mrityunjaymahanews
अन्य

प्रकाशदादा गेले…. ‘अर्बन ‘ परिवारात शोककळा..

 

प्रकाश वाटवे यांचे निधन

आजरा अर्बन बँकेचे संचालक प्रकाश गुंडोपंत वाटवे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.हसतमुख व हरहुन्नरी स्वभावाचे वाटवेदादा  यांचे शहरवासीयांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कवी मनाचे दादा निघून गेल्याने अर्बन परिवारावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई नातवंडे असा परिवार असून गुरुवारी सकाळी दहा वाजता आजरा येथील वडाचा गोंड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

कायदेशीर सल्लागार नेमणूकीवरून आजरा नगरपंचायतीचे अधिकारी धारेवर

वारंवार सूचना करूनही आजरा नगरपंचायतीकडे नगरसेवकांना विश्वासात न घेता कायदेशीर सल्लागार नेमण्यावरून आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरले. सूचना करूनही अधिकारी परस्पर निर्णय घेत असतील तर केवळ आमचा अपमानच करायचा असे ठरवले आहे का ? असा संतप्त सवाल यावेळी सभागृहातील ज्येष्ठ नेते नगरसेवक अशोकअण्णा चराटी यांनी उपस्थित केला. आजरा नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

उपस्थितांचे स्वागत संजय यादव यांनी केल्यानंतर सुरुवातीलाच कायदेशीर सल्लागार नेमणुकीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सभागृहाचा ठराव नसताना नवीन कायदेशीर सल्लागाराची नेमणूक केली कशी ? या नियुक्तीला आपला विरोध राहणारच असे अशोक चराटी यांनी स्पष्ट केले. तर सदर कायदेशीर सल्लागार नेमणूक रद्द करावी अशी मागणी नगरसेवक विलास नाईक यांनी केली. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध कामाचे प्रस्ताव सादर करण्याचे सूचना करण्यात आल्या १५ व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापन इमारत उभी करण्यात आली आहे. परंतु अद्याप यामध्ये मशिनरी नाही ही मशिनरी बसणार कधी असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. तर साई कॉलनी येथील गटर्स स्वच्छ नसल्यामुळे आजूबाजूच्या घरामध्ये पाणी जात असल्याचे नगरसेविका यास्मिन बुड्डेखान यांनी उपस्थित केला. वारंवार मागणी करूनही स्वच्छता होत नसेल तर मागणी करण्याला काही अर्थ आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सभेमध्ये विविध विकास कामांच्या पूर्ततेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते ठराव तातडीने करून घ्या त्यास आपला कोणताही विरोध राहणार नाही असे नगरसेवकांनी स्पष्ट केले . स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवण्यासाठी मंजूर कामाची कागदपत्रे तातडीने द्यावी असेही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

नगरपंचायतीकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करता येईल का याबाबत आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. शक्य असल्यास त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे अशीही सुचवण्यात आले. पावसाळ्यापूर्वी शहरातील घटस्वच्छतेसह रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवावेत असे नगरसेवकांनी सांगितले.

सभेमध्ये नगरसेवकांच्या वतीने गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी ज्येष्ठ नगरसेवक अशोकअण्णा चराटी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये नगरसेवक आनंदा कुंभार, सुमैय्या खेडेकर, किरण कांबळे, सिकंदर दरवाजकर, आदींनी भाग घेतला. बैठकीस नगरसेविका शकुंतला सलामवाडे, अनिरुद्ध केसरकर, सीमा पोवार, रेश्मा सोनेखान,सौ. संजीवनी सावंत, यासीराबी लमतुरे आदींसह मुख्याधिकारी सुरज सुर्वे व अधिकारी उपस्थित होते.

चारचाकीच्या अपघातात जवानाचा मृत्यू

आजरा-नेसरी मार्गावर किणे गावानजिक बुधवारी दुपारी चारचाकी वरील ताबा सुटून गाडी झाडावर आढळल्याने चालक मसनु धोंडीबा मजगुतकर वय (३२ वर्षे) रा. तावरेवाडी, ता. गडहिंग्लज यांचा मृत्यू झाला.

नात्यातील विवाह सोहळ्यानिमित्त मनगुतकर हे आजरा येथे आले होते. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत आजरा पोलिसात झालेली नव्हती.

अनिकेत कवळेकर यांची नवीद मुश्रिफ यांनी घेतली सदिच्छा भेट

आमदार हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर यांची मडीलगे येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांनी आजरा साखर कारखाना निवडणुकीसह तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या घडामोडींचा आढावा कवळेकर यांचे कडून घेतला. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पूर्ण ताकतीनशी सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी कवळेकर यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तलाठ्याच्या प्रतापांची तक्रार थेट आयुक्तांकडे…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक धुमशान सुरू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!