
शिंपी – चराटी गटातर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा आज सत्कार

नुकत्याच पार पडलेल्या आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांच्या अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांच्या गटातर्फे आज बुधवारी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहात सकाळी ११ वाजता सदर कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, आमदार प्रकाश आबीटकर, प्रा. अर्जुन आबीटकर यांच्या मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


‘ आजरा ‘ ची १५ डिसें.अखेरची ऊस बिले खात्यावर जमा
आजरा साखर कारखान्याची १५ डिसेंबर अखेरची ऊस बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे व संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
दि. १/१२/२०२२ ते १५/१२/२०२२ रोजी गाळप झालेल्या ऊसाची ३००० रु प्रमाणे विनाकपात रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे.
आजरा साखर कारखान्याचे ५८ दिवसात १.७०,१४० मे. टन ऊसाचे गाळप करून सरासरी ११.८ टक्के उदिष्ट ठेवून ११.०८ उताऱ्याने १.८६.६५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
सन २०२२-२३ या सालकरीता कारखान्याने ४.०० लाख मे.टन टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्याकरिता पुरेशी बीड व स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. कार्यक्षेत्रामध्ये क्रमपाळी पत्रकानुसार ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कारखानाकडे नोंद झालेला संपूर्ण ऊसाची नियोजनबध्द पद्धतीने गाळपाकरिता उचल करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने गाळप झालेल्या उसाच्या दिले निमितपणे व वेळेवर आला करण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याचे अध्यक्ष प्रा.शिंत्रे यांनी सांगितले.
अशोकअण्णा चराटी यांचा सत्कार

आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी यांची जिल्हा नियोजन विकास समितीवर शासन प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल आजरा साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक एम.के. देसाई, मुकुंदराव देसाई, संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर,सौ.सुनिता रेडेकर, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, लक्ष्मण गुडूळकर, दशरथ अमृते, अनिल फडके, आनंदा कांबळे, तानाजी देसाई, विलास नाईक, यांच्यासह संचालक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

१३ जानेवारी ते १५ जानेवारी अखेर मुंबईत होणार ‘कोल्हापूर महोत्सव ‘

नालासोपारा-वसई-विरार येथील छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने शुक्रवार दि. १३ जानेवारी ते रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ अखेर भव्य कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन सेंट्रल पार्क, महानगरपालिका मैदान, नालासोपारा पूर्व येथे करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन, दिनदर्शिका प्रकाशन, महिलांसाठी हळदीकुंकू, रस्सीखेच स्पर्धा, कोल्हापूर रत्न पुरस्कार वितरण, ऑर्केस्ट्रा, पोवाडा, जादूचे प्रयोग, कोल्हापुरी लावण्या इत्यादी कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती ज्यामध्ये तांबडा- पांढरा रस्सा व कोल्हापुरी मिसळीचा आस्वाद मुंबईस्थित कोल्हापूरवासीयांना घेता येणार आहे. कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल इत्यादीचे स्टॉलही मांडण्यात येणार आहेत.
सदर महोत्सव विलास बिरजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून महोत्सव यशस्वी करण्यासाठी परशुराम मांगले, परशुराम यादव मारुती संकपाळ, महादेव अर्दाळकर,रामचंद्र -हाटोळ आनंद रक्ताडे,रुपेश बामणे, आशिष शिखरे,सौ. शीलाताई लष्करे,सौ. वनिता पाटील, सौ मेघा होडगे यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विशेष कष्ट घेत आहेत.





