mrityunjaymahanews
अन्य

रात्रीस खेळ चाले… पोलीसांकडून चौघांना अटक

रात्रीस खेळ चाले…

चौघाना अटक …

आजरा पोलिसांकडून मोटर सायकल चोरी करणा-या टोळीकडून १२ मोटरसायकल जप्त.

पोलीस अधीक्षकसो श्री. शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प ,इचलकरंजी श्रीमती जयश्री गायकवाड यांनी दिले सुचनेप्रमाणे व राजीव नवले ,उप विभागीय पोलीस अधिकारी ,गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांनी केले मार्गदर्शनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल हारूगडे  व आजरा पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी आजरा पोलीस ठाणेकडील तसेच कागल, राधानगरी मुरगूड, गडहिंग्लज तसेच निपाणी जि बेळगाव [कर्नाटक] पोलीस ठाणेकडील दाखल असले मोटरसायकल चोरी गुन्हयातील एकुण १२ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेला एकुण दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सध्या कोल्हापुर शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये मोटर सायकल चोरीचे प्रमाणामध्ये वाढ झालेने अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इंचलकरजी श्रीमती जयश्री गायकवाड  यांनी दिले सुचनेप्रमाणे व राजीव नवले,  उप विभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांनी केले मार्गदर्शनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल हारूगडे यांनी पोलीस अंमलदार यांना मोटर सायकल चोरी गुन्हे करणारे गुन्हेगारावर लक्ष ठेवून तसेच गोपनीय यंत्रणा सतर्क करून कारवाई करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे दि.४ फेब्रु. रोजी मिळाले बातमी प्रमाणे नितीन संभाजी कांबळे(वय २३, रा आप्पाचीवाडी, ता निपाणी), सुरज उर्फ अर्जुन गणपती उर्फ रमेश गायकवाड(वय १९, रा.मुरगुड ता. कागल), अक्षय सुभाष गोसावी( वय २२, रा मुरगुड ता.कागल), ओमकार दामाजी निकम (वय १९, रा. मिणचे, ता. भुदरगड), कु प्रज्वल नागेश आकुर्डे, (वय १७, रा. आप्पाचीवाडी ता.निपाणी जि.बेळगांव) यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी आजरा तालुक्यातील विजय शशिकांत पाटील, रा. बेलेवाडी हु., ता. आजरा यांची दि.१९ जाने.२२ रोजी रात्री राहते घरासमोर असले साई किराणा स्टोअर्स दुकाना समोरून मोटर सायकल चोरी केलेचे सांगितले. तसेच त्यांनी कोल्हापूर, कागल, राधानगरी, गडहिंग्लज तालुक्यातील तसेच निपाणी जि बेळगाव [कर्नाटक] येथुन चोरीस गेलेल्या अशा दोन लाख रूपये किंमतीच्या १२ मोटर सायकली जप्त केल्या आहेत.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल हारूगडे, सहाय्यक फौजदार बिराप्पा कोचरगी, पो.हे कॉ. शिवाजी बामणे, पो.हे.कॉ. संदीप मसवेकर, पो.नाईक राजेश आंबुलकर, पो.नाईक निरंजन जाधव, पो.कॉ. अमोल पाटील, चालक पो.कॉ. परशराम कोळी, पो.कॉ. प्रदीप देवार्डे यांनी कारवाई केली आहे. मोटर सायकल चोरी प्रकरणांच्या तपासात आजरा पोलीस ठाणे अव्वल असल्याने जिल्हा पोलीस प्रमुख त्यांच्याकडून आजरा पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

 

 

रात्रीस खेळ चाले...

 

या प्रकरणातील चोरटे दिवसभर संबंधित मोटरसायकलची पाहणी करत व रात्री लॉक तोडून सदर मोटरसायकली चोरून नेत असत. या प्रकरणात आणखी एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकर आक्रमक…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!