रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४

हत्तीचा धिंगाणा सुरूच

गवसे : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डोंगरवाडी पैकी घाटकरवाडी (ता. आजरा) येथील परिसरात टस्कराचा वावर सुरु आहे. दिवसाढवळ्या दिले जाणारे दर्शन व त्याच्या चित्काराने ग्रामस्थ भयभित झाले आहेत. बाळकृष्ण पाटील यांच्या शेतात टस्कराने भात, नागली पिकाचे नुकसान केले आहे.
हत्तीने घाटकरवाडीतील रामचंद्र मटकर यांच्या शेतातील भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे. त्यानंतर तो धनगरमोळा परिसरात वावरत आहे. त वावराने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण आहे.
गेली बारा ते तेरा वर्षे पश्चिम भागात ठाण मांडून बसलेल्या हत्तीचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला कधी यश येणार ? हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहे.

आमदार आबिटकर यांच्यासाठी आजरा तालुक्यात प्रचार रॅल्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राधानगरीचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ आजरा शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये महिलांनी प्रचार रॅल्या काढून आबिटकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
मुस्लिम बांधवांसह रवळनाथ देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनीही आमदार आबिटकर यांच्यासाठी घरोघरी भेट देऊन प्राचार्य यांना राबविण्यास सुरुवात केली आहे.

पाच वर्षात साडेसात मिनिटे तोंड उघडलेला कार्यसम्राट आमदार…! डॉ. नंदिनी बाभुळकर यांचे प्रतिपादन

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदारकीच्या अखंड पाच वर्षाच्या कालखंडात विधानसभेत कार्यसम्राट आमदारांनी केवळ साडेसात मिनिटे तोंड उघडले आहे. ही मी टीका करत नाही. याचे शासकीय रेकॉर्ड नोंद आहे. चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्याच्या जीवघेण्या समस्यांवर जो आमदार साडेसात मिनिटे सभागृहात बोलतो. मग आम्ही त्यांना काय म्हणायचे, असा आमदार तुम्ही परत निवडून देऊन स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घेणार आहात काय? असा खडा सवाल महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर यांनी सभेत उपस्थित केला
डॉ. बाभुळकर पुढे म्हणाल्या, भाजपाची निती आहे. तोडा आणि फोडाची निती भाजपाची आहे. ते मित्रपक्षाचा ही घात करत आहेत. मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली त्यांनी आपला खरा चेहरा चंदगडमधील समाजासमोर आणला आहे. आयुष्यभर निष्ठेने, त्यागाने उभे केलेले स्व. बाबासाहेब कुपेकर, शरद पवार यांचे विचार पायदळी तुडवले आहेत, सूज्ञ हे खपवून घेणार आहेत का? आजपर्यंत जनता याचा निषेध करत आहे.
बाबुराव हळदणकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात अतिशय चांगले कार्य केले आहे. हॉस्पिटलमध्ये लोकांना ऑक्सीजन मिळणे कठीण झालं. त्यांनी प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन प्लॅन्ट बसवले. चंदगडलाही बसवला. पण या कार्यसम्राटांना तो चालू करता आला नाही अशी टीका करत तो किलोवर भंगारात विकण्याची वेळ आली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या विलास पाटील, रामराज कुपेकर, संभाजीराव देसाई – शिरोलीकरांसह मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.

