गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५



आजरा अर्बन बँक म्हणजे विश्वास : चेअरमन अशोक चराटी,
आजरा अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा अर्बन बँकेने एक हजार कोटींचा ठेवींचा टप्पा पार केला आहे. भारतातील उत्कृष्ट बँकांमध्ये समावेश असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून आजरा अर्बन बँकेचा नावलौकिक आहे. यामुळे ‘ आजरा अर्बन बँक म्हणजे विश्वास ‘ असे समीकरण तयार झाले आहे असे प्रतिपादन आजरा बँक चे चेअरमन व अजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी केले. ते आजरा अर्बन बँकेच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
सभेच्या सुरुवातीस संचालक डॉ. दीपक सातोसकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.
चेअरमन अशोकअण्णा चराटी पुढे म्हणाले, बँकेकडे आधुनिक कार्यप्रणाली आहे. त्यामुळे बँकेच्या डिजिटल व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारत सरकार व राज्य सरकार यांच्याकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा निधी बँकेच्या खात्यावर जमा होत आहेत. प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना बँकेकडे सुरू आहेत. आगामी काळात बँकेची गोवा राज्यात शाखा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी सभा नोटीस, विषय पत्रिका वाचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गंभीर व संचालक मंडळांने आर. डी. पाटील, तुळसाप्पा पोवार , किरण तानवडे आदी सभासदांच्या लेखी प्रश्नांना तसेच ऐनवेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी व्हा. चेअरमन संजय चव्हाण, संचालक सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, सूर्यकांत भोईटे, सुनील मगदूम, विजय पाटील, ज्योस्ना चराटी, के. व्ही. येसणे, डॉ. अंजनी देशपांडे, जनार्दन टोपले, जी. एम. पाटील, विनय सबनीस, राजू पोतनीस, पांडुरंग लोंढे, सिद्धेश नाईक, अतिशकुमार देसाई, मनीषा कुरुणकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.

सूतगिरणीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील :अशोक चराटी
अण्णा भाऊ आजरा सूतगिरणीची वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सूतगिरणीतून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यापासून सूतगिरणी आठ वर्ष नफ्यात होती. शासनाची बदलती धोरणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेले पेच व सूत दरातील अस्थिरता यामुळे वस्त्रोद्योग सूतगिरणी तोट्यात चालवण्याची वेळ
आली आहे. केवळ व्याजापोटी महीनाकाठी ६५ लाख रुपये व इतर व्यवस्थापन खर्च हा बोजा सद्यस्थितीला सूतगिरणीला परवडणारा नाही. जोपर्यंत कर्जाचा बोजा कमी होत नाही. तोपर्यंत सूतगिरणी नफ्यात येणे अशक्य आहे. हा बोजा कमी करण्यासाठी सूतगिरणीच्या मालकीची वापरात नसणाऱ्या जमिनीची विक्री करणे किंवा भाडेतत्वावर देणे हा पर्याय आहे. यासाठी सभासदांनी यापैकी एक निर्णय घेण्यास संचालक मंडळाला मंजूरी द्यावी. असे आवाहन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी केले. या आवाहनाला सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी ची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
सभेच्या सुरुवातीस संचालक राजू पोतनीस यांनी श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले. प्रस्तावेकर भाषणात अध्यक्षा अन्नपूर्णा देवी यांनी सूतगिरणीच्या वाटचालीचा आढावा घेतला. दत्तात्रय दोरुगडे यांनी नोटीस वाचन केले. उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी समोरील अडचणी व त्यातून मार्ग काढण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न याबाबत सभासदांना माहिती दिली. सूतगिरणीच्या वाटचालीचा आढावा संचालक अनिकेत चराटी यांनी घेतला.
सभेस जयसिंगराव देसाई, जी. एम. पाटील, नारायण मुरकुटे, हसन शेख, डॉ. संदिप देशपांडे, मालुताई शेवाळे, मनिषा कुरुणकर, डॉ. दीपक सातोसकर, सुरेश डांग, रमेश कुरुणकर, किशोर भुसारी, मारुती मोरे, आनंदा फडके, बसवराज महाळंक, प्रशांत गंभीर, के. व्ही. येसणे, संजय चव्हाण, डॉ. अंजनी देशपांडे, जोस्त्ना चराटी, ॲड. सचिन इंजल, जनरल मॅनेजर अमोघ वाघ, प्रशासन अधिकारी सचिन सटाले, प्रोडक्शन मॅनेजर श्रीकांत कुलकर्णी, स्टोअर्स ऑफिस प्रमुख राजेंद्र धुमाळ, चीफ इंजिनियर रामचंद्र पाटील, गारमेंट इन्चार्ज सौ. शामली वाघ, महेश कुरुंदकर, सदानंद रोडगी, के. व्ही. येसणे यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.
सचिन सटाले यांनी सुत्रसंचालन तर संचालक शशिकांत सावंत यांनी आभार मानले.

