

खाजगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला आवरा…
चंदगड,आजरा,
गडहिंग्लज , भुदरगड तालुक्यातील मुंबईकरांचे मंत्री मुश्रीफ यांना साकडे

आजरा: प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्र राज्य प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव पुरी तसेच कोल्हापूरवासीय प्रवासी संघटना,मुंबईचे शिष्टमंडळ मच्छिंद्र पाटील, आनंद देसाई आणि प्रमोद ज्ञानोबा हवालदार या सर्वानी कोल्हापूर जिल्ह्य़ातील चार तालुक्यातील रहिवाशी तसेच चारही तालुक्यातील मुंबईत नोकरी धंद्यानिमित्य स्थायिक असलेल्या रहिवाशांची खाजगी ट्रॅव्हल्सवाले लुटमारी करत असल्याचा आरोप करून त्यापासून वाचवण्यासाठी कोल्हापूरचे पालक मंत्र्यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत हे प्रकार थांबवण्यासाठी साकडे घातले आहे.
खाजगी लक्झरी बसवाले प्रवाशांचा गैरफायदा घेत ऐन हंगामामध्ये या मार्गावर स्लीपरकरीता १८००/-ते २०००/- रू. घेतात सिंटीगकरीता १०००/- ते १२००/- रू. प्रती प्रवासी आकारणी करतात. आणि हंगाम संपला की स्लीपरवाले १०००/-११००/- रू.दर आकारतात आणि सिंटींगवाले ७००/-८००/- रु. दर आकारतात. मात्र एसटी महामंडळाच्या लालपरी चे हंगाम असू दे अथवा नसू दे तिकीट ७५०/- रू.आणि निमआराम (हिरकणी)९००/- रू. घेतात आणि एस्.टी.ला जेष्ठ नागरिकाला अपंगाला आणि महिलांनाही अर्धे तिकीट आहे. असे असूनही रापमचे वरिष्ठ अधिकारी एस् टी बंद का करते? खाजगी लक्झरीवाल्या मालकांशी मुंबई मार्गावरील या तालुक्यातील फेऱ्या बंद असल्याचा आरोपही करण्यात आला.
आजरा,चंदगड गडहिंग्लज या तीन तालुक्यातून एकच हात्तिवडे-आजरा-परेल तीही एकच गाडी चालू आहे!आणि प्रायव्हेट लक्झरी बस ३८ ते ४० बसेस मुंबई-ठाणे-बोरीवली-विरर-कल्याण-बदलापूर धावत आहेत हे देखील मंत्री मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना पत्र देऊन या मार्गावरील लाल परीसह, हिरकणी व अन्य बसेस तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
गावी यायचे की नाही…?
महिन्याभरात परीक्षांचा हंगाम सुरू होत आहे. परीक्षा संपतील तसतसे चाकरमानी उन्हाळी सुट्टी करता गावी परतू लागतात. परंतु एसटी महामंडळाच्या फेऱ्या नसल्याने नाईलाजाने खाजगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो. या ट्रॅव्हल्स धारकांकडून मनमानी पद्धतीने चार्जेस आकारले जातात. हे चार्जेस इतके असतात की एका चौकोनी कुटुंबाला जाण्या -येण्याचा खर्च दहा ते बारा हजार रुपये इतका करावा लागतो. यामुळे गावी सुट्टीला यायचे की नाही ? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.


शाश्वत विकासाच्या संकल्पना समजावून घेवून काम करा:संजय ढमाळ
आजऱ्यात शाश्वत विकासावरील कार्यशाळेला प्रारंभ

आजरा: प्रतिनिधी
शाश्वत विकासाबदल संयुक्त राष्ट्र संघटनेने पुढाकार घेतला आहे. आपल्या देशातही याबाबत उपक्रमांना सुरूवात झाली आहे. शाश्वत विकासाची मार्गदर्शक तत्व स्पष्ट करण्यात आली आहेत. त्याबाबतच्या संकल्पना व ध्येय प्रशिक्षणार्थीनी समाजावून घेवून गावापातळीवर काम करावे व गावचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी केले.
येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन २०२३-२४ अंतर्गत आमचं गाव आमचा विकास अंतर्गत तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ झाला. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी श्री. ढमाळ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. श्री. ढमाळ म्हणाले, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२३-२४ आमचं गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावयाचा आहे. शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करावायाचे आहे. यातून गाव, तालुका व जिल्ह्याचा विकास साधावयाचा आहे. याबाबतच्या ९ संकल्पना व १७ ध्येय समजावून घेतली पाहीजेत. त्याबाबत प्रशिक्षणार्थीनी अभ्यास करावा, यावेळी यशदा प्रविण प्रशिक्षक काशिनाथ मोरे यांनी ९ संकल्पना व १७ ध्येय याच्यावर मार्गदर्शन केले. तायाप्पा कांबळे, अभय अदित्य, अर्जुन अदित्य यांनी मार्गदर्शन केले.
विस्तार अधिकारी श्री. सिताप, सोहाळे सरपंच भारती डेळकर, पेरणोली सरपंच प्रियांका जाध, देवर्ड संरपच कल्पना चाळके, भादवण माजी सरपंच संजय पाटील, रावसाहेब देसाई, शिवाजी बोलके, विनायक आमणगी, सुभाष विभूते, रविंद्र नावलकर, मुरलीधर कुंभार संदिप चौगले, दिग्वीजय देसाई, तेजस्वीनी देसाई यासह सरपंच, उपसरंपच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, आशा श्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


