

भाविकांचा मेळा
हाळोली येथे मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यात उत्साहात सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हाळोली येथील श्री शंकर लिंग देव मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यास काल गुरुवार दिनांक २ मे पासून उत्साहात सुरुवात झाली असून आज शुक्रवारी उर्वरित धार्मिक कार्यक्रमांसह दुपारी १.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी सकाळी कलश नंदीसह मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अतिशय भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर माहेरवाशीयांचा गारवा, घागरींचे पूजन करण्यात आले. स्थानिक व बाहेरून आलेल्या महिलांचे हळदीकुंकू व ओटी भरण्याचा कार्यक्रमही पार पडला. मिरवणुकीमध्ये मेढेवाडी व शेळप येथील भजनी मंडळ सहभागी झाले होते.
त्यानंतर प्रायश्चित्त,गणेश पूजन, पुण्याहवाचन, स्थलशुद्धी, शांतीहोम, देवता स्थापना, नवग्रह स्थापना, होम हवन व आरतीचा कार्यक्रम पार पडला.

ह.भ. प. सौ. वनिताताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
आज शुक्रवारी देवता पूजन, मुख्य देवता पूजन, नंदी स्थापना, प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण, नैवेद्य, पूर्णाहुती, अभिषेक, पूजा, गा-हाणे, इत्यादी कार्यक्रम होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी देवस्थान व्यवस्थापन कमिटी उपसमिती हाळोलीचे अध्यक्ष दशरथ अमृते, उपाध्यक्ष गोविंद केरकर, सचिव बंडोपंत बांदेकर, दयानंद गोवेकर, सखाराम बांदेकर,भिकाजी गुरव, सुरेश तावडे, हरिबा सुतार, राजाराम केरकर ,दिगंबर धुरी, संदेश सुतार, रामदास गुरव, जानबा तावडे, सुरेश पाटकर, पांडुरंग धुरी, डॉ गोविंदराव पोवार, महादेव गुरव, गोविंद कापडुस्कर, ते सहदेव गुरव, आनंदा कांबळे, जितेंद्र सुतार यांच्यासह ग्रामस्थ मंडळ हाळोली/ मुंबई, ग्रामस्थ मंडळ दर्डेवाडी/ मुंबई चे सदस्य व हाळोली पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेडे येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे येथे शनिवार दि. ४ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंडळ खेडे-मुंबई व कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंडळ खेडे – मुंबई चे अध्यक्ष दयानंद पालकर, सेक्रेटरी शिवाजी सावरतकर, खजिनदार रवींद्र पालकर यांनी दिली.
खेडे प्राथमिक विद्यामंदिरानजीक असलेल्या रेणुका निवास येथे हे शिबीर होणार आहे. या शिबीरात पोटविकार, मूत्र विकार, हाडांचे विकार, मुतखडा, त्वचारोग यासह विविध आजारावर उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबीरात तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येणार असून रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामविकास मंडळ खेडे- मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शाश्वत विकासासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्या : समरजिसिंह घाटगे

उत्तूर : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा
शेतकरी,युवक,महिलांसह सर्वसामान्यांच्या शाश्वत विकासाच्या गॅरंटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते समरजिसिंह घाटगे यांनी केले.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भादवण,भादवणवाडी,जाधेवाडी, होन्याळी,हालेवाडी, खोराटवाडी,मासेवाडी (ता.आजरा) येथे भाजपच्या बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या.त्यांनी महिलांच्या हाताला काम देण्यासह त्यांचा आत्मसन्मान वाढवणारे निर्णय घेतले. तरुणांना नोकऱ्यांसह उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या तर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले.हमीभावासह पीएम किसान सन्मान निधीसारख्या अनेक योजना राबविल्या. हा विकासाचा आलेख चढता राहण्यासाठी माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
मासेवाडी येथे सुदाम सावर्डे,नामदेव खोत, भादवणवाडी येथे संजय चौगुले,जाधेवाडी येथे,खोराटवाडी येथे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शैलेश मुळीक,रोहन बारदेसकर, टी.बी.मुळीक ,सखाराम डोंगरे,संभाजी हाळवणकर ,दत्तात्रय डोंगरे,(भादवण) उद्योजक शरद पाटील,गोविंद बिरंबोळे,महादेव खाडे,विनायक पाटीला(होन्याळी ),राजाराम पाटील,गणपती चौगुले, दिलीप फळणेकर (भादवणवाडी),सुरेश परीट नामदेव खोत, एकनाथ पाटील, तानाजी सावंत, सदाशिव सुतार (मासेवाडी),दत्तात्रय सावंत ,(जाधेवाडी),अनिल खोराटे, यशवंत खोराटे,दीपक देसाई राजाराम आजगेकर बंडोपंत खोराटे (खोराटेवाडी)आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आजऱ्याच्या पश्चिम भागात इंडिया आघाडीच्या गाठीभेटी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आज आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील वाड्यावस्तीवर कार्यकर्त्यांनी मतदारांच्या थेट भेटीवर भर देण्याचे धोरण घेतले आहे. गेले दोन महिने गावबैठकांच्या दोन प्रचारफेऱ्या झाल्या. तालुक्यातील उतूर, पेरणोली, गवसे, पोळगाव, वाटंगी, मलिग्रे या गावात शाहू महाराजांच्या उपस्थितीत सहा मेळावे घेतले. त्यांनंतर आजरा येथे आम. भास्कर जाधव, सतेज उर्फ बंटी पाटील, शाहू महाराज यांच्या उपस्थितीत मोठी सभाही झाली. तत्पूर्वी संविधान यात्रेच्या निमित्ताने आजरा तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित दौराही सर्व घटक पक्षांसह केली होती.
कोल्हापूरच्या सभेनंतर चार्ज झालेल्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून साळगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडी, दांभिल, शेळप, खेडगे, पारपोली, किटवडे, आंबडे, लिंगवाडी, घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान, गवसे असा आज मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीचा दौरा आज पूर्ण केला.
या दौऱ्यात मुकुंददादा देसाई, कॉ. संपत देसाई, उदय पवार, राजेंद्र सावंत, संकेत सावंत, कृष्णा सावंत, मारुती पाटील, सचिन देसाई, दत्ता कांबळे, संतोष पाटील, हरिबा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सामील झाले होते.

महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार दौरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आजरा तालुक्यातील हाळोली, किटवडे, लिंगवाडी, अंबाडे आदी गावांना भेटी देत मतदारांशी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला.
बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी मतदारांनी रहावे असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना केले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी श्री. काकासो देसाई, श्री. इंद्रजित देसाई, श्री. विजयभाऊ थोरवत, श्री. संतोष भाटले, श्री सुनील दिवेकर, श्री मारुती डोंगरे, लहू पाटील , श्री. युवराज पाटील व श्री. जितेंद्र भोसले आधी कार्यकर्ते या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.



