,राज्यात २३८ साखर कारखाने आहेत. पैकी ९६ साखर कारखाने सहकारी तत्त्वावर चालतात तर उर्वरित खाजगी आहेत. परंतु राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्पादन वाढीसंदर्भातील मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. याबाबत आजरा, गडहिंग्लज, चंदगड या विभागातील काही उत्कृष्ट शेतकऱ्यांची उदाहरण देत त्यांनी या शेतकऱ्यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या कडुन ऊस उत्पन्न कशा पद्धतीने घेतात याची माहिती घेतल्यास आपल्यालाही उतारा व उत्पन्न वाढवणे सोपे जाईल. जमिनीचे माती परीक्षण करून घेऊन त्या जमिनीत कोणते बियाणे लागण केल्यास चांगल्या प्रतीचे ऊस उत्पन्न येऊ शकते याचाही अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे. कारखाना अध्यक्ष सुनिल शिंत्रे म्हणाले, आजरा साखर कारखाना क्षेत्रात सध्या ३ लाख टन उसाचे उत्पादन आहे सदर क्षेत्रातून एकरी २५ ते ३० टन ऊस उत्पादन घेत आहे. कारखान्यास ऊस वाहतूक सर्व खर्च कमी करण्यासाठी जास्तीत जास्त उसाचे उत्पादन हे कारखाना जवळील शेत्रातील झाले पाहिजे त्यासाठी कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होऊन पर्यायाने कारखान्याकडे येणाऱ्या उसाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. तालुका कृषी अधिकारी के. एच. मोमिन, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत ,संभाजीराव इंजल आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अनंदराव कुलकर्णी कार्यकारी संचालक डॉ. डी. ए. भोसले, मुख्य शेती अधिकारी एस.आर चौगुले , सचिव व्यंकटेश ज्योती तसेच संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
लोकशाही श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने उद्या प्रकल्पस्थळी धरणग्रस्त लढा परिषद
राज्य शासनाच्या निर्णयाची जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही, काही निर्णयाबाबत स्पष्ट निर्देश असूनही जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करत आहे असा आरोप करत मंगळवार दिनांक ३० रोजी उचंगी प्रकल्पस्थळी धरणग्रस्त लढा परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कॉ. संजय तर्डेकर यांनी दिली. प्रकल्पासंदर्भात जिल्हा प्रशासन चुकीच्या पद्धतीने वागत आहे. कायद्याला बगल देऊन सर्व व्यवहार सुरू आहेत. गेल्या पाच-सात वर्षांत जिल्हा प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांची फक्त फसवणूक झाली आहे असेही कॉ. संजय तर्डेकर यांनी स्पष्ट केले. मंगळवारी होणाऱ्या या परिषदेत कॉ. धनाजी गुरव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपा कार्यकारिणीची मंगळवारी बैठक
भारतीय जनता पार्टी आजरा तालुका कार्यकारिणीची बैठक मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पंडित दीनदयाळ हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपा तालुकाधक्ष सुधीर कुंभार यांनी दिली आहे.या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख,आघाडी अध्यक्ष,सेल संयोजक तसेच सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही कुंभार यांनी केले आहे .
आता आमची सटकली …. आमास्नी राग यायलाय….
