


विजेच्या धक्क्याने शेतकर्यांचा मृत्यू ; आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथील घटना

आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथे झाडाच्या फांद्या तोडत असताना शंकर धाकू माडभगत वय (४१) याना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला .

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास
शंकर माडभगत हे आपल्या गट नं. २२२ मधील शेतातील झाडांच्या फांद्या तोडत होते या वेळी झाडाची फांदी विद्युत प्रवाहित झाल्याने माडभगत यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची वर्दी उत्तम तुकाराम माडभगत यांनी आजरा पोलिसांत दिली आहे पुढिलत तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता शिंदे करीत आहेत त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील व एक बहीण ,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

कोळींद्रे येथून एकजण बेपत्ता
कोळींद्रे (ता. आजरा) येथून हणमंत तुकाराम पाटील (वय वर्ष 55) ही व्यक्ती बेपत्ता झाली आहे. याबाबतची वर्दी त्यांची पत्नी सौ. लता पाटील यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
हणमंत पाटील हे 26 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घरातून निघून गेले आहेत ते अद्याप परत आले नसल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.


