मंगळवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२४

सर्वसामान्यांच्या चुली पेटवण्याचे काम आमदार आबिटकर यांनी केले
पत्रकार बैठकीत मुस्लिम कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा शहरासाठी विकास कामांकरिता करोडो रुपयांचा निधी आला आहे. निधी देताना आज-यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासह सर्वधर्मीय बांधव रहातात हे गृहीत धरूनच निधी दिलेला आहे. त्यामुळे केवळ मुस्लिम समाजाला निधी दिला नाही असे म्हणणे चुकीचे आहे. मुस्लिम बांधवांनी मागणी केलेली कामेही पूर्णत्वास जात आहेत. यामध्ये प्राधान्याने रस्ते, गटर्स, हायमॅक्स, संरक्षक भिंती, सांस्कृतिक सभागृह आदी कामांचा तर समावेश आहेच परंतु त्याचबरोबर अगदी रोजच्या जीवनाशी निगडित विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात आबिटकर अग्रेसर राहिले आहेत. अनेक मुस्लिम बांधवांच्या चुली अप्रत्यक्षरीत्या पेटवण्याचे काम आम. आबिटकर यांनी केले आहे. अशा शब्दात मुस्लिम कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत आमदार आबिटकर यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.
यावेळी मौजिद माणगावकर, शरीफ खेडेकर,असीफ पटेल कुदरत लतीफ, इरफान काजी, करीम माणगांवकर, अमजद माणगावकर आदींनी आपली मते मांडली.
कांही राजकीय मंडळींच्या उदासीनतेमुळे मुस्लिम समाज आजतागायत विकासापासून वंचित राहिला आहे. केवळ राजकारणामुळे अनेक कामे रखडली आहेत. पंधरा-सोळा वर्षाच्या मुलांना गवंडी आणि सेंट्रींग कामावर जाण्याची वेळ आली आहे हे वास्तव नाकारता येत नाही. अशावेळी मुस्लिम समाजासाठी विकास कामे करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आमदार आबिटकर यांच्याकडे विकास कामांचा पाठपुरावा करण्यात आपणच काही अंशी कमी पडलो अशी कबुलीही कार्यकर्त्यांनी दिली.
आमदार आबिटकर यांच्यापूर्वी प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींनी केवळ व्होट बँक समजून समाजाकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु समाजाला तुम्हाला काय हवे व त्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केवळ आम. आबिटकर यांनीच केले. जितेंद्र भोसले, संतोष भाटले, विजय थोरवत या त्यांच्या कार्यकर्ते मंडळींनी तर आमदारांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या प्रत्येक बांधवांसाठी वेळोवेळी विविध दाखले, विकास कामे, शासकीय योजना मिळवून देण्यासाठी शक्य ते सहकार्य केले आहे. अशावेळी आमदारांनी मुस्लिम समाजाकरता कांहीच केले नाही असे म्हणणे चुकीचे होईल असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार बैठकीस जुबेर माणगावकर, करीम कांडगावकर, जुबेर सोनेखान, बबलू शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आबिटकर यांच्या विजयाचा गुलाल आजर्यातून उडेल
कामांच्या बळावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आमदार आबिटकर यांच्या विजयाचा गुलाल आजरा शहरातून उडेल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यंदा दीडपट पाऊस घर व गोठ्यांसह शेतीचे मोठे नुकसान
सुमारे ५०० घरांची तर २५ गोठ्यांची पडझड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत दीडपट पाऊस झाला असून पाऊस अद्याप सुरूच असल्याने पावसाचे प्रमाण दुप्पटीवर जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे सुमारे पाचशे घरांची पडझड झाली असून २५ गोठेही कोसळले आहेत. यामध्ये मोडक कृषी वाले येथील म्हशीचा मृत्यू वगळता कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
गतसाली पाऊस १४०० मिलिमीटरच्या आसपास स्थिरावला होता. मुळातच पाऊस कमी झाल्याने शेती पिकांचे वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नव्हते. यावर्षी मात्र पावसाने २००० मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. पाऊस अद्याप सुरूच आहे. वेळोवेळी झालेला जोरदार पावसामुळे तालुक्यात अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली असून सप्टेंबर अखेरपर्यंत झालेला पाऊस हा समाधानकारक म्हणावा लागेल. मात्र सात ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाने झोडपण्यास सुरुवात केली आहे.अद्यापही पाऊस थांबलेला नाही. पावसामुळे शेती पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. पावसामुळे ४०० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.
गळीत हंगाम लांबला…
सध्या सुरू असणारा जोरदार पाऊस व समोर असणाऱ्या विधानसभा निवडणुका यामुळे पंधरा दिवसापूर्वी बॉयलर अग्निप्रदिपन होऊनही आजरा साखर कारखान्याला प्रत्यक्ष गळीत शुभारंभास किमान नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याची वाट पहावी लागणार आहे.
पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याची गरज…
विधानसभा निवडणुकांमुळे शासकीय कार्यालयातील प्रमुख कारभारी मंडळी निवडणूक कामात व्यस्त आहेत परंतु सध्या सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तूर येथे पथसंचलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हिंदू समाज, हिंदू संस्कृती, आणि हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हिंदू समाजाने एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जिल्हा तरूण व्यवसायी कार्यप्रमुख कौशिक पाध्ये यांनी केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उत्तुर आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उत्तूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी शिवलिंग सन्ने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाध्ये यांनी,संघ शताब्दी वर्षात प्रवेश करीत असताना संघाने राबविलेल्या समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण या गतिविधीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य संघ स्वयंसेवकांनी करावे असे आवाहन केले. यावेळी पाध्ये यांनी संघाने विविध क्षेत्रात केलेल्या उललेखनीय कार्याची माहिती उपस्थितांना करुन दिली. दरम्यान यावेळी नेहरू चौक येथून सुरुवात करुन गावातली प्रमुख मार्गावरून निघालेले पथसंचलन लक्ष्यवेधी ठरले. यावेळी संचलनात असलेल्या ध्वजावर जागोजागी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी केली.
आजरा, बहिरेवाडी, मुमेवाडी, धामणे, वडकशिवाले, बेलेवाडी, महागोंडवाडी, मलिग्रे, हालेवाडी, चव्हाणवाडी, हरपवडे येथून आलेल्या जवळपास दोनशे स्वंयसेवकांनी या पथ संचलनात सहभाग घेतला.

