



मोटरसायकल अपघातात महिला ठार
देवकांडगाव जवळील घटना

आजरा-गारगोटी मार्गावर देवकांडगाव हद्दीत पायलशेत नावाच्या शेताजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी वरील सौ. शोभा संजू चव्हाण रा. समुद्रवाणी, ता. जिल्हा उस्मानाबाद यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संजू शिवा चव्हाण आजरा येथे दुचाकीवरून येत होते दरम्यान वळणावरील घसरतीला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटून पाठीमागे बसलेल्या शोभा या खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
याबाबतची फिर्याद दिगंबर किसनराव साळुंखे यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस नाईक चेतन घाटगे करीत आहेत.






