mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

आज-यात आज डोक्यावरील आरतीचा थरार

                  आजरा – प्रतिनिधी

         गेली कित्येक वर्षे आजरा शहरामध्ये सुरू असलेली डोक्यावरील आरतीची परंपरा आजही कायम असून संपूर्ण तालुका वासीयांचे नवरात्रीचे खास आकर्षण असणाऱ्या या कार्यक्रमाचे आज सायंकाळी साडेसात वाजता रवळनाथ मंदिर येथे आयोजन केले आहे.

          येथील श्री रवळनाथ नवरात्र उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.डोक्यावरील संपूर्ण केस काढलेले गुरव, त्यांच्या डोक्यावर आरती व पारंपारिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. यावेळी नंग्या तलवारी घेऊन पुजाऱ्याच्या मागोमाग मानकरीही प्रदक्षिणा घालताना दिसतात.

          आजरा शहरातील नवरात्र उत्सव कालावधीतील हा एक महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम समजला जातो.हा थरार पहाण्यासाठी अबालवृद्ध भाविक प्रचंड गर्दी करताना दिसतात.


निवास पाटील याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

                       आजरा – प्रतिनिधी

           आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील नियमातदार निवास पाटील याच्यावर सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल शुक्रवारी कारवाई केली.

            या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्याला आज शनिवारी गडहिंग्लज येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


२०१० मध्ये कंत्राटी व खाजगी नोकरी भरतीप्रकरणी महाविकासआघाडीचा आजरा तालुका भाजपा च्या वतीने  निषेध

                     आजरा – प्रतिनिधी

          काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील तात्कालीन सरकारने २०१० मध्ये कंत्राटी नोकर भरतीचा काढलेला जी.आर. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्याने काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचे पाप महायुतीच्या सरकारने धुतले असल्याचे मत भा.ज.पा. ता.सरचिटणीस आतिष सरदेसाई यांनी व्यक्त केले.

           काँग्रेस ,शिवसेना (उबाठा) शरद पवार (राष्ट्रवादी) या महाविकास आघाडीचा आजरा तालुका भाजपाच्या वतीने निषेध प्रसंगी ते बोलत होते..

           यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी व भाजपा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर, जनार्दन टोपले, विठ्ठल उत्तुरकर, संतोष बेलवाडे,अनिल पाटील,दिगंबर देशपांडे,शुभम पाटील, उदय चव्हाण,राजू पोतनीस व कार्यकर्ते उपस्थित होते.


चांदेवाडी व देऊळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध..

                      आजरा- प्रतिनिधी

            शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चांदेवाडी व देऊळवाडी ग्रामपंचायती करता सरपंचपदासाठी प्रत्येकी एक तर सदस्य पदाकरिता सात अर्ज दाखल झाल्याने या ग्रामपंचायती  बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माघारी नंतर यावर अंतिम. शिक्कामोर्तब होईल.

        चांदेवाडी ग्रामपंचायत/बिनविरोध 

सरपंच – स्वाती कोंडुसकर,

सदस्य – राजेंद्र गुंजकर, शोभा जाधव
रामचंद्र सावंत,प्रगती गिलबिले,
वनिता हसबे, मंगल सावरतकर,
विष्णू सुतार

देऊळवाडी ग्रामपंचायत/बिनविरोध

सरपंच – यशोदा पोवार,

सदस्य- संजयभाई सावंत, स्नेहल कदम,
सुमन पोतनीस,प्रियंका खोत,संतराम सावंत,
माधुरी पोतनीस

अनुसूचित जातीची जागासंबंधित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने रिक्त राहिलीआहे.


पोळगाव येथे आज ट्रॅक्टर रिव्हर्स पळवण्याच्या स्पर्धा

आजरा – प्रतिनिधी

             श्री दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ, पोळगाव ता.आजरा यांच्या वतीने आज रविवार दिनांक २२ रोजी ट्रॅक्टर रिव्हर्स पळवण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

        या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ४००१/- रुपये ३००१/- रुपये,२००१/- रुपये व १००१/- रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असून एक मिनिटे हा कालावधी राहणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यानी ९४०४९९०४४७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पाण्यावर पेटणा-या पणत्या बनविण्याची कार्यशाळा

                    आजरा – प्रतिनिधी

            आजरा महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभाग व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ पाण्यावर पेटणाऱ्या पणत्या ‘ तयार करण्याची कार्यशाळा पार पडली.

          कार्यशाळेत जागृती कॉलेजच्या प्रा. शिवानंद हत्ती यांनी पाण्यावर पेटणाऱ्या एलईडी पणत्यांची जोडणी करण्याचे प्रात्यक्षिक दिले. नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

              कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा.लता शेटे, गिरीश कुरुणकर, डॉ. बी. एम. मोहिते सौ.नेहा पेडणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


आज शहरात
नवरात्र विशेष

🟣🟡🔴श्री रवळनाथ नवरात्र उत्सव समिती :- डोक्यावरील जागर आरती (सायं.७.३० वाजता) वाजता.तानाजी पाटील यांचा रेणुकादेवीचा जागर कार्यक्रम ( वेळ- रात्री ९ वाजता )

  🟣🟡🔴लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ:- महिलांसाठी कुंकूमार्चन (वेळ- रात्री ८ वाजता)

🟣🟡🔴भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ :- सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद (वेळ- दु. १२ ते ३ वाजेपर्यंत)

🟣🟠🔴छत्रपती शिवाजीनगर तरुण मंडळ नवरात्र उत्सव :- महा आरती व होम मिनिस्टर स्पर्धा (वेळ – रात्री ८ वाजता )

🟣🟡🔴क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ – स्थानिक मुलांचा रेकॉर्ड डान्स (वेळ – रात्री ८ वाजता)


दुर्गामाता दर्शन

दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, मडीलगे

ध्यक्ष :-विनायक पाटील                   पाध्यक्ष :- भास्कर पाटील                       सचिव :- राकेश वांगणेकर                 खजिनदार :- श्रीतेज कवळेक

नवरात्र उत्सव तरुण मंडळ,उत्तूर

अध्यक्ष:-रुपेश गाडीवड्डर
उपाध्यक्ष :- सुशांत केसरकर
खजिनदार:- असिफ नाईकवाडे
सचिव:- संगम रावण

निधन वार्ता… रत्नाबाई आजगेकर

         पेंढारवाडी ता. आजरा येथील श्रीमती रत्नाबई विट्ठल आजगेकर (वय ७०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याकडून चालू हंगामातील संपूर्ण ऊस बिले अदा

mrityunjay mahanews
error: Content is protected !!