mrityunjaymahanews
अन्य

मोटर सायकलवरच हृदयविकाराचा झटका… आज-यातील एकाचा मृत्यू…  

मोटर सायकलवरच हृदयविकाराचा झटका… आज-यातील एकाचा मृत्यू…

वाडा गल्ली, आजरा येथील कुद्दुस अली चांद (वय ४६ वर्षे) यांचा आज सकाळी मोटरसायकल चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. कुद्दुस हे ब्रोकर द्वारे इलेक्ट्रिक पोलचे खड्डे मारून खेडे येथून येत होते. मोटरसायकल चालवत असतानाच मोटरसायकलवरच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते मोटर सायकलवरून खाली कोसळले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुली पत्नी, मुलगा असा परिवार असून येथील सामाजिक कार्यकर्ते व जेसीपी व्यवसायिक जुबेर चांद त्यांचे ते धाकटे बंधू होत. त्यांच्या या दुर्दैवी निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

…..

 

‘अंजूमनचा’वाद विकोपाला… बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने केली शिक्षक भरती… झाकीर हुसेन हायस्कूलबाबत
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार.

आजरा येथील अंजुमन इत्‍तेहादुल संस्थेचा वाद विकोपाला गेला असून डॉ. झाकिर हुसेन अँग्लो ऊर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक जमशेद जमादार यांनी बोगस कागदपत्रे तयार करून ती शिक्षण विभागाकडे सादर करून शिक्षक मान्यता मिळवली आहे, असा आरोप करत या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी शिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. सध्या या संस्थेवर शासकीय रिसिवर म्हणून नायब तहसीलदार डी.डी. कोळी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या तक्रारीमुळे मुख्याध्यापकांसह अनेक शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

आजरा येथील रियाज तकिलदार आणि अब्दूलमजिद पठाण यांनी याबाबत स्वतंत्रपणे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. १९५२ साली ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. २००४ नंतर या संस्थेवर एकही विश्वस्त नसून तसा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आहे. असे असताना संस्थेत शिक्षक भरती करण्यात आली आहे. या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मुख्याध्यापक जमादार यांना म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिक्षक मान्यतेसाठी बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत मुख्याध्यापक जमादार यांच्यावर कारवाईची मागणी यात आली आहे. एकंदर मुस्लिम समाजाच्या या महत्त्वाच्या संस्थेमध्ये उफाळून आलेला संस्थेवरील वर्चस्वाचा वाद संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कर्मचारी वर्गास शेकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत

……

 

कायदेशीर पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम नाही…

उचंगी प्रकल्पग्रस्तांचा मोर्चादवारे इशारा

प्रशासनाने पुनर्वसन कायद्याचे पालन करावे. कायदेशीर बाबीनुसार पुनर्वसन करावे. अन्यथा धरणाचे काम करू देणार नाही असा इशारा उचंगी प्रकल्पग्रस्तांनी आज प्रशासनाला दिला. पुनर्वसनाची खोटी कागदपत्रे करून धरणग्रस्तांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आजरा तहसीलदार कार्यालयावर महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार विकास अहिर उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत का, संजय तर्डेकर म्हणाले, पुनर्वसन कायदयानुसार २००९ ला अद्यावत संकलन रजिष्टर तयार करण्यात आले होते. त्यानुसार १२० प्रकल्पग्रस्ताना जमिनीचे वाटप करण्यात आले. पुनर्वसन कायद्यानुसार प्रक्रिय झाल्याने प्रकल्पग्रस्त समाधानी होते. पण त्यानंतर २०१३ नवीन संकलन रजिष्टर करण्यात आले. पूर्वीचे संकलन रजिष्टर खोटे असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी नवीन संकलनानुसार पुनर्वसनाला सुरवात केली. एक प्रकारे प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे. पूर्वीच्या संकलनावर तत्कालीन उपजिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या सहया असतांना ते खोटे कसे हा प्रश्न आम्हाल पडला आहे. जे अधिकारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी आमची मागणी आहे. याबाबत चितळे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर गान्हाणे मांडण्यातबब आले. पण त्यांनी खातेनिहाय चौकशीचे देणार असल्याचे सांगीतले. हे आम्हाला मान्य नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचा संघर्ष चालू ठेवणार आहे. पुनर्वसनाबाबत जिल्हा प्रशासन ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत घळ भरणी व प्रकल्पाचे काम करू देणार नाही.


कॉ.जाधव म्हणाले, पुनर्वसनाचा कायदा सरकारनेच केला आहे. त्याला प्रशासन हरताळ फासत आहे. हा प्रकल्पग्रस्तांच्यावर अन्याय आहे. लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत. त्यांना निवडणुकीत किंमत मोजावी लागेल. जिल्हाधिकारी पदाचा वापर करून खोटी कागदपत्रे तयार करून जमिन हस्तांतरण व फसवणूक केल्याची तक्रार नोंद करून घ्यावी. चाफवडेचे उपसरपंच संजय भडांगे, मारुती चव्हाण, प्रकाश मस्कर, धनाजी दळवी प्रकाश मनकेकर, दत्तात्रय बापट, पांडुरंग धनूकटेकर, यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.

भादवणमध्ये  अर्जुन अबिटकर यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

 

भादवण येथे कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पतसंस्था गटातून विजयी झालेले नुतन संचालक श्री . अर्जुन आबिटकर यांचा शिवसेना शाखा भादवणच्या वतीने  करण्यात आला .  यावेळी प्रा. आबिटकर म्हणाले , शेतक -यांना जिल्हा बँकेतून मोठ्या प्रमाणात उदयोगधंद्यासाठी कर्जपुरवठा होऊ शकतो हे आतापर्यंत कोणीही संगितले नाही. ह्या सर्व सुविधा लोकाना आम्ही सांगू व त्यांना अर्थिक दृष्ट्या प्रबळ होण्यास सहकार्य करू . तर सरपंच संजय पाटील यांनी गावातील विकास कामाबद्दल जर कोणी ही कामे आमच्या वेळेची आहेत असे म्हणत असल्यास ती कामे आम्ही गावच्या विकासासाठी कशी व कोणाकोणास भेटून आणली आहेत ते योग्य वेळ आल्यास सर्व ग्रामस्थाना नक्की सांगू असे  स्पष्ट केले .  कार्यक्रमास शिवसेना शाखा भादवणचे सर्वपदाधिकारी , शिवसेनेचे तालूका प्रमुख राज सावंत ,तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी कुंभार, माजी उपसरपंच दयानंद पाटील, सध्याचे उपसरपंच बाळासाहेब कुंभार, आर. बी . पाटील, अतुल पाटील, रणजीत गाडे, पि . के . केसरकर, कारखाना माजी संचालक मारुती देसाई, ज्ञानदेव पाटील, दत्ता जाधव तसेच शिवसेना शाखा पेद्रेवाडीचे शाखाप्रमुख आनिल डोंगरे हे उपस्थित होते .

 

आजरा तालुका कोरोना अपडेट्स…

दिनांक ९.२.२०२२.. आजरा व होन्याळी येथील २ बाधित

सध्या उपचारा खाली असणारे १२ रूग्ण

मयत २ रुग्ण

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आल्याचीवाडी येथे मारहाणीत एक जखमी… देवर्डे येथे हत्तीकडून नुकसान… रामतीर्थयात्रा आजपासून सुरू.. एस.टी.सुविधा नाहीच..

mrityunjay mahanews

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!