
पोलीस असल्याचे सांगत उत्तूरमध्ये वृद्धाचे ३ तोळे सोन्याचे दागिने लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर येथील भर चौकात दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध व्यक्तीकडे गांजा बाबत तपासणीचा बहाणा करीत वृद्धाकडील तीन तोळ्याचे एक लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले
शुक्रवारी तुकाराम धोंडीबा पाटील (रा. कडगाव ता. गडहिंग्लज) हे उत्तुर येथील चौकात आले असता सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकल वरून पाटील यांच्या जवळ आल्या. त्यापैकी मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगितले. तसेच आपल्या बरोबर असणारी व्यक्ती गांजा प्रकरणातील आरोपी असल्याचे सांगितले. तसेच पाटील यांच्याकडे आपल्याकडेही गांजा आहे का? अशी विचारणा करत तपासणीच्या बहाण्याने उत्तुर बसस्थानकासमोरील एका मोकळ्या शेडमध्ये नेले. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तींनी पाटील यांची तपासणी करून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी व चेन आपल्या जवळील रुमालात बांधून पाटील यांच्याकडे दिले. चोऱ्या होत असताना अंगावर दागिने घालून कसे फिरता असे म्हणत त्यांना घरात जाऊन उघडून पाहण्यास सांगितले.
पाटील यांनी घरात जाऊन रुमाल उघडून पाहिला असता, त्यामध्ये सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन व अर्ध्या तोळ्याची अंगठी असे एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले.
पुन्हा तेच प्रकार…
यापूर्वीही अशा घटना घडल्या असताना पुन्हा – पुन्हा वयोवृद्ध नागरिक अशा प्रकारांना बळी पडत असल्याने अंगावर सोन्याचे दागिने बाळगताना विचार करण्याची वेळ आली आहे.

आजरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नॅब नेत्र रूग्णालय मिरज, ज्येष्ठ नागरिक संघटना व सर्व श्रमिक संघटना, शाखा – आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुंडू दादू हरेर यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसाच्या निमित्ताने, निरामय क्लिनीक आजरा येथे पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये १७२ व्यक्तींची नेत्र र तपासणी करण्यात आली.
९० रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर ४९ मोतीबिंदू ऑपरेशन निवड केली असून, त्याना मंगळवारी नॅब नेत्र रूग्णालय मिरज येथे मोफत ऑपरेशन केले जाणार आहे . यावेळी गुंडू हरेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन, त्याच्या हस्ते रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास डाॅ. आर पी डिसोझा, डाॅ. अनिता डिसोझा, डाॅ. सुदाम हरेर, काॅ. शांताराम पाटील, काॅ संजय घाटगे, महादेव होडगे, मनप्पा बोलके, प्रेमा शिवणगेकर, हिंदूराव कांबळे,गणपती ढोणूक्षे, रझाक भडगावकर, शोभा पाटील, नरसू शिंदे, आनंदा सुतार यांच्यासह गिरणी कामगार, जेष्ठ नागरिक, वारकरी मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.

शेळप चंद्रानन स्वामी महाराज जयंती व डांबरी रस्ता शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेळप येथे चंद्रानन स्वामी महाराज जयंती व डांबरी रस्ता शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
ताराराणी फेडरेशनच्या अध्यक्षा, पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सौभाग्यवती विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सौ.अर्चना पांगिरेकर वहिणी, अनिकेत चराटी, जितेंद्र भोसले,सरपंच अर्जुन बागडी, चंद्रकांत घुणे सर, सुधाकर पाटील, बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील, दाभिल सरपंच युवराज पाटील, किटवडे सरपंच लहू वाकर, खेडगे डे सरपंच प्रकाश कविटकर, मेजर ढोकरे, मुंकुंद नार्वेकर शेळप ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यंकटराव येथे सुनील गोवेकर यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा प्रशालेतील माजी विद्यार्थी सुनील गोवेकर यांनी प्रशालेला वॉटर प्युरिफायर सिस्टीम भेट दिली. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष श्री. एस. पी. कांबळे. सचिव श्री. अभिषेक शिंपी, संचालक श्री पांडुरंग जाधव, श्री सचिन (भैय्या) शिंपी, श्री.कृष्णा पटेकर, श्री. विलास पाटील ,श्री. सुधीर जाधव, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार, सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डी. आर पाटील व आभार श्री. पी.व्ही. पाटील यांनी मानले.


केंद्रीय प्राथमिक शाळा पेरणोली येथे हळदीकुंकू कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
केंद्रीय प्राथमिक शाळा पेरणोली येथे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. सुमित्रा गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सौ. अनुष्का गोवेकर यांनी केले.
सरपंच सौ. प्रियंका जाधव यांचे हस्ते श्रीमती अर्चना जाधव याना हळदीकुंकू देण्यात आले व यथोचित सन्मान देण्यात आला. समाजातील विधवा स्त्रियांना त्यांचा काहीही दोष नसताना समाजापासून दूर ठेवण्याचा दृष्टिकोन बदलून सर्व स्त्रीयांना योग्य सन्मान देण्याची गरज आहे असे मत सरपंच सौ. जाधव यानी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. ज्योती मोहिते यांनी शाळेतील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले . यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. नंदिनी देसाई. डाॕ सारीका पाटील सौ. मंदाकिनी कोडक यानी आपली मनोगते व्यक्त केली. जिल्हास्तरावर सहभागी झालेली आसावरी कालेकर कथाकथन व तनिष्क देसाई वक्तृत्व सादर केले.
सौ .कविता नाईक ,श्रीमती गायत्री नळकांडे यांनी महिलांना हळदीकुंकू दिले. यावेळी केंद्र प्रमुख रावसाहेब देसाई, ग्रामपंचायत सदस्य सौ.अश्विनी कांबळे ,सौ. सुषमा मोहिते, सौ सोनाली मोहीते, श्रध्दा गुरव, रेखा दोरूगडे सर्व महिला पालक उपस्थित होत्या.
आभार सौ. सुप्रिया पाटील यांनी मांडले.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




