

आजऱ्यातील गणेश बनणार करोडपती???

आजरा येथील गणेश प्रभाकर जाधव या महाविद्यालयीन तरुणाला ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील कोण बनणार करोडपती? या ज्ञान व मनोरंजनावर आधारित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली असून सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गणेश याने केवळ स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर या कार्यक्रमात मिळवलेला प्रवेश हा नागरिकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनला आहेच परंतु त्याच बरोबर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवाजी नगर(नबापूर) येथे राहणाऱ्या गणेश याने येथील आजरा हायस्कूल व आजरा महाविदयालयातून शिक्षण घेऊन सध्या संत गजानन महाराज शिक्षण संस्था महागाव येथे बी.टेक. करत आहे. त्याने मोठ्या प्रयत्नातून या कार्यक्रमात प्रवेश मिळवला आहे. सध्या या कार्यक्रमाचे एक ट्रीझर प्रदर्शित झाले असून यामध्येही गणेश याचे दर्शन होताना दिसते.तेरा जून रोजी त्याचा सहभाग असणारा या कार्यक्रमाचा भाग प्रसारित होणार असल्याचेही त्याने सांगितले.
चाळोबावाडी येथील वर्ग खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर …खाजगी व्यक्तीने वर्गखोलीचा ताबा घेतल्याने विद्यार्थी वाऱ्यावर…
पंचवीस वर्षांपूर्वी आजरा तालुक्यातील किणेपैकी चाळोबावाडी येथील वर्गखोली शासकीय खर्चातून बांधण्यात आली होती.
२५ वर्षानंतर आजही या वर्ग खोलीचे हस्तांतरण झालेले नाही. परिणामी या वर्गखोलीमध्ये वांजोळे नावाचे कुटुंबीय वास्तव्य करीत आहेत. केवळ शासकीय अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे या वर्ग खोलीचे हस्तांतरण राहिल्याने व कांही मंडळींच्या वरदहस्तामुळे या वर्गखोलीत खाजगी कुटुंबीय वास्तव्य करत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
एकीकडे वर्गखोली उपलब्ध नसल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जुजबी भाड्यावर मिळेल त्या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत आहे तर दुसरीकडे बेकायदेशीररित्या वांजोळे कुटुंबीय हे या खोलीत बिनधास्तपणे वास्तव्य करीत आहे. असा विचित्र विरोधाभास येथे दिसू लागला आहे. शासनाने खाजगी व्यक्तींना वापरण्यासाठी ही खोली बांधली का?असा प्रश्नही आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. या इमारतीचा बेकायदेशीररित्या वापर करणा-यांवर, त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर वसंत नाईक, विजय नाईक, अनिल वांजोळे,संजय गावडे, पांडुरंग वांजोळे, साधना वांजोळे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
सुनील बावन्नावर सेवानिवृत्त

आजरा अर्बन बँकेचा वसुली व कायदा विभाग सांभाळणारे सुनील बळवंत बावन्नावर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून बँकेत ,अकौटंट, शाखाधिकारी तसेच मुंबई व कोल्हापूर विभागाकडे विभाग प्रमुख अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे.
बँकेच्या वसुलीचे उत्कृष्ट काम करून बँकेच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या बावन्नावर यांचे बँकेच्या प्रगतीत मोठे योगदान राहिले आहे. बँकेच्या वसुली कामात अत्यंत चिकाटीने काम करून थकबाकीचे प्रमाण कमी करण्यामध्ये त्यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होते. त्यांच्या या कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स वसुली अधिकारी संघटना, कोल्हापूर यांनी त्यांना मानाचा गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
वसुलीकामी निर्भीडपणे काम करणाऱ्या बावन्नावर यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा आजरा अर्बन बँकेच्या एकंदर वाटचालीत उमतवला आहे हे निश्चित.

CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के महत्व ; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

राज्यातील अभियांत्रिकी, फफार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम अर्थात सीईटी (CET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे ५० टक्के गुण आणि सीईटीचे ५० टक्के गुण एकत्रित करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. पुणे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी विद्यार्थी सीईटी परीक्षांची तयारी करतात, मात्र बारावीच्या परीक्षेकडे त्यामुळे दुर्लक्ष केले जाते.
बारावी बोर्ड परीक्षेचे महत्व अबाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे गेल्या काही कालावधीपासून होता. दरम्यान, बारावीनंतर राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सद्यस्थितीत विविध अभ्यासक्रमांसाठी तब्बल १६ विविध प्रकारच्या सीईटी घेतल्या जातात. ही संख्या देखील कमी करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.




