

आज-याचे माजी सरपंच करीम मुल्ला यांचे निधन

आजरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच करीम अली मुल्ला यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६१ वर्ष इतके होते.
गुरुवारी रात्री एक वाजता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथील रुग्णालयात तातडीने हालवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. २००० साली त्यांनी आजरा ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले होते.
शुक्रवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




तालुका खरेदी विक्री संघासाठी गुरुवार अखेर विविध प्रवर्गातून ४२ उमेदवारी अर्ज दाखल
आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ६ एप्रिल २३ अखेर एकूण ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये…
‘ अ’ वर्ग विकास संस्था प्रतिनिधी करिता १४ अर्ज दाखल झाले आहेत
१. मधुकर कृष्णा देसाई २.अल्बर्ट नातवेद डिसोजा ३.महादेव दत्तात्रय पाटील ४. रघुनाथ नानासाहेब देसाई ५.अबुताहेर अल्लाउद्दीन तकीलदार ६.दौलती अंतू पाटील ७.सुनील गोपाळ देसाई ८.राजाराम जोतिबा पाटील ९.नारायण नाना सावंत १०. सुधीर राजाराम देसाई ११. विक्रमसिंह मुकुंदराव देसाई १२.अमरसिंह बाबासाहेब पवार १३.संभाजी मारुती तांबेकर १४.महादेव जोतिबा हेब्बाळकर
‘ब’ वर्ग व इतर संस्था प्रतिनिधी करता चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
१. संभाजी रामचंद्र पाटील २. भीमराव गणपती वांद्रे ३. अल्बर्ट नातवेद डिसोजा ४. संभाजी मारुती तांबेकर
‘ क’ वर्ग व्यक्ती सभासद प्रतिनिधी करता १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
१.मधुकर कृष्णा देसाई २.विठ्ठलराव रामराव देसाई
३.ज्ञानदेव लक्ष्मण पोवार ४. मधुकर गोपाळ येलगार ५. गणपती विष्णू सांगले ६.सुनील गोपाळ देसाई ७.नारायण नाना सावंत ८.सुधीर राजाराम देसाई ९. दौलती अंतू पाटील १०. भीमराव गणपती वांद्रे ११. विक्रम मुकुंदराव देसाई १२. अमरसिंह बाबासाहेब पवार १३.देवदास मारुती बोलके १४.संभाजी मारुती तांबेकर १५. दत्तात्रय जोतिबा पाटील
महिला राखीव प्रवर्गाकरिता तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
१. राजलक्ष्मी अजित देसाई २.छायादेवी ज्ञानदेव पवार ३. मायादेवी पांडुरंग पाटील
इतर मागास राखीव प्रवर्गाकरिता तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
१. मधुकर गोपाळ यलगार २. संभाजी मारुती तांबेकर ३. गोविंद नारायण पाटील
भटक्या विमुक्त जाती जमाती या प्रवर्गातून महेश संभाजी पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
शुक्रवारपासून सलग सुट्ट्या असल्यामुळे आज बहुतांशी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्राधान्य दिले.


MPSP व BDS या स्पर्धा परीक्षेत श्री.रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिरचे यश

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या ‘ MPSP व BDS ‘ या स्पर्धेत रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.
MPSP या स्पर्धा परीक्षेत इ.३ री चा विद्यार्थी कु.आराध्य भाऊसाहेब पाटील याचा राज्यात २७ व्या क्रमांकावर असून त्याला या परीक्षेत ३०० पैकी २२४ गुण मिळाले आहेत.
इ.१ली ते इ.४थी BDS मधील निकाल*
इ.१ली –
१.विनिता विजय कांबळे – ८६ गुण ब्राॅन्झ मेडल
२.गिरिजा रविंद्र कांबळे – ७६गुण
इ.२ री-
१)तन्वी अरूण वंजारे – ८६ गुण ब्राॅन्झ मेडल*
२)कर्णजीत संतोष ढोकरे.- ७७ गुण
३)राजवीर विजय पोतदार – ७१ गुण
इ ३ री-
१)आराध्य भाऊसाहेब पाटील- ९७ गुण गोल्ड मेडल
२)यशराज प्रविण पाटील – ९० गुण ब्राॅन्झ मेडल
३)स्वरूप शरद कुंभार ८८ गुण ब्राॅन्झ मेडल
४)सार्थक नरेश केरकर- ८३ गुण*
५)निधी अनिल मोरबाळे – ७२ गुण
इ.४ थी-
१)श्रृतिका लक्ष्मण कांबळे – ५८ गुण
२)रिया निलेश पेंडसे – ५८ गुण
३) यश प्रसाद सुतार – ५५ गुण
४) प्रिती निलेश पेंडसे – ५४ गुण
या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका – सौ.शांता शिंत्रे,सौ.निलांबरी कामत, सौ.प्रतिभा भोये (बागुल), सौ.रेश्मा कुराडे, सौ.अश्विनी मुळीक (राणे), श्री.सुरज बिद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.




