

तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले….?
उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार

आजरा तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून उद्या बुधवार दिनांक ५ एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ज दाखल करण्याचा कालावधी ५ एप्रिल ते १२ एप्रिल असा आहे नामनिर्देशन पत्र छाननी १३ एप्रिल रोजी होणार आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी २ मेपर्यंत राहणार आहे. आवश्यकता भासल्यास १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १४ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल.
तालुका संघाचे एकूण १०६२७ इतके व्यक्ती सभासद आहेत तर सेवा संस्था गटाचे ९४ व इतर संस्था गटातून १११ मतदार मतदानास पात्र राहिले आहेत.
संचालक पदाच्या एकूण १९ जागांकरिता सदर मतदान होणार असून यामध्ये सेवा संस्था गटातून ७ प्रतिनिधी इतर संस्था गटातून १ प्रतिनिधी व्यक्ती सभासद गटातून ६ प्रतिनिधी तर राखीव प्रवर्गातून ५ प्रतिनिधीना संचालकपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.
राखीव प्रवर्गाकरिता संस्था गटाचे ९४ इतर संस्था गटाचे १११ तर व्यक्ती सभासद गटातील १०,६२७ मतदार मतदान करणार आहेत.
खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व आहे. संस्थेवरील निवडणुकीच्या खर्चाचा बोजा टाळण्याच्या उद्देशाने निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालीही सुरू आहेत.
(सदर माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे. अधिकृत कार्यक्रम उद्या बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे)

‘जनता बँक आजरा’ला रु.७ कोटी ७७ लाखाचा नफा

जनता सहकरी बँक लि., आजरा या बँकेला चालू आर्थिक वर्षामध्ये रु. ७ कोटी ७७ लाखाचा नफा झाला असून, बँकेकडे चालू आर्थिक वर्षामध्ये रु. ३१७ कोटीच्या ठेवी व रु. २१० कोटीची कर्जे तसेच रु. १२८ कोटीची गुंतवणूक केली आहे. बँकेने आर्थिक वर्षामध्ये रु. ५२६ कोटीचा व्यवसाय केलेला आहे. बँकेचा नेट एन.पी.ए. ० टक्के आहे. बँकेने आजपर्यंत केलेला पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवून सभासद, ठेवीदार,कर्जदार व हितचिंतकांनी बँकेवर दाखविलेला हा विश्वास आहे. रिझर्व बँकेचा आर्थिक दृष्टया सक्षम व उत्तम व्यवस्थापन हा निकष बँकेने पूर्ण केला आहे.
बँकेच्या एकूण १७ शाखा पैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत. बँकेकडे सर्व प्रकारचे अद्यावत टेक्नॉलोजी उदा. स्वतःचे डी. सी व डी. आर सेंटर, मोबाईल बँकींग, आय.एम.पी.एस, गुगल पे, फोन पे, पेटीएम, ई कॉम, पॉज, रिसायकलर ए टी एम मशिन, मायक्रो एटीएम, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी. इ. सुविधा आहेत. तसेच बँकेने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व आण्णासाहेब आर्थिक विकास मागास व्याज सवलत योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना कर्ज पुरवठा चालू केलेला असून चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेने रु. ३० कोटी सदर योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केलेला आहे.
इथुन पुढेही बँक समाजातील सर्व स्तरामधील तरुण उद्योजकांना शासनाच्या सबसिडीची कर्जे मंजूर करुन तरुण उद्योजकांना उभारी देणेचे काम करत राहू. तसेच बँक लवकरच मुंबई शाखा चालू करणार आहे असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम.बी. पाटील यांनी सांगितले. सोबत बँकेचे व्हा. चेअरमन श्री. महादेव टोपले, संचालक श्री. जयवंतराव शिंपी, श्री. रणजित देसाई, श्री. बाबाजी नाईक, श्री. जयवंत कोडक, श्री. शशिकांत नार्वेकर, श्री. अमित सामंत, श्री. शिवाजी पाटील, श्री. विक्रमसिंह देसाई, श्री. महेश कांबळे, श्री. पांडुरंग तोरगले, श्री. संतोष पाटील, सौ. रेखा देसाई, सौ. नंदा केसरकर व बँकेचे कर्मचारी श्री. मिनीन फर्नांडिस, श्री. माणिक सावंत, श्री. पांडुरंग सरंबळे, श्री. सुहास चौगुले व आय.टी. मॅनेजर श्री. संदिप पाटील उपस्थित होते.



विदया मंदिर किणे शाळेच्या कंपाऊड बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न

माजी सभापती श्री.विष्णूपंत केसरकर यांच्या शुभहस्ते किणे विद्या मंदिरच्या कंपाऊड बांधकाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी किणे गावच्या सरपंच सौ . सुनंदा सुतार, उपसरपंच श्री .विजय केसरकर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत बामणे , मुख्याध्यापक बळवंत शिंत्रे , व्ही जी कातकर जानबा आजगेकर ग्रा .प. सदस्य ,एकनाथ बामणे अलका बामणे, गुलाबी केसरकर, मनिषा केसरकर, महेश पाटील, जयश्री कांबळे,सदाशिव वांजोळे गोंविद केसरकर, ग्रामसेविका कविता कोकितकर माजी सैनिक , आजी -माजी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते .
कामाच्या मंजूरीसाठी जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी , आजरा तालुक्याचे गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विभागाचे अभियंता श्री . दत्ता पाटील, जि .प. चे माजी उपाध्यक्ष श्री .सतिश पाटील यांचे सहकार्य लाभले.






