mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


लोकसभेचा झंजावात… की कार्यकर्त्यांची वाताहात ?

              ✍️✍️ज्योतिप्रसादसावंत

        लोकसभा निवडणुकीचे वातावरण जसजसे तापू लागले आहे तसतसे तालुक्यात नेहमी एकसंघपणे निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या शिवसेना राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षफुटीमुळे संघर्षाचे वातावरण निर्माण होत असून कार्यकर्त्यांची अक्षरशः वाताहात होत आहे. एकमेकांच्या समर्थक उमेदवारांकरता सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले जाणारे संदेश संघर्षाचे ठिणगीत व त्यानंतर वणव्यात रूपांतर करण्यास कारणीभूत ठरु लागले आहे.

       कालपर्यंत कारखाना निवडणुकीसह विविध निवडणुकांच्या माध्यमातून ही सर्व मंडळी सोशल मीडियावर एकाच ग्रुप मध्ये कार्यरत होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्षीय संदर्भ बदलले असल्याने अशा अनेक ग्रुप मध्ये आता वादाचे प्रसंग निर्माण होऊ लागले आहेत. बहुतांशी कार्यकर्त्यांना नेमकी भूमिका काय घ्यायची ? या प्रश्नाने सतावले आहे. सध्या एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या नेतेमंडळींची यापूर्वीची एकमेकांविरोधात टोकाची टीका केलेली भाषणे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरु लागली आहेत.

       जिल्हा व राज्य पातळीवर विळ्या- भोपळ्याचे सख्य असणारी मंडळी एकत्र आली असली तरी या मंडळींनी गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी गोची करून ठेवली आहे.

शेलकी विशेषणे ठरणार वादाचे कारण

     स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते बदलत्या राजकारणाचा संदर्भ घेऊन नेतेमंडळींसाठी शेलक्या विशेषणांचा वापर करत आहेत. एकमेकांना दुखावणारी नेत्यांबद्दलची ही विशेषणे भविष्यात वादाचे कारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजऱ्यात रमजान ईद उत्साहात

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

        ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सकाळी सामूहिक नमाज पठण केले.नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. बाजारपेठेमध्ये दुपारनंतर कालावधीत गर्दी दिसत होती.हिंदू – मुस्लिम बांधवांनी एकत्रित एकमेकांना शुभेच्छा देऊन ईदचा आनंद व्यक्त केला. ठिकठिकाणी मेजवानीचे बेतही पार पडले.

      सण कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आरदाळ येथे उद्यापासून हरिनाम सप्ताह सोहळा

           आजरा ; मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा

       आरदाळ ता. आजरा येथे ह.भ.प. अजिंक्य इंगळे महाराज ( हसूर ) यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक १३ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

       सप्ताहानिमित्त दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत हरिपाठ, सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत प्रवचन व रात्री कीर्तन आणि भजनी मंडळ जागर असा हा कार्यक्रम आहे.

       कार्यक्रमास ह.भ.प. सुशांत सुतार महाराज,ह.भ.प. बी.पी. मिरजकर,ह.भ.प. अरुण पवार महाराज,ह.भ.प. बळीराम तांबेकर महाराज,ह.भ.प. कल्पेश यादव महाराज,ह.भ.प.तुकाराम देसाई महाराज,ह.भ.प. तानाजी देसाई महाराज यांच्यासह मान्यवर हजर राहून प्रवचन व कीर्तन करणार आहेत.

       यावेळी विविध भजनी मंडळांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. २० एप्रिल रोजी सकाळी नऊ ते बारा या कालावधीत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

निधन वार्ता
विष्णू शिवूडकर


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     हंदेवाडी ता.आजरा ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक विष्णू गणपती शिवूडकर ( वय ८४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे.

      इचलकरंजी नगरपालिकेकडील प्राथमिक शिक्षक पांडुरंग शिवूडकर यांचे ते वडील होत.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वझरे येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!