REPEAT MATTER
ज्योतिप्रसाद सावंत
आता आमची खरच सटकलेय …. सटकल नाहीतर राहील..? बंटी आणि मुन्ना परत एक येळा आमनेसामने येणार म्हणून आमी मतदारांनी काय काय प्लॅनिंग केलं व्हत. उमेदवार कुणीबी असला तरी लढत बंटी आणि मुन्ना अशीच व्हणार व्हती. मुन्नाच्या घरातनच उमेदवार असावा म्हणून जोतीबासकट ठीक-ठिकाणी साकडंबी घातलं व्हतं. जोतिबानपण आमचा ऐकलंसुद्धा. दोन पारंपारिक इरोधक पुन्हा एकमेकांना भिडणार हे बघून मन कसं उडू उडू व्हायला लागलतं. मतदानाआधी व्हणारी सहल… खर्चासाठी टोकन म्हणून दिलेलं पैसं… समद कसं कल्पनेच्या पलीकड सुरू व्हतं. त्यो दाढीवाला बाबा म्हणतोय ते अच्छे दिन हेच असावंत असं वाटायला लागलंत. एकदा मतदान झालं की वरचा मजला बांधाय काढायसाठी इस्टिमेट आणलं व्हतं. सोन महाग झाल्यापास्न लई दिस दागिन्यांची खरेदी केली न्हव्ती. दिवाळीत सोनाराच्या दुकानातन मुद्दामच फेरफटका मारून आल्तो. काचेतला सोन्याचा गोफ कधी एकदा गळ्यात ईल असं वाटत व्हत. ‘सामान भराय लागा… गाड्या तयार हाईत’ असा चार दिसापूर्वी सांगावा आल्यानंतर गडबडीनं बॅगा भरल्या. पोरांटोरानी कायकाय आणायचं याचं लिस्टबी दिलं व्हतं. गाडीत बसलाव . आता पंधरा दिस नुस्त खायचं,प्यायचं आणि लोळायचं. मज्जाच मज्जा… तीबी पदरचा रुपयाबी खर्च न करता. आमच्यातल्या काही मंडळींनी तर अंडरपॅन्ट बन्यानसुद्धा नवच घ्यायला लावलं. दाताला लावायची पेस्ट,ब्रशसुद्धा नवीनच. लई भारी वाटत व्हतं. मागच्या येळच्या गमतीजमती ऐकून व्हताव. मागच्या येळपेक्षा सहा वर्षात महागाई दांडगी वाढली त्यामुळे उमेदवाराकडून घसघशीत लक्ष्मीदर्शन व्हणार हेदेखील दिसायल लागलतं. कधी एकदा मतदान हुतय आणि कधी एकदा लक्ष्मी दर्शन व्हईल असं झालतं. गाडीत बसल्यावर दोनच दिसात बिर्याणीवर ताव मारून तासभर पडावं असा बेत सुरु व्हता आन अचानक सांगावा आला ‘बंटीसायेब बिनइरोध निवडून आलं .गाप्पद-यान सगळीच खालीच बसलाव. काळजाचं पाणी पाणी झालं. बिर्याणीच्या जागी फोडणीचा भात दिसाय लागला. डोळ्यासमोर अंधारी आल्यागत झालं. गळ्यातला सोन्याचा गोफ कोणतरी वडून घेतल्याचा भास व्हाय लागला. कुणाची चारचाकी घ्यायची -हाणार.. तर कुणाचा मजला चढवायचा प्लॅन इसकटला. जोतीबाच्या डोंगराजवळ -हाणा-या दाढीवाल्या बाबानं म्हण पुढ व्हत निवडणूक बिनइरोध केली. आमच्या मनाचा जरा तरी इचार करायचा? बरं आमचं राहूदे त्या गाडीत बसवायला आलेल्या पोराटोरांचा तरी विचार करायचा… किती आशेनं पोरांनी साहित्याची लिस्ट दिलती. समदा इस्कोट करून टाकल्यानी. गावाकड जातानाबी जीवावर आल्त. कसबस घरात गेलाव. म्हातारा मेल्ता तवाबी नसल येवढी शोककळा घरावर पसरलीती. कवा आलसा म्हणून सुद्धा कुणी इचारल न्हाई. चार दिसापूर्वी सीमेवर युद्धाला चालल्यागत सगळी पोचवायला गाडीच्या भोवत्यान जमा झालीती. आता मात्र सैन्यातून पळून आलेल्या सैनिकाकड बघावं तसं सगळी बघायला लागल्यात. असं कधी असतय व्हय …? आता आमची खरंच सटकलेय आणि आम्हाला आता रागबी यायला लागलाय… ………………(9637598866)………………..





आता आमची सटकली …. आमास्नी राग यायलाय….