२००९ ची पुनरावृत्ती या निवडणुकीतही होईल ; कागलची भूमी आणि पाणी स्वाभिमानी – माजी खास. प्रा. संजय मंडलिक यांचा विश्वास…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२००९ ला लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब पवारांना सोडून गेले. ते पराभूत झाले नाहीत. उलट बंडखोरी करून त्यांनी क्रांतिकारी आणि ऐतिहासिक विजय मिळविला. तशीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही होऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. स्वर्गीय खासदार कै. मंडलिक यांना जनतेचे समर्थन होते. हसन मुश्रीफ यांनाही जनतेचे समर्थन आहे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगुड येथे आयोजित विराट जाहीर सभेत श्री. मंडलिक बोलत होते. प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, कागल तालुक्याचा इतिहास पाहता आजवरच्या राजा विरुद्ध प्रजा लढाईत आतापर्यंत प्रजाच विजयी होत आली आहे. या निवडणुकीतही प्रजाच विजयी होईल.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेली ३५-४० वर्षे समाजकारण आणि राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करीत आलो. या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्यांचे पाठबळ द्या, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करीत आलो. या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्यांचे पाठबळ द्या, येणारी पाच वर्षे तुमचा हमाल म्हणून सेवा करीन.
नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ज्या- ज्या वेळी मंडलिक पार्टी आणि पाटील पार्टी एकत्र येते त्या- त्यावेळी क्रांती होते. या विधानसभा निवडणुकीतही आम्ही मंडलिक गट आणि पाटील गट एकत्र आहोत.पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या ऐतिहासिक विक्रमी मताधिक्याच्या रूपाने क्रांती होईल, असेही ते म्हणाले.
खासदार धैर्यशील माने, अंबरीशदादा घाटगे, पक्ष निरीक्षक अमृता घुले, विजय काळे, उत्तम कांबळे, दत्ताजी देसाई, अनिल सिध्देश्वर, मधूकर पाटील, दिगंबर परीट यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे, सुनीलराज सूर्यवंशी, रणजीत मुडुकशिवाले, धोंडीराम चौगले, दिग्विजय पाटील, रणजीत सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, ॲड. सुधीर सावर्डेकर, राजू आमते, विकास पाटील, धनाजी गोधडे, शिवाजी चौगले, जगन्नाथ पुजारी, सुहास खराडे, संजय मोरबाळे आदी उपस्थित होते.स्वागत नामदेवराव मेंडके यांनी केले.सूत्रसंचलन ए. एन. पाटील यांनी केले. आभार जयसिंग भोसले यांनी मानले.
के.पी. पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी.पाटील यांच्या प्रचारार्थ आजरा शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी आजरा साखर कारखान्याचे संचालक रशीद पठाण, निसार लाडजी, नौशाद बुड्डेखान, समीर चांद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर येणे गरजेचे असून यासाठी खारीचा वाटा म्हणून के. पी. पाटील यांना विजयी करावे असे आवाहन कार्यकर्ते मतदारांना करताना दिसत होते.

चंदगड मधून राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा उमेदवार निवडून येणार : अप्पी पाटील यांचा विश्वास

महागाव : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महायुतीचे उमेवार राजेश पाटील यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत महायुतीचा पराभव करणारच आणि त्यासाठीच समविचारी लोक एकत्र आलो असून कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सरकारवर येऊ नये व यासाठी मतदार संघाचा मुलभूत विकास हे आमचे उदिष्ट आहे असे चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या तीन्ही तालुक्यातील जनता सोबत असून या जनतेच्या बळावरच आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत असे पाटील यांनी स्पष्ट केले.
ही विचारांची लढाई आहे. एका बाजूला धर्माध, आणि त्यांचे मित्रपक्ष तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी व सर्व विचारी अशी ही लढाई आहे.
हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असा मतदारसंघ आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड वाव असणाऱ्या या मतदारसंघाला अद्यापही अपेक्षितच राहावे लागले आहे. अनेक छोटे मोठे पाणी प्रकल्प असूनही शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचू शकत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
या परिसरात असलेल्या नैसर्गिक संसाधनांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभे करण्याबरोबरच पायाभूत सुविधांवरच भर देण्याचा आपला मानस आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत यासाठीही विधानसभेत आवाज उठविला जाईन.
‘ एक संधी द्या …मतदार संघाचा कायापालट करून दाखवतो ‘ असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.

पोवाचीवाडी गावच्या ग्रामस्थांचा शिवाजीभाऊंना पाठिंबा

स्व कर्तृत्वावर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे शिवाजीराव पाटील असून इथल्या गोरगरीब जनतेसाठी आपलं सर्व ऐश्वर्य सोडून या भागातील गोरगरीब जनतेची काळजी घेत आहे. यामुळे आपण शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे पोवाचीवाडी ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.
यावेळी अरुण मातवंडकर, भगवंत नातवंडकर, उमेश सुतार, राजेश सुतार, उत्तम कोंडुसकर ,सागर सुतार, ज्ञानेश्वर यादव, अमोल चोपडे ,परसराम बेलेकर ,रामा नारळकर ,अमर यादव, रवी देवळी, प्रकाश कडोलकर, जयसिंग नारळकर, व महिलांमध्ये सुशीला बेलेकर, कांचना बेलेकर, पायल बेलेकर, गीता बेलेकर, शुभांगी मातवंडकर, भाग्यश्री यादव, सुनिता नारळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणाचा एक रुपयाही खाल्लेला नाही : आम.राजेश पाटील

