mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार

१ ऑगस्ट २०२६

जिल्हा जाती पडताळणी समितीकडून नगरसेविका रहिमतबी खेडेकर यांचा जातीचा दाखला अवैध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा जाती पडताळणी समितीने आजरा येथील विद्यमान नगरसेविका सौ. रहिमतबी सलीम खेडेकर यांचा ‘दर्जी ‘ जातीचा इतर मागास प्रवर्गाचा दाखला अवैध ठरवला आहे.

प्रभाग ३ मधून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या माजी नगरसेविका सौ. सुमैय्या अमित खेडेकर यांनी पुराव्यासह समितीकडे तक्रार केली होती. समितीने सुमैय्या यांनी सादर केलेली कागदपत्रे तपासून हा निर्णय दिला.

या निर्णयामुळे रहिमतबी खेडेकर यांच्या नगरसेविका पद अडचणीत आले आहे. दरम्यान त्यांनी या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सौ. खेडेकर या आजरा नगरपंचायतीतील एकमेव नगरसेविका आहेत आणि त्यांनी यापूर्वीच सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला आहे.

एकतर्फी विजय…

सौ. रहिमतबी खेडेकर यांनी नगरपंचायत निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे. गेली वीस – पंचवीस वर्षे त्या ग्रामपंचायत व त्यानंतर नगरपंचायतीमध्ये सदस्य म्हणून जाण्याकरिता प्रयत्नशील होत्या. यावेळी त्यांना मतदारांनी चांगलीच साथ दिली होती. परंतु अखेर जातीच्या दाखल्याने या आनंदावर पाणी पडले आहे.

दूध उत्पादकांना मताचा थेट अधिकार मिळावा यासाठी चळवळ उभा करण्याचा निर्धार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

दूध उत्पादक सभासदांना येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत थेट मताचा अधिकार मिळाला पाहिजे याबरोबरच गोकुळच्या एकूण कारभारावर सभासदांचा दबाव तयार झाला पाहिजे आणि निवडणुकीमध्ये ५०० कोटीच्या वर होणाऱ्या खर्चावर आळा घातला पाहिजेत यासाठी चळवळ उभा करण्याचा निर्धार आज आजरा येथे श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर झालेल्या दूध उत्पादक सभासदांच्या बैठकीत करण्यात आला. लवकरच दूध उत्पादक सभासदांचा व्यापक मेळावा घेऊन याबाबतची लढ्याची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे.

बैठकीत सुरुवातीला कॉम्रेड संजय तरडेकर यांनी या बैठकीमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले गोकुळच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा घोडेबाजार चालू आहे तो थांबला पाहिजेत आणि सभासदांना मताचा थेट अधिकार मिळाला पाहिजेत यासाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी आजची बैठक आयोजित केली आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजीराव देसाई यांनी काही तांत्रिक मुद्द्यांची स्पष्टता करत जोपर्यंत दूध उत्पादक गोकुळचा थेट सभा होत नाही तोपर्यंत त्याला मताचा अधिकार मिळणार नाही म्हणूनच ही लढाई सरकार बरोबर करून दूध उत्पादकांना मताचा थेट अधिकार मिळवून देणारी आहे त्यातूनच संचालक आणि प्रशासनावर दबाव तयार होईल त्यामुळे ही चळवळ आपण व्यापक स्तरावर नव्या

यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले की १० ऑगस्ट रोजी ठीक ११.०० वाजता मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत सभागृह आजरा येथे होणारा मेळावा यशस्वी करून आपण ही चळवळ व्यापक बनवूया.त्याची तयारी जोरदार करूया.

यावेळी नामदेव फगरे, कॉ शांताराम पाटील, शिवाजीराव इंगळे, प्रकाश मुरुस्कर, संजय राव देसाई, ज्ञानदेव गुरव, महादेव सुतार, हिंदुराव कांबळे, दिगंबर होरंबळे, प्रकाश दोरुगडे, संतोष शेटगे, देविदास शेटगे यांच्यासह शेतकरी दूध उत्पादक उपस्थित होते

मंगळवारी आजऱ्यात रक्तदान शिबिर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष स्व. राजारामबापू देसाई यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशन आजरा यांच्या वतीने मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत दालन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदात्यांनी या शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी, उपाध्यक्ष युवराज पोवार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

छाया वृत्त

आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित तोडकर यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार समारंभ जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चाराटी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

निधन वार्ता
सुमन धुरी

दर्डेवाडी ता. आजरा येथील सुमन गणपती धुरी ( वय ५५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आजरा अर्बन बँकेचे कर्मचारी प्रसाद धुरी यांच्या त्या आई होत.

       आजचे पंचांग 

दिनांक : १ ऑगस्ट २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : तृतीया तिथी (रात्री ११.०७ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (रात्री ०८.४४ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : शोभन योग (रात्री ११.२२पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : वाणीजा करण (सकाळी १०.५२ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३१ ते सकाळी ११.०८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यातील युवक अपघातात ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!