mrityunjaymahanews
अन्य

तर तालुका संघ निवडणूक लढण्याची तयारी…

तर तालुका संघ निवडणूक लढण्याची तयारी…

 

बिनविरोधच्या चर्चेसही तयार

 

अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची पत्रकार बैठकीत माहिती

आजरा तालुका खरेदी विक्री संघाचा सध्या निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. इतर सहकारी संस्थाप्रमाणे तालुका संघ निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली प्रामाणिक भूमिका आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्याशी आपली चर्चा झाली असून कांही मंडळी मात्र वेगळी भूमिका घेत असल्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्याची शिंपी – चराटी गटाने तयारी केली आहे.केवळ आपल्या भूमिकेमुळे बिनविरोधला गालबोट लागू नये यासाठी आजही आम्ही बिनविरोध निवडणुकीसाठी तयार आहोत. मावळत्या सभागृहामध्ये शिंपी गटाचे सहा संचालक होते या निवडणुकीत किमान पाच जागा मिळाल्यास आपली बिनविरोधची तयारी आहे. यासाठी चर्चेचे दरवाजे केंव्हाही खुले आहेत. त्यातूनही जर निवडणूक लादायचीच असेल तर सामोरे जाण्याचीही आपली तयारी आहे. असे स्पष्ट मत यावेळी अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना अशोकअण्णा चराटी म्हणाले तालुक्याने सहकारी संस्थांनी बिनविरोध निवडणुकांची परंपरा सुरू केली आहे. या परंपरेला अनुसरून तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखान्याची निवडणुकही बिनविरोध व्हावी यासाठी आपली सकारात्मक भूमिका आहे. तालुका संघ हा सर्वसामान्यांचा असून निवडणूक आपल्या गटाला सोपी की अवघड हा भाग नंतरचा आहे. एकीकडे शिंपी – चराटी गटाची बिनविरोध निवडणुकीची भूमिका असताना दुसरीकडे जर काही मंडळी निवडणूक लागावीच असे प्रयत्न करून यातून जर फसवाफसवी सारखा प्रकार घडणार असेल तर आपणही निश्चितच पूर्ण ताकतीने निवडणुकीला सामोरे जावू. तालुका संघामध्ये शंभर रुपये भाग भांडवल भरणाऱ्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणे, संस्था गटांचे बोगस ठराव करणे यासारखे अनेक प्रकार सभासदांसमोर ठेवून सभासदांचा कौल मागितला जाईल.

जयवंतराव शिंपी म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक संस्था टिकवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो आहोत. तालुक्यात सहकारात कोणतीच निवडणूक नको अशी आपली भूमिकाही राहिली आहे. निवडणुकांमुळे कर्मचारी वर्ग अडचणीत येतो व त्याचबरोबर नाहक संस्थेवर खर्चाचा बोजा पडतो हे वास्तव आहे. अशावेळी बिनविरोधला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यातूनही कांही मंडळींनी दानत दाखवली नाही तर मात्र आपलीही निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विलास पाटील, दशरथ अमृते, राजू पोतनीस, पांडुरंग लोंढे आदींनीही बिनविरोध निवडणुकीबाबत भूमिका मांडली.

उपस्थितांचे स्वागत नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केले, तर आभार अनिकेत चराटी यांनी मानले .

यावेळी सचिन शिंपी, डॉ. इंद्रजीत देसाई , विलास पाटील, एस .पी. कांबळे, विश्वास जाधव ,दत्तात्रय पाटील, (कोरीवडे) शिंपी यांच्यासह चराटी गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीचा बोजा नको, कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा…

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तालुका संघावर खर्चाचा मोठा बोजा पडणार आहे. एकीकडे अल्प वेतनावर कर्मचारी वर्ग काम करत असताना दुसरीकडे संस्थेवर निवडणूक खर्चाचा नाहक बोजा टाकण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करून कर्मचाऱ्यांना समाधानकारक वेतन द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे मुकुंदराव तानवडे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

आल्याचीवाडी येथे मारहाणीत एक जखमी… देवर्डे येथे हत्तीकडून नुकसान… रामतीर्थयात्रा आजपासून सुरू.. एस.टी.सुविधा नाहीच..

mrityunjay mahanews

BREAKING… एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

गजरगाव बंधार्‍यावरून मोटरसायकल कोसळल्याने एक जण जागीच ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!