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या पाच वर्षांमध्ये आमदारकी भोगत असताना कुठल्याही टक्केवारीच्या प्रकारात न अडकता समाज विकासाचे ध्येय ठेवून काम केले आहे. या कालावधीत विकास कामे देताना कोणाचा एक रुपयाही आपण खाल्लेला नाही. मतदारसंघाचा विकास हेच आपली ध्येय आहे. मतदारसंघाचा बिहार होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला विजयी करा असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.ढोलगरवाडी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी संग्रामसिंह कुपेकर ,राजेंद्र गडेन्नावर,नामदेवराव निटुरकर,दिपक पाटील सर,अमृतराव जत्ती, अजित व्हण्याळकर, अजित तुरटे,सुभेदार राजू देसाई,सखाराम केसकरकर, जाणबा चौगुले, दत्तात्रय कदम, गणपत तुळसकर, अरुण पाटील, अगनेल फर्नांडीस, डॉ सतीश पाटील,लक्ष्मण मेनसे, दत्तू पाटील, रमेश सोमना, कलप्पा पाटील, मलाप्पा गावडे, सौं सरिता तुपारे यांच्यासह आजी माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक संधी ए.वाय. यांना देऊन विधानसभेत पाठवूया…
कडगाव येथील सभेत निर्धार

कडगांव : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहुजन व अल्पसंख्याक समाजाचा प्रश्नाची जाण असणाऱ्या व गेली तीस वर्षे समाजकारणातून राजकारण करुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणा-या ए. वाय. पाटील यांना भुदरगडवासियांकडून एक संधी देऊन विधानसभेत पाठऊया असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भुदरगड तालुका अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी अनफ खुर्द ता.भुदरगड येथील कोपरा सभेत बोलताना केले.
प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी रफिक नाईक हे होते.स्वागत नजीम नाईक यांनी केले यावेळी बोलताना अपक्ष उमेदवार ए.वाय. पाटील म्हणाले, प्रत्येक निवडणूकीत सरड्याचा रंगाप्रमाणे गेल्या तीन महिन्यात तीन पक्ष बदलून जनतेची प्रतारणा केलेले माजी आमदार व फक्त धनदांडग्या लोकांचा व ठेकेदारांचा विकास करणा-या आजी आमदारांना या मतदारसंघातील जनता खड्यासारखे बाजूला करुन मला विजयी करतील
यावेळी कडगाव बाजारपेठेतुन पदयात्रा काढली याप्रसंगी आलिम नाईक, विश्वास पाटील, सोपान सुतार, प्रताप चौगले, अरमान देसाई, सनी परीट,भिकाजी गायकवाड, संतान बारदेस्कर,प्रमोद सिद्रुक,विजय देसाई,संदीप गुरव, सागर गुरव,ज्योती थेडगे,मुनावर नाईक नासिर नाईक,नारायण तेजम, वसंत देसाई व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन विक्रम केंजळकर यांनी केले तर आभार दशरथ दिक्षांत यांनी मानले.

मतदान जनजागृतीसाठी पेरणोली येथे मानवी साखळी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथे मतदान जागृतीसाठी मानवी साखळी करण्यात आली. या वेळी गावातून मतदान जागृतीसाठी फेरी काढण्यात आली. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देण्यात आल्या.
ग्रामपंचायत अधिकारी संदिप चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ लोकशाहीमध्ये मतदानचे महत्व स्पष्ट केले. ग्रामस्थांनी मतदानामध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. श्री. ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही दौडचा शुभारंभ झाला. सरपंच प्रियांका जाधव, ग्रामपंचायत सदस्या सुषमा मोहीते, सुनिता कालेकर, शुभदा सावंत, डॉ. संतोष कांबळे, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, आरोग्य व पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी व विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
पेरणोली शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनुष्का गोवेकर यांनी आभार मानले.











