mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ...
पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     होन्याळी ( ता. आजरा ) येथील सौ. दामिनी सुश्मित बाबर या २३ वर्षीय विवाहितेचा लग्नात माहेरच्या मंडळींनी दागिने घातले नाहीत ,मानपान केले नाही या कारणास्तव वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल सौ. दामिनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुश्मित तानाजी बाबर ( पती ), सौ. कल्पना तानाजी बाबर ( सासू ), तानाजी बाबुराव बाबर ( सासरे , सर्व रा. होन्याळी, सध्या रा. गडहिंग्लज ) सौ. सुप्रिया संतोष पाटील (रा.होन्याळी )सौ. संजीवनी निशांत शिंदे ( रा.नूल ) या पाच जणांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की…

     दामिनी व सुश्मित हे नात्याने पती-पत्नी आहेत. लग्न झाल्यानंतर आजतागायत तिच्या सासरच्या मंडळींनी वेळोवेळी दामिनीच्या माहेरच्या मंडळींनी दहा तोळे सोन्याचे दागिने दिले नाहीत त्याबरोबर लग्नात मानपान केला नाही या कारणास्तव शारीरिक व मानसिक छळ केला.

      पती सुस्मित याने दामिनी यांच्या भावाला शिवीगाळ करून मारहाण करत मुंबईतील खोली व दामिनीच्या वाटणीची जमीन आपल्या नावावर करावी तरच दामिनीला नांदवणार अशी भूमिका घेतली व तिला मारहाण केली यावेळी दामिनी यांची चुलती सौ. स्वप्नाली तानाजी जाधव यांनाही सुश्मित याने मारहाण केली असल्याचे दामिनी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

      दामिनी यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे सांगितले.

पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाजीराव कांबळे करीत आहेत.

‘ जय श्रीराम ‘ च्या नाऱ्याने तालुका दुमदुमला


       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     रामनवमीनिमित्त आजरा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जय श्रीराम…च्या नाऱ्याने तालुका दुमदुमून गेला.

       येथील श्री राम मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाच्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सज्जनगड वरुन प. पु. शरदबुवा रामदासी महाराज यांचे आजरा येथील राममंदिर येथे आगमन झाले. रामनवमी निमित्त आरती व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

     रामतीर्थ येथील श्रीराम मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथेही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. याव्यतिरिक्त तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पेरणोली येथे आठवडी बाजाराला प्रारंभ

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     पेरणोली (ता. आजरा) येथे आठवडी बाजार भरवण्याला सुरवात झाली आहे. आठवड्याच्या दर बुधवारी येथे आठवडी बाजार भरेल. ग्रामदैवत रवळनाथ मंदिरा लगतच्या मैदानातील खुल्या जागेत बाजार भरणार आहे. पेरणोली ग्रामपंचायतीने याचे नियोजन केले आहे. प्रतशील शेतकरी संताजी सोले यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

      भाजीपाला, कडधान्य यासह अन्य साहित्याची वीस ते पंचवीस व्यापाऱ्यांनी दु‌काने मांडली होती. बाजारात चांगली उलाढाल झाली आहे.

       पेरणोली पंचक्रोशीतील नागरीकांना बाजारासाठी आजरा या तालुक्याच्या गावी जावे लागते. पेरणोली येथे बाजार सुरु झाल्याने स्थानिक पातळीवर गरजा भागवल्या जाणार आहेत. त्यामु‌ळे अनेक दिवसांच्या ग्रामस्थांच्या मागणीला आज मुर्त रूप मिळाले. सरपंच सौ. प्रियांका संतोष जाधव म्हणाल्या, गावच्या विकासाला चालना देण्याबरोबर भाजीपाला उत्पादक, छोटे व्यावसायिक व तरुणांना व्यवसाय करता येईल. गावात छोटी बाजारपेठ सुरु करण्याच्या या उद्देशाने दर बुधवारी बाजार भरवण्यात येणार आहे. ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

      यावेळी उपसरपंच संदिप नावलकर, ग्रामपंचायत सदस्य रणजित फगरे, संकेत सावंत, सुनिता कालेकर, रुपाली पाईम, अमोल जाधव, सुषमा मोहीते, शुभदा सावंत, अश्विनी कांबळे, काकासो देसाई, हिंद्राव कालेकर, मंदाकिनी कोडक, पांडूरंग निकम, आदेश गुरव, राजू कळेकर, शेखर कळेकर, मुकुंद कांबळे, यशवंत कोडक, उदय कोडक,बाबासो देसाई, फिलीप लोबो यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


शाहू छत्रपतींचा आज तालुक्यात प्रचार दौरा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती यांचा आज गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी तालुक्यात प्रचार दौरा होणार आहे.

       सकाळी दहा वाजता उत्तूर येथील मुकुंददादा आपटे फाउंडेशन हॉल येथे, सकाळी ११.३० वाजता पेरणोली बस स्थानक मैदानावर, दुपारी १२:३० वाजता गवसे येथील रवळनाथ चौक, सायंकाळी चार वाजता पोळगाव येथील विठ्ठल चौक, तर सायंकाळी साडेचार वाजता वाटंगी येथील मुख्य चौक आणि सायंकाळी सात वाजता मलिग्रे येथील मुख्य चौकामध्ये प्रचार सभा होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात राष्ट्रवादीचे मंत्री मुश्रीफ यांच्या फेर्‍या वाढल्या… कार्यकर्ते फुल रिचार्ज… जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री मुश्रीफ यांना मिळणार संधी…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!