भाजपा आजरा शहर महीला मोर्चा आघाडी अध्यक्षपदी माधवी पाचवडेकर

आजरा:प्रतिनिधी
भाजपाच्या आजरा शहर महिला मोर्चा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी माधवी दयानंद पाचवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.अनिता चौगुले, महीला जिल्हा अध्यक्ष , सुनिता रेडेकर,जिल्हा उपाध्यक्षा,ज्योत्स्ना चराटी, जिल्हा उपाध्यक्ष, संयोगिता बापट,जिल्हा सरचिटणीस, वर्षा बागडी तालुका अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
अन्य कार्यकारणी पुढीलप्रमाणे…
अदिती गुरुप्रसाद टोपले-कोषाध्यक्ष
अश्विनी विजय कांबळे-उपाध्यक्ष
स्वाती सुनिल देसाई_उपाध्यक्ष
मेघा वैभव लाड-सरचिटणीस
भारती देवीदास देसाई -चिटणीस
गिता दिलीप सावंत-सरचिटणीस
वैषाली चंद्रकांत पाटील-चिटणीस
सरिता नंदकुमार शिंदे-चिटणीस
अस्मिता समिर जाधव-चिटणीस
यावेळी माधुरी पाचवडेकर, महीला शहर अध्यक्ष, आशा देवार्डे, जिल्हा सरचिटणीस,
अशोकआण्णा चराटी जिल्हा उपाध्यक्ष ,अनिरुद्ध केसरकर तालुका अध्यक्ष, अभिजित रांगणेकर शहर अध्यक्ष, शुभम पाटील युवा मोर्चा शहर अध्यक्ष, संग्राम पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, रुपेश परीट युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष, उमेश पारपोलकर तालुका संघटन सरचिटणीस आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


शिरसंगी येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

आजरा:प्रतिनिधी
शिरसंगी येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात पार पडला.
गेले आठ दिवस सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विविध प्रवचन व कीर्तनकारांच्या कार्यक्रमाने उत्साहात पार पडला. दीपोत्सव कार्यक्रमांमध्ये व्यासपीठ अधिकारी म्हणून बाळासाहेब सुतार यांनी प्रवचन केले.
यावेळी सरपंच संदीप चौगले यांनी दरवर्षी साजरा होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे युवक वर्गामध्ये अध्यात्मामुळे गावातील व्यसनाधींचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले.
आजरा कारखान्याचे संचालक सुभाष देसाई, माजी संचालक दिगंबर देसाई भाजपचे जिल्हा सरचिटणीस सी. आर. देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. महाप्रसादाचे देणगीदार सी. आर. देसाई यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ह. भ. प. बाळासाहेब रानमाळे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सडेकर, भीमराव सडेकर, मारुती कुंभार, भीमराव कानडे, विजय देसाई, अमृत देसाई, शेतकरी संघाचे संचालक मधुकर येलगार, दीपक चौगुले, निलेश सुतार, दत्तात्रय कांबळे संतोष चौगुले, उपसरपंच पांडुरंग टाकेकर, वसंत सुतार, अशोक चौगुले, सागर कुंभार बळवंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.


देवर्डे हायस्कूलचा चित्रकला परीक्षेत १००,% निकाल

आजरा: प्रतिनिधी
देवर्डे, ता.आजरा येथील श्री रवळनाथ हायस्कूलचे शासकीय चित्रकला परीक्षेत ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
इलेमेंटरी परीक्षेकरिता २७ तर इंटरमिजिएट मध्ये ६० विद्यार्थी यशस्वी झाले. ‘अ’ श्रेणी मध्ये सायली कांबळे ‘ब ‘श्रेणीमध्ये दूर्वा दिवेकर सुरज तेजम, कार्तिक चाळके, जीवन कासले, महिमा पाटील, करण ढोकरे उत्तीर्ण झाले.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुख्याध्यापक सुभाष सावंत यांचे प्रोत्साहन तर कलाशिक्षक राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन मिळाले.



