
आजऱ्यात तलाठी
मृतावस्थेत आढळले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कुंभार गल्ली, आजरा येथे भाडोत्री घरात राहणारे राजेश आत्माराम राठोड हे ३२ वर्षीय तलाठी आज राहत्या घरी मृतावस्थेतत आढळले .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आजरा महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असणारे राजेश राठोड हे येथील कुंभार गल्ली मध्ये एका भाडोत्री घरामध्ये वरच्या मजल्यावर राहत होते. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने त्यांना पाहण्यासाठी घर मालक गेले असता ते मृतावस्थेत आढळून आले. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून ते अकोला जिल्ह्यातील असल्याचे समजते. आजरा पोलिसांकडून याबाबतचा प्राथमिक तपास सुरू आहे. अधिक चौकशी केली असता राठोड हे गेले कांही दिवस विनापरवाना कामावर गैरहजर असल्याचेही समजते.

