

सर्पदंशाने सुलगाव येथील एकाचा मृत्यू…

आजरा – प्रतिनिधी
सुलगाव ता. आजरा येथील शिवाजी लक्ष्मण देसाई ( वय ६५ वर्षे ) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. देसाई हे शेतामध्ये जनावरांकरिता गवत कापून आणण्यासाठी गेले होते.सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने घरच्या मंडळीनी शेतात जाऊन पाहिले असता ते सर्पदंश होऊन मृत झालेले आढळले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ऐन नवरात्र उत्सव कालावधीत घडलेल्या या घटनेने सुलगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.


१० ग्रामपंचायतीसाठी२७० उमेदवारी अर्ज
देऊळवाडी, चांदेवाडी बिनविरोधच्या दिशेने

आजरा :प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण २७० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.शुक्रवारी शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये सदस्य पदासाठी २२६ तर सरपंचपदासाठी ४४ अर्ज दाखल करण्यातआलेआहेत.खोराटवाडी,
चांदेवाडी येथील सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीकरीता प्रत्येकी १ दाखल झाल्याने या निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग खुला झाला आहे . जाधेवाडी येथील एका जागेसाठी २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
आज शुक्रवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती.
पेरणोली व मेंढोली येथे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने येथे निवडणुकीत मोठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
ग्रामपंचायत निहाय दाखल अर्ज पुढील प्रमाणे
◼️बुरुडे :- सरपंच ३/सदस्य ३०
◼️पेरणोली :-सरपंच ६/सदस्य ४७
◼️सुलगाव :-सरपंच ५/सदस्य २०
◼️चांदेवाडी :- सरपंच १/सदस्य ७
◼️हरपवडे :- सरपंच ६/सदस्य १८
◼️मेंढोली :- सरपंच ८/सदस्य २९
◼️इटे:- सरपंच २/सदस्य २३
◼️वेळवट्टी – सरपंच ७/सदस्य २८
◼️देऊळवाडी :- सरपंच १/सदस्य ७
◼️मसोली :- सरपंच ५/सदस्य १७
असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.


शाळा बचाव आंदोलनाच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद.
शिक्षण हक्क यात्रा यशस्वी करण्याचा निर्धार …

आजरा- प्रतिनिधी
राज्य सरकारच्या वीस पटाखालील शाळा बंद निर्णयाविरोधात शिक्षण मंत्री ना दिपक केसरकर यांच्या घराच्या दिशेने निघणाऱ्या लॉंग मार्चची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गावागावात होतं असलेल्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कॉ संपत देसाई आणि कॉ.संजय तर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या दोन टीम तालुक्याचा दुर्गम भाग पिंजून काढत आहेत. वेळवट्टी, माध्याळ, मेढेवाडी, दर्डेवाडी, शेळप, खेडगे विनायकवाडी, चित्रानगर येथे कॉ. संपत देसाई यांच्या टीमने तर बुरुडे, गणेशवाडी, परोली, देऊळवाडी, रायवाडा, जेऊर, शृंगारवाडी येथे कॉ.संजय तर्डेकर यांच्या टीमने घेतलेल्या बैठकांना लोकांनाचा भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. सुगीचे दिवस असले तरी प्रत्येक घरातून माणसे बाहेर पडणार असून हा लॉंग मार्च यशस्वी करण्याचा निर्धार गावागावातील लोक करीत आहेत.
तालुक्यातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे आंदोलन जोपर्यंत शाळा बंदचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत चालू ठेवायचे या जिद्दीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत.


भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी…
अन्यथा आंदोलन

आजरा :- प्रतिनिधी
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांमध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी. लाचलुचपतच्या जाळ्यात विकास पाटील नावाचे कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी भ्रष्ट कारभारासंदर्भात याच कार्यालयाच्या दारात आंदोलन केले होते. मात्र वरिष्ठांनी त्याची पाठराखण केली.
सदर कार्यालयामध्ये पैसे देणाऱ्यांची कामे होतात गरिबाला न्याय मिळत नाही अशी जनमानसात चर्चा होतीच मात्र सापडल्याशिवाय लबाड म्हणता येत नाही आता सदर कर्मचाऱ्यांसह कार्यालयातील मोजणी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करावी. गरिबाला मोजणीला पैसे भरून सुद्धा लवकर मोजणी येत नाही,
कर्मचारी कमी असल्याचे सांगून गरीब लोकांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर अरेरावी केली जाते याचा अनुभव नागरिकांना येत आहे. सदर कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी न झाल्यास कार्यालयाच्या दारात आंदोलन केले जाईल, भ्रष्टाचार मुक्त शासकीय कार्यालये झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कॉ.शिवाजी गुरव यांनी केली आहे.



कोळींद्रे येथील हनुमान विकास सेवा संस्थेत मायक्रो एटीएम चे उद्घाटन

आजरा : – प्रतिनिधी
श्री हनुमान विकास सेवा संस्था, कोळींद्रे येथे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मायक्रो एटीएम ची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश सावंत, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक विजय कुंभार, विजय सरदेसाई, विजय कांबळे, सुभाष सावंत, संतराम कुराडे, गणपत पाटील, बाबू पाटील, तुकाराम जाधव,प्रकाश पाटील, सुरेश बुगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


मडीलगे येथे आरोग्य शिबिर संपन्न

आजरा :- प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मडीलगे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मडीलगे आणि श्री दुर्गामाता सार्वजनिक तरुण मंडळ मडीलगे यांचे संयुक्त विद्यमाने आयुष्मान भवः अभियान अंतर्गत वयवर्षे १८ वर्षांवरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली,आणि त्यांना मोफत गोळ्या-औषधे देण्यात आली.
तसेच त्यांचे ABHA कार्ड आणि Golden कार्ड काढण्यात आले,तरी या शिबिराचा जवळपास १०० पुरुषांनी लाभ घेतला.


आज शहरात
नवरात्र विशेष
🟧◼️🟧श्री रवळनाथ नवरात्र उत्सव समिती :- सोंगी भजन ( वेळ- रात्री ९ वाजता )
🟧◼️🟧लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ:- लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा(वेळ- रात्री ८ वाजता)
🟧◼️🟧भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ :- रास दांडिया (वेळ- रात्री ९ वाजता )
🟧◼️🟧छत्रपती शिवाजीनगर तरुण मंडळ नवरात्र उत्सव :- महा आरती व होम मिनिस्टर कार्यक्रम (वेळ – रात्री ८ वाजता )
🟧◼️🟧क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ – सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद (वेळ – दु.१२ ते ३ वा.)
निधन वार्ता
विठ्ठल सुतार

शिरसंगी ता.आजरा येथील रहिवासी विठ्ठल कोंडीबा सुतार ( वय वर्ष ८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच वसंत विठ्ठल सुतार यांचे ते वडील होत.


दुर्गामाता दर्शन
नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ खेडे

🟡◼️🟡अध्यक्षा : सौ.स्मिता विलास गोडसे
🟡◼️🟡उपाध्यक्षा : सौ.साधना प्रकाश चव्हाण
🟡◼️🟡खजिनदार : सौ.ज्योती बाळासाहेब सावरतकर
🟡◼️🟡मूर्ती देणगीदार : श्री . विलास गणपती गोडसे
धर्मवीर शंभूराजे नवरात्र उत्सव मंडळ मडीलगे

🟡◼️🟡अध्यक्ष :-अनिल दत्तू निऊंगरे
🟡◼️🟡उपाध्यक्ष ; – शैलेश निवृत्ती निऊंगरे
🟡◼️🟡सचिव :- विशाल येसणे
🟡◼️🟡खजिनदार :- विजय येसणे