ह. भ. लक्ष्मणबुवा महाराज मोरजकर यांच्या सप्ताहास सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ह.भ. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या सप्ताहास उत्साहात सुरुवात झाली आहे.
सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील घाट परिसरातील महाराजांच्या समाधी स्थळावरून महाराजांना सप्ताहाकरीता आमंत्रित करण्यात आले. शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये सदर सोहळा आठ दिवस चालणार असून या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्तूर मॅरेथॉनमध्ये वर्मा, पाटील, चिगरी व मोर्ती विजयी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)
उत्तूर (ता. आजरा) येथील बाजारपेठ मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित २७ व्या मॅरेथॉन स्पर्धेत ऋतिक वर्मा, ऋतुजा पाटील (गडहिंग्लज), अथर्व चिगरी (मुत्नाळ) व सृष्टी मोर्ती (हरळी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक शिवलिंगण्णा सन्ने, डॉ. प्रकाश तौकरे, मिलिंद कोळेकर, नंदकुमार देशमाने व सुनील आमणगी यांच्या हस्ते झाले.
गुणानुक्रमानुसार खुल्या गटात शुभम जावळे, ओंकार पाटील, श्रेया पाटील, नूरजना मुजावर तर १७ वर्षांखालील गटात जगदीश सावंत, समर्थ चव्हाण, ऋतुजा पोवार व नंदिनी मांडेकर यांनी यश संपादन केले.स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. सुरेश धुरे, प्रवीण लोकरे, रणजीत धुरे, प्रवीण आमणगी, राहुल धुरे, मंदार कोळेकर व शुभम देवरू यांनी विशेष कष्ट घेतली.
आजचा वाढदिवस


कोळिंद्रेची महालक्ष्मी यात्रा एप्रिल २०२६ अखेरच होणार : सरपंच सौ. वंदना सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या कोळींद्रे येथील कांही विरोधक महालक्ष्मी यात्रा करण्यासाठी राजकीय दृष्ट्या विरोध करत असले तरी महालक्ष्मी यात्रा करण्याचं नियोजन ,श्री रवळनाथ ग्रामविकास मंडळ मुंबई यांचे प्रतिनिधी , कोळिंद्रे ग्रामस्थ व पोश्रातवाडी ग्रामस्थ यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये करण्याच्या उद्देशाने करून बळ बंकर सोडण्यात आले आहे.यात्रेची लोक वर्गणी लोक स्वताहुन जमा करत आहेत यामुळे कोणत्याही परिस्थितीत 2026 ला महालक्ष्मी यात्रा होणार अशी माहिती सरपंच सौ. वंदना सावंत यांनी दिली.
यावेळी सावंत म्हणाल्या,अभिमानाची बाब म्हणजे केवळ दोन दिवसांत ३१०,०००/इतकी लोकवर्गणी जमा झाली आहे.येत्या सहा महिन्यांत रस्ते, गटर्स आणि इतर विकासाची कामे करण्यासाठी ग्रामपंचायत बांधील आहे.सुमारे २१ वर्षांनी होतं असलेल्या महालक्ष्मी यात्रेला गावातील कांही महिला व मोजक्या लोकांनी केलेला विरोध हा राजकीय दृष्टीकोनातून केलेला आहे. गावातील ९०% लोकांच्या मनात महालक्ष्मी यात्रा २०२६ ला करण्याची भावना आहे आणि ती निर्विघ्नपणे पार पडणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईकरांना लागले परतीचे वेध…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घरगुती बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता मुंबईसह बाहेरगावाहून तालुक्यात गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असून पुणे- मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इतर गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बऱ्यापैकी बाहेरगावचा चाकरमानी तालुक्यात परतला आहे. शाळा सुरू झाल्याने चाकरमान्यांना आता परतीची वेध लागले आहेत. सायंकाळच्या वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमधून पै – पाहुण्यांना पोहोचवण्यासाठी मित्रपरिवार व नातेवाईकही गर्दी करताना दिसत आहे.

वेळवट्टी येथे रक्तदान शिबिर उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ, वेळवट्टी येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत देसाई व विश्वजीत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गोरे, उपाध्यक्ष संभाजी कुंभार, खजिनदार श्रीधर गोरे ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब देसाई, ज्ञानदेव गावडे, सागर शिंदे, शिवाजी गुरव, बबन गुरव, हर्षवर्धन शिंदे, सतीश कुंभार, आदित्य कविटकर, दत्तात्रय कुंभार, सागर पोवार, महेश मांगले, ज्ञानदेव प्रभू, संजय कळेकर तसेच इतर मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
मंजुळा शिवगण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुलगाव तालुका आजरा येथील मंजुळा महादेव शिवगण ( वय ६५ वर्षे )
यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सुन नातवंडे असा परिवार आहे.

आज शहरात…
महाप्रसाद…
♦ भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ
♦ सुभाष चौक गणेशोत्सव मंडळ
वेळ दुपारी १२ ते ३

गणेश दर्शन
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आरदाळ

अध्यक्ष – अमोल बांबरे
उपाध्यक्ष – दीपक पाटील
सचिव – राजेंद्र जाधव
खजिनदार – प्रतिक कुडवे
मृर्ती देणगीदार – समिर शिवणे


