
ट्रॅक्टर खाली सापडून एकाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर आजरा बस स्थानकापासून जवळच असलेल्या हरेर कॉम्प्लेक्स समोर ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून प्रज्वल उर्फ गणेश प्रकाश बापट या चाफवडे येथील दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.
प्रत्यक्ष दर्शींनीं आठवडा बाजाराचे साहित्य घेऊन प्रज्वल हा ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडला असे सांगितले.
डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आला आहे. गणेश याच्या पश्चात लहान भाऊ व आई असा परिवार आहे तो येथील स्थानिक शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता.
पुढील माहिती आजरा पोलीस घेत आहेत.







साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




