mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मला कार्यकर्त्यांसोबत रहावेच लागेल:पालकमंत्री हसन मुश्रीफ

                       आजरा:प्रतिनिधी

        आजरा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे थेट माझ्या कागल विधानसभा मतदारसंघाशी जोडलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयासोबत मला रहावे लागेल अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी काल पत्रकार बैठकीत स्पष्ट केल्याने आजराच्या रणधुमाळीत मंत्री मुश्रीफ हे ताकतीने उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

      वास्तविक आजरा साखर कारखान्याशी आमदार विनय कोरे व आमदार सतेज पाटील यांचा काहीही संबंध नाही. काही ठिकाणी आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या असल्या तरी आजरा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे कारखान्यात पॅनल तयार केले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक ठिकाणी पक्षीय भूमिका सारखीच असेल असे नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.

      पालकमंत्री मुश्रीफ हे आजरा साखर कारखाना निवडणुकीत भाग घेणार का ? असा प्रश्न कारखान्याच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता. मंत्री मुश्रीफ यांच्या या भूमिकेमुळे या प्रश्नाचे उत्तर तालुकावासीयांना मिळाले आहे. मंत्री मुश्रीफ यांचा आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता त्यांच्या या भूमिकेमुळे आजरा साखर कारखाना निवडणूक मात्र रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


आज श्री चाळोबादेव विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ 

                                                         .    .                             आजरा:प्रतिनिधी

          आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ आज रविवार दि.३ रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामदैवत श्री. रवळनाथ मंदिर येथे नारळ ठेवून करण्यात येणार आहे.

          भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस, दोन्ही शिवसेना यांची ही आघाडी असून आज या प्रचार शुभारंभानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे धुमशान सुरू होणार आहे.

भावपूर्ण वातावरणात डॉ. फर्नांडिस यांना निरोप


                  आजरा:प्रतिनिधी

        आजरा तालुक्यातील नामवंत डॉक्टर अशोक फर्नांडिस यांच्या मृतदेहावर त्यांचे मूळ गाव हालेवाडी येथे तालुकावासीयांच्या व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा मृतदेह हालेवाडी येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

      यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ.फर्नांडिस यांना निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती. डॉ.फर्नांडिस यांच्या बद्दल बोलताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा व ओलावल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

दुपारी एक वाजता हालेवाडी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या दफनभूमीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्या आजरा बंद

                     आजरा : प्रतिनिधी

       आजरा नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या करवाढीच्या निषेधार्थ होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजरा व्यापारी असोसिएशनने उद्या सोमवार दि.३ डिसेंबर रोजी आजरा बंदची हाक दिली आहे.

       उद्या आजरा बाजारपेठ बंद राहील असे व्यापारी असोसिएशनने जाहीर केले आहे.सकाळी अकरा वाजता सदर मोर्चा पंचायत समिती येथून आजरा नगरपंचायतीच्या दिशेने निघणार आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!