धन्वंतरी हॉस्पिटलचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील धन्वंतरी हॉस्पिटलचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. राज्य शासनाच्या वित्त विभागाचे माजी संचालक जी. के. नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. धीरज नाईक व डॉ. चैत्रा नाईक, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी धन्वंतरीच्या प्रतिमेचे पुजन केले.
यावेळी डॉ. धीरज नाईक यांनी गतवर्षभरात आरोग्याबाबत तालुकास्तरावर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली. हॉस्पिटलच्या उद्घाटनापासून सुमारे दहा हजार रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ झाल्याचे सांगीतले. भविष्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना अद्ययावत उपचार देण्याच्या दृष्टीने आयसीयु सेंटरसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी विजय गुरव, रणजीत कालेकर, बाळकृष्ण पाटकर, सोपान विश्वास, संजय सुतार, श्रावण कांबळे यांच्यासह मान्यवर व रुग्ण उपस्थित होते. संजय पाटील यांनी आभार मानले.

कु.नंदिनीचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजीराव सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आजरा,या संस्थेतील अन्न आणि पेय सेवा सहाय्यक ( Food Beverages & Services Assistance) या व्यवसायातील सत्र २०२३-२४ मधे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये कुमारी नंदिनी भिकाजी मिसाळ रा. चित्रानगर/आजरा हिने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल तिचा दिल्ली येथे यांचे मार्फत २६ ऑक्टोबर २०२४ रोजी दिल्ली येथे जाहीर सत्कार होणार आहे.

बेकायदेशीरपणे केलेले रेकॉर्डिंग कोर्टात पुरावा मानले जाते का ?
जाणून घ्या काय सांगतो भारतीय कायदा?

अनेक वेळा एखाद्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात ज्या कायदेशीर नाहीत. जर कोणी तुम्हाला फोनवर किंवा उघडपणे धमकी देत असेल आणि तुम्हाला ती धमकी रेकॉर्ड करायची असेल तर हे असे समजून घ्या. पण त्याला माहीत नसेल अशा पद्धतीने रेकॉर्ड करायचे असेल तर हे काम गुपचूप कराल. मात्र असे करणे कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही कोणालाही त्यांच्या परवानगीशिवाय कॉल किंवा रेकॉर्ड करू शकत नाही. आता अशा परिस्थितीत एखाद्या खटल्यात असे रेकॉर्डिंग सादर केले तर न्यायालय त्याला खरा पुरावा मानणार का? त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या….
प्रथम भारतीय पुरावा कायदा समजून घ्या
पुराव्याचे प्रकार आणि त्यांच्या स्वीकृतीचे नियम भारतीय पुरावा कायदा, 1872 मध्ये लिहिलेले आहेत. या कायद्यांतर्गत कायदेशीरदृष्ट्या मान्य असलेले सर्व प्रकारचे पुरावे न्यायालयात सादर करता येतात. तथापि, जेव्हा बेकायदेशीर रेकॉर्डिंगचा विचार केला जातो तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
हे दोन विभागही लक्षात ठेवायला हवेत….
भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65 B अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयात सादर करण्यासाठी, ते योग्यरित्या गोळा करणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणतेही रेकॉर्डिंग केले असल्यास त्याची सत्यता न्यायालयात सिद्ध करावी लागेल. सोप्या भाषेत, रेकॉर्डिंगमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही आणि ती योग्य प्रक्रियेनुसार रेकॉर्ड केली गेली आहे हे दाखवावे लागेल.
त्याचप्रमाणे कलम 71 अन्वये न्यायालयात सादर केलेल्या पुराव्याची ग्राह्यता निश्चित केली जाते. जर रेकॉर्डिंग बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केले असेल तर ते न्यायालयात ओळखले जाणार नाही. तथापि, काही प्रकरणांमध्ये न्यायालय अशा रेकॉर्डिंगला पुरावा म्हणूनही मान्यता देते. 2023 मध्ये, 30 ऑगस्ट रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आपल्या एका निर्णयात म्हटले होते की, आता बेकायदेशीर फोन रेकॉर्डिंग देखील न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले जाऊ शकतात. तथापी, या प्रकरणात ते बेकायदेशीर फोन रेकॉर्डिंगबद्दल होते, व्हिज्युअल रेकॉर्डिंगबद्दल नाही.
(viral news…online news)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



