mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


महिलेची सोन्याची माळ लंपास…
बसमध्ये चढत असताना प्रकार

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      एसटी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सौ.सुवर्णा धोंडीबा डोंगरे या शेळप येथील महिलेची ८५ हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ लांबवली. या घटनेची बुधवारी आजरा पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की…

      आजरा ते गावठाण बसमध्ये संबंधित महिला चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास करून घटनास्थळावरून पोबारा केला.

    याबाबतची फिर्याद सौ. सुवर्णा डोंगरे यांनी आजरा पोलिसांत दिली असून पो. हे. कॉ. संतोष घस्ती पुढील तपास करीत आहेत.

स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आज आज-यात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मूळ स्थान अक्कलकोट) येथून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका आगमन आज गुरुवार दिनांक १६ मे रोजी दुपारी १ ते २.३०  वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी निशांत जोशी यांच्या घरी उपलब्ध होणार आहेत. भाविकांनी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन निशांत जोशी यांनी केले आहे.

बसस्थानावरील कचरा उचलायचा कोणी…?

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा बस स्थानकावर साफसफाईचा प्रश्न वारंवार निर्माण होत असून बस स्थानकावर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे येथील कचरा नेमका उचलायचा कोणी? असा प्रश्न प्रवासी करत आहेत.

     वास्तविक एसटी महामंडळाकडून सफाई कामगाराद्वारे या कचऱ्याची उचल होणे आवश्यक आहे. परंतु सफाई ठेकेदार व सफाई कामगार यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने व सफाई कामगार वारंवार रजेवर जात असल्यामुळे पुन्हा पुन्हा येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. बसस्थानक परिसराचा व नगरपंचायत प्रशासनाचा काहीही संबंध नसताना नाहक नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कचरा उचलण्याची जबाबदारी टाकली जात असल्याचेही दिसत आहे.

     हेच प्रकार जर सुरू राहणार असतील तर एसटी महामंडळाने संबंधित ठेकेदार तरी बदलावा अथवा ठेकेदाराने संबंधित कर्मचारी तरी बदलावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

कोळींद्रे- पोश्रातवाडी पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कोळींद्रे- पोश्रातवाडी दरम्यान तार ओहोळ वर असणारा पूल हा अत्यंत अरुंद असून वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचा बनला आहे. तातडीने पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

     उचंगी प्रकल्प झाल्यापासून तार ओहोळला बारमाही पाणी असते. अशातच या पुलाची रुंदी कमी व संरक्षक कठडे नसल्याने भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    बांधकाम विभागाने तातडीने या पुलाचे रुंदीकरण करून दोन्ही बाजूला संरक्षण कठडा उभा करण्याची मागणी नरसु शिंदे, आनंदा सुतार, सुरेश बुगडे, सुधाकर घोरपडे, शिवाजी भगुत्रे ,अमर मटकर, भिकाजी गोंधळी, आदींनी केली आहे.


 

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

mrityunjay mahanews

चार लाख मे.टन गाळपाचा टप्पा यावर्षी ओलांडणार : प्रा.शिंत्रे आजरा साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न…

mrityunjay mahanews

तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर…?

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात एक ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

विधानपरिषद जोडणीसाठी राज्यमंत्री सतेज पाटील आजऱ्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!