mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

वेळवट्टी येथे मारामारी… दोघे जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

वेळवट्टी येथे लोखंडी रॉड ,काठ्यांनी मारहाण… दोघे जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा  नोंंद

 

 

वेळवटटी (ता.आजरा) येथे जमिनीच्या वादातून झालेल्या शाब्दिक चकमकीचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये आनंदा शंकर पोवार (व.व. ४८ व्यवसाय शेती रा, वेळवट्टी, आजरा), व शिवाजी लक्ष्मण पोवार(वय ४२) हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी पोलिसांनी गोविंद भिमराम पोवार अभिजीत भिमराम पोवार, भिमराम लक्ष्मण पोवार,लता भिमराव पोवार व निलम सुनिल पाटील रा. वेळवटटी ता. आजरा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विष्णु कळेकर यांच्या घरासमोर भाऊबंदीच्या वादातून पोवार कुटुंबीयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
यावेळी पुतणी स्वाती हिचे घरावर लाथा मारुन धडका देत आहेत असे समजलेने यातील फिर्यादी व जखमी हे स्वाती पोवार हिचे घराजवळ आले व ते स्वाती हिचे बाजुने आले असलेने त्याचा राग मनात धरून आरोपी यांनी संगनमत करुन बेकायदा एक जमाव करून यातील फिर्यादी व जखमी यांना लोखडी रॉड व मेस काठीचे दांडक्याने डोकीत हातापायावर, पाठीत छातीवर मारहाण करून जखमी केले. जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

……

अंध गव्याचा म्हसोबा देवस्थान जवळ मृत्यू


अंध अवस्थेत गेले चार दिवस आजरा-गडहींग्लज मार्गावरील म्हसोबा देवस्थान परिसरात गव्याचा मृत्यू झाल्याचे आज निदर्शनास आले. अंध अवस्थेत फिरणाऱ्या या गव्याला न्यूमोनिया झाला होता व हृदय विकाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सरपंच परिषदेच्या आजरा तालुकाध्यक्षपदी जी.एम. पाटील

सरपंच  परिषदेच्या आजरा तालुकाध्यक्षपदी जी.एम. पाटील यांची निवड करण्यात आली आहे.  उपाध्यक्षपदी आप्पासाहेब सरदेसाई यांची निवड झाली आहे. अमोल भांबरे व आप्पासाहेब सरदेसाई यांची उपाध्यक्षपदी तर नामदेव जाधव यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ.मनीषा देसाई यांची निवड झाली आहे.सौ. वैशाली गुरव व सौ.अंबुताई सुतार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आजरा तालुका कोरोना अपडेट्स…

दिनांक ८.२.२०२२.. दहा बाधित

( शिरसंगी, उत्तुर, मुरुडे,सुळे,मलिग्रे,कोळिंद्रे)

 

सध्या उपचाराखाली असणारे – २१ रूग्ण

 

मयत २ रूग्ण

…….

 

आज-यात आज व उद्या उरूस...

आजरा येथील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या हजरत दावल मलिकसो यांच्या उरुसाचे आज बुधवार दिनांक ९ व गुरुवार दिनांक १० रोजी आयोजन करण्यात आले आहे.

.                          ……..

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

ऊस ट्रॅक्टर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला बेलेवाडी घाटातील प्रकार

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास परिषद संपन्न…. भाजपाची मंगळवारी आजऱ्यात बैठक…उचंगी प्रकल्पस्थळी मंगळवारी धरणग्रस्त लढा परिषद

mrityunjay mahanews

तीन लाखांच्या ऐवजासह बॅग परत… ‘मृत्युंजय महान्यूज’ इफेक्ट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BIG BREAKING

mrityunjay mahanews
error: Content is protected !!