


लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्यांच्या पातळीवरचा लढा शांततेच्या मार्गाने हाणून पाडणार-डॉ.भारत पाटणकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कष्टकरी वर्गासाठी घेतलेली संविधान परिषद ही ग्रामीण भागात होणे मोलाची गोष्ट आहे. राबणाऱ्या-कष्टकरी जनतेच्या, न्याय्य अधिकार-हक्कासाठी व लोकशाहीत स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठीची चळवळ नेटाने हिंदू- मुस्लिम एकत्र येऊन करणार करणार आहोत.लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्यांच्या पातळीवरचा लढा शांततेच्या मार्गाने हाणून पाडणार असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
आजरा येथे भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क व अधिकारासाठी तसेच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव” याबाबतीत “संविधान परिषद” मौलाना आझाद संविधान गट ,संविधान सन्मान परिषद आणि मुक्ती संघर्ष समिती यांच्या वतीने घेण्यात आली, यावेळी डॉ. भारत पाटणकर बोलत होते.
परिषदेचे उद्घाटन डॉ.भारत पाटणकर, डॉ.नवनाथ शिंदे , बाळेश नाईक,अब्दुलवाहिद सोनेखान, प्रमोद पाटील व संग्राम सावंत यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.
परिषदेची भूमिका मांडताना संग्राम सावंत राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती म्हणाले, हिंदू मुस्लिम एकत्र येऊन करणार आम्ही संविधानिक मार्गाने जाणार आहोत.मुस्लिम समाजाच्या याबाबतीत ठोस पावले शासनाने व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत.यासाठी संघटित होऊन.लढा नेटाने उभा भारतीय संविधानाला घेऊन करणार आहोत.यासाठी परिषद घेत आहोत.
महेश परूळेकर म्हणाले, संविधान तळागाळातल्या माणसाचा विचार करते. संविधान हे जात, धर्म, पंथ असा भेद न मानता समतेची आणि न्यायाची भूमिकेशी बांधिल आहे .भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांच्या भ्रम आणि वास्तव दूर करण्यासाठी सत्याचा पुढाकार घेऊन आपल्याला भारतीय राज्यघटनेला घेऊन चालावे लागेल.
मुस्लिम समाज – भ्रम आणि वास्तव याबाबतची मांडणी करताना फारूख गवंडी सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, भ्रम आणि वास्तव्याचा विचार विवेक वादाच्या कसोटीला घेऊन करावा लागेल भारतीय समाजामध्ये असे भ्रम तयार करून जन माणसांचं मन आणि मेंदू बिघडवला जात आहे. यासाठी आपण सर्वांनी भारतीय संविधानाला घेऊन या सगळ्या गोष्टींना लढा देण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
परिषदेच्या शेवटी संविधानाला प्रमाण मानून वेगवेगळे ठराव करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर खेडेकर यांनी केले.प्रास्ताविक मौजुद माणगांवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अब्दुलकरीम कांडगावकर यांनी केले.
परिषदेला रशीद पठाण,अहमदसाब मुराद,जुबेर चॉंद, अबुसईद माणगावकर,निसार लाडजी,समीर चॉंद,सलिम लतिफ,इम्रान चॉंद,समीर खडकवाले,झाकीर नाईक,अलताफ मदार,साबीर वाटंगी,मुस्तफा मुजावर,मुबारक नुलकर,जावेद मुजावर,डॉ.उल्हास त्रिरत्ने, कॉ. काशिनाथ मोरे,मजीद मुल्ला,जुबेर माणगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


आम. प्रकाश आबीटकर यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा- भुदरगड- राधानगरी चे विद्यमान आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्य आमदार आबिटकर प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले.
ठिकठिकाणी वृक्षारोपणासह रुग्णांना फळे वाटप व इतर सामाजिक उपक्रम पार पडले.
या उपक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, साळगावचे सरपंच दयानंद पाटील, शिवसेना शहरप्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले,रणजीत सरदेसाई, गोविंद गुरव, इंद्रजीत देसाई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


पावसाबरोबर पर्यटकही वाढले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे वर्षा पर्यटनासाठी रामतीर्थ येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसत आहे.
पावसाळी पर्यटकांचे रामतीर्थ धबधबा हे खास आकर्षण असून धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्यामुळे येथे पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत.
आंबोलीसह कोकणच्या दिशेने जाणारे वर्षा पर्यटक हमखास रामतीर्थ येथे हजेरी लावताना दिसत आहेत.

छायावृत्त…

नवीन महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गटर्समध्ये रस्त्यावरील पाणी जात नसल्याने महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या घरांचे पावळणींचे पाणी व इतर पाणी रस्त्याच्या मधूनच जात असल्याने शिवाजीनगर परिसरातील रस्त्याला जोरदार पाऊस आल्यास नदीचे स्वरूप प्राप्त होताना दिसते.


