mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

आजरा तालुक्यातून जिल्हा बँकेकरीता अशोक चराटी, सुधिर देसाई यांच्यासह पाच जणांचे अर्ज दाखल

 

जिल्हा बँकेकरीता अशोकअण्णा चराटी, सुधिर देसाई, मुकुंदराव देसाई, संभाजी पाटील, जनार्दन टोपले यांचे उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकरीता प्रथमच आजरा तालुक्यातून इतर मागास प्रवर्गासह पतसंस्था व इतर संस्था गटातुन उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. आज विकास सेवा संस्था गटातून अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्व. राजारामबापू देसाई यांचे चिरंजीव सुधीर देसाई यांनी तर इतर मागास प्रवर्गातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक संभाजी पाटील यांनी आणि पतसंस्था व इतर संस्था गटातून स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष व आजऱ्याचे माजी सरपंच, आजरा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक जनार्दन टोपले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज दाखल झालेल्या अर्जापैकी विकास सेवा संस्था गटातून विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी व राष्ट्रवादीचे सुधीर देसाई यांची उमेदवारी निश्चित असल्याने या दोघांमध्ये काटातोड लढत होणार आहे. पतसंस्था व इतर संस्था गटातून गेले सहा महिने निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने जनार्दन टोपले यांनी जोरदार तयारी केली आहे. या गटातून तालुक्यातून प्रथमच निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस केले जात आहे. संभाजी पाटील यांचेही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर सुधीर देसाई यांच्या उमेदवारी काही तांत्रिक अडचण आल्यास पर्याय म्हणून मुकुंदराव देसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेले सहा महिने जिल्हा बँकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आजरा तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठराव मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली आहे. अशोकअण्णा चराटी यांना अण्णा-भाऊ संस्था समूहाचे पाठबळ आहे तर सुधीर देसाई यांच्या पाठीशी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी नेटाने उभी राहण्याची शक्यता दिसू लागली आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

तोपर्यंत उचंगी धरणावर पाय ठेवू देणार नाही : प्रकल्पग्रस्तांचा इशारा

जोपर्यंत पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत उचंगी धरणावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा कॉ. धनाजी गुरव यांनी आज उचंगी प्रकल्पस्थळी झालेल्या निर्धार परिषदेवेळी बोलताना दिला. यावेळी बोलताना कॉम्रेड गुरव म्हणाले, एकदा प्रकल्पामध्ये पाणी अडवले की भविष्यात प्रकल्पग्रस्तांचे शिल्लक प्रश्न सुटण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. आज पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीमुळे  व ताकदीमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.शेवटच्या टप्प्यातील प्रश्न मार्गी लागण्याआधीच प्रकल्पात पाणी साठवणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.प्रकल्पग्रस्तांनी अशावेळी सावध राहून ताकदीने लढा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.जोपर्यंत शासनाकडून पुनर्वसनाबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत  प्रकल्पस्थळी संबंधितांना पाय ठेवू द्यायचा नाही असा निर्धारही या वेळी करण्यात आला.  कॉ.संजय तरडेकर, कॉ. अशोक जाधव, कॉ. शिवाजी गुरव यांनीही मार्गदर्शन केले परिषदेस उचंगी,जेऊर, चितळे, चाफवडे येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


आजरा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीकरता २१ डिसेंबर रोजी मतदान

आजरा तालुक्यातील कासार कांडगाव, एरंडोळ, धामणे, देऊळवाडी, गजरगाव, लाटगाव, लाकुडवाडी, हाजगोळी बुll, खोराटवाडी, चव्हाणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या विविध कारणांनी रिक्त असणार्‍या सदस्य पदांच्या जागांकरीता २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

जि. प., प.सं.मतदार संघाबाबत शासनाने धोरण जाहीर करावे : भूमिपुत्र युवा फाउंडेशन ची मागणी

आजरा तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांमध्ये घट होणार असल्याची चर्चा सध्या असून आजरा तालुका हा दुर्गम असून तालुक्यामधील गावे दुरवर डोंगर- वस्त्यांमध्ये विखुरलेली आहेत. त्यामुळे कांही मतदार संघ कमी करण्याचे शासनाचे धोरण जर अमलात आले तर शासनाच्या योजना व विकासासंदर्भातील धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे अडचणी चे होईल यामुळे याबाबत शासनाचे नेमके धोरण काय आहे हे समजण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींची बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी भूमिपुत्र युवा फाउंडेशन च्या वतीने आजरा तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र तहसीलदारांना देण्यात आले असून यावेळी मंगेश पोतनीस शैलेश मुळीक, रणजीत सरदेसाई, युवराज जाधव, संतोष चौगुले, सुनील दिवेकर, धनंजय पाटील, महादेव दिवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

⭕ आजच्या इतर महत्वाच्या बातम्या

 

 

❇️ क्रिकेटर शार्दुल ठाकुर अडकला विवाहबंधनात!

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने प्रेयसी मिताली परुळकरसोबत केला साखरपुडा, शार्दुलच्या साखरपुड्याला भारताचा रोहित शर्मानेही लावली उपस्थिती.

 

❇️ कंगनाला जीवे मारण्याची धमकी!

▪️सोशल मीडियावर अनेक धमक्या मिळाल्यावर कंगनाने दाखल केली FIR, इंस्टावर एफआयआरची कॉपी केली शेअर; बठिंडातील एका व्यक्तीने कंगनाला दिली उघड धमकी.

 

❇️ तुळजापुरात डान्सबारवर छापा!

▪️25 महिला, 64 ग्राहक, मालक अटकेत, रोख रकमेसह मुद्देमाल ताब्यात, डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत गजगा डान्सबार होता सुरू, पोलिसांनी रोख रकमेसह 17 चारचाकी व 05 दुचाकी वाहनांसह 1 कोटी 21 लाख 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

 

❇️ 12 खासदार निलंबन प्रकरण:

▪️12 खासदारांच्या निलंबनानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ, वैंकय्या नायडू म्हणाले, “यांना कोणताही पश्चात्ताप नाही”, निलंबन मागे घेण्यास नकार.

 

❇️ ’83’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज:

▪️लक्ष वेधून घेतो क्रिकेट वर्ल्ड कपच्या विजयावर आधारित ’83’ चा ट्रेलर, कपिल देव यांची भूमिका साकारत रणवीर सिंग अभिनित चित्रपटाच्या या ट्रेलरला 2 तासांत तब्बल 10 लाख व्ह्यूज.

 

❇️ मुंबईत शाळा 15 डिसेंबरपासून!

▪️मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या परवानगीने मुंबईतील पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबरपासून सुरू होणार.

 

❇️ ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एकाही रुग्णाची नोंद नाही?

▪️देशात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या एकाही रुग्णाची नोंद नाही; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची राज्यसभेत माहिती.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘न्यूजमेकर्स ‘ग्रुपच्या’ वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मृत्युंजय ‘महान्यूज’ या पोर्टल चॅनलचे आमदार प्रकाश आबिटकर , जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते व ‘गोकुळ’च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, आजरा साखर कारखान्याचे संचालक सुधीर देसाई, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, नगरसेवक आलम नाईकवाडे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले,माजी पं.स. सभापती मसणु सुतार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, विजयकुमार पाटील, विलास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाटंगी(ता.आजरा) येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह विहिरीत आढळला.

mrityunjay mahanews

केबीसी मधून उत्तूर येथील तरुणास २५ लाख…? आजरा येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी १७.५० कोटींचा निधी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!