mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


मैदानी खेळ ते डॉल्बीचा ठेका

आजऱ्यात शिवजयंती दणक्यात…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा शहरात परंपरेनुसार संयुक्त शिवजयंती उत्साहात साजरी झाली.

       लेझीम, मर्दानी खेळ व पारंपारिक वा‌द्याच्या निनादात मिरवणूक निघाली. शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गेली कित्येक वर्षे परंपरेनुसार आजरा शहरात शिवजयंती साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तरुण मंडळे पारंपरिक शिवजयंतीत एकत्र आली होती. येथील व्यंकटराव हायस्कूलपासून मिरवणु‌कीला सुरवात झाली. नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. मंडल अधिकारी जी. बी. पाटील, सुधीर कुंभार, नाथ देसाई, प्रभाकर कोरवी, आनंदा कुंभार बाळ केसरकर, अभिषेक  रोडगी,वैभव सावंत ,आकाश पाटील, गौरव देशपांडे, बापू टोपले,विजय थोरवत, सुभाष कांबळे, अश्विन  डोंगरे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

      आजरा- गडहिंग्लज मार्ग, छत्रपती संभाजी महाराज चौक, मुख्य बाजारपेठ मार्ग मिरवणुक सोमवार पेठ, गणपती गल्ली, सुतार गल्ली, कृषी चिकित्सालय, लिंगायत गल्ली अशी निघाली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या जवळ मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत बेळगाव येथील युवक, युवतीनी मर्दानी खेळ सादर केले. युवक व महीलांचे लेझीम आकर्षणाचा विषय होते. छोट्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम, हनुमानाचा वेशासह शिवकालीन वेशभूषा केली होती. हे देखील मिरवणु‌कीचे विशेष आकर्षण ठरले.

      दिवसभर ठीक- ठिकाणी विविध मंडळांच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी निघालेल्या या मिरवणुकीत प्रचंड जल्लोष दिसत होता. पारंपारिक वाद्यांच्या निनादासह लेसर शो व डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत होती.

        पालखीतून छत्रपती शिवरायांची मुर्ती नेण्यात आली. नगरसेवक धनंजय पारपोलकर, संदिप पारळे यांनी पालखी वाहीली. महीलांनी औक्षण केले. दरम्यान बुधवार (ता.८) युवकांनी पहाटे हिरण्यकेशी नदीच्या उगमाच्या ठिकाणाहून पवित्र जल आणले. छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती मूर्तीला महाभिषेक करण्यात आला. या वेळी शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      वाघाच्या तालीम मंडळाच्यावतीने शहरात छत्रपती शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. बसस्थानक व छ. संभाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली. मुख्यबाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणूक झाली. शिवप्रेमी व नागरीक उपस्थित होते.वाघाच्या तालमीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रभाकर कोरवी, योगेश पाटील, वाघाच्या तालीम चे संस्थापक अध्यक्ष शैलेश पाटील, संतोष गिरी, राहुल नाईक, अक्षय नलवडे, मंदार बिरजे,मारुती बिरजे, अमर पाटील, निलेश पारपोलकर, ऋत्विक बिरजे आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

     शिवजयंतीसह मिरवणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.

जय भीम तरुण मंडळाकडून रुग्णांना फळांचे वाटप

      छत्रपती शिवाजी महाराज जयंती परंपरेनुसार सामाजिक कार्य म्हणून आजरा ग्रामीण रुग्णालय आजरा .रुग्णांना तसेच स्टाफ मेंबर यांना जय भीम तरुण मंडळ आजरा यांच्यावतीने फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे, नितीन यादव ,सचिन कांबळे ,श्रीधर कांबळे ,ऋषिकेश कांबळे. कुणाल कांबळे ,स्वप्नील कांबळे,मयूर कांबळे, श्रावण कांबळे ,संदेश कांबळे ,योगेश कांबळे, सनी कांबळे ,साहिल कांबळे ,रंणजीत कांबळे ,श्रीवेन कांबळे उपस्थित होते.

एटीएमची दुर्दशा…

          आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हजारो रुपयांचे दररोज व्यवहार होणाऱ्या आजरा शहरातील छ. संभाजी चौकातील एका नामांकित बँकेच्या एटीएमची अक्षरशः दुर्दशा झाली असून बऱ्याच वेळा या एटीएम मध्ये भटकी जनावरे, भटकी कुत्री बसलेली दिसतात, तर या एटीएम चा दरवाजा निसटल्याने तो तसाच एका बाजूला ढकलून लावण्यात आला असल्याने ग्राहकांची अडचण होत असून संबंधित बँकेने या एटीएम केंद्राची सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.


रस्त्याचे काम रेंगाळले… एसटीची कसरत

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील संभाजी चौक ते बस स्थानक परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप न झाल्याने नागरिकांमधून संताप  व्यक्त होत आहे. 

      आजरा बस स्थानकावरून ये – जा करणाऱ्या एस.टी. बस चालकांनाही बस स्थानकात बस नेत असताना व बस स्थानकातून त्या बाहेर काढत असताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामध्ये बऱ्याच वेळा एस.टी.चे नुकसानही होताना दिसत असून या मार्गाचे काम नेमके कधी होणार ? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

ऐन उन्हाळ्यात शहरात पाण्याची डबकी…?

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा शहरातील जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेला लागलेल्या गळत्यांचे ग्रहण उन्हाळ्यातही कायम असून या गळत्या काढताना नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

     शहरामध्ये ठिकठिकाणी असलेल्या या गळत्यांमुळे पाण्याची डबकी तयार झालेली दिसतात. यामुळे वाहतुकीस अडथळा तर होत आहेच परंतु ती नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक बनली आहेत.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले जमा अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची माहिती

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!