बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४



महायुती की महाविकास आघाडी…? धर्मसंकट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दोन अडीच वर्षे राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथींचे परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना भूमिका घेण्यात अडचणीचे ठरू लागले असून अनेक कार्यकर्त्यांची अवस्था विचित्र झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई यांची अवस्थाही फारशी वेगळी नाही. एकीकडे राधानगरी मतदारसंघातील मुकुंदराव देसाई,जयवंतराव शिंपी,अशोकअण्णा चराटी,संभाजीराव पाटील यांच्या भूमिका स्पष्ट होत असतानाच मतदारसंघात महायुती धर्म पाळून महायुतीच्या उमेदवारांसोबत राहायचे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराने केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचे अशा विचित्र धर्म संकटात ते सध्या सापडलेले दिसतात.
सुधीर देसाई यांची जडणघडण ही मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के.पी. पाटील यांच्या पाठबळावर झाली आहे. तालुका खरेदी विक्री संघ, आजरा साखर कारखाना, जिल्हा बँक या महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये हे दोघेही भक्कमपणे देसाई यांच्या पाठीशी राहिले आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर देसाई यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली. मुळातच राष्ट्रवादीतील ही फुट स्थानिक कार्यकर्त्यांना रुचली नसल्याने राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते गटाचे लेबल बाजूला ठेवून एकसंघपणे काम करताना विधानसभा निवडणुकीपूर्वी दिसत होते. पण विधानसभा निवडणुकीत मात्र नेते मंडळीच परस्परविरोधी आघाडीतून रिंगणात असल्याने कार्यकर्त्यांची अवस्था विचित्र झाली आहे. दोन्ही दरडीवर पाय ठेवून भूमिका घेणे या निवडणुकीत केवळ अशक्य आहे. सध्या देसाई हे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये असल्याने त्यांना महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत राहावे लागणार आहे. परंतु आबिटकर यांच्या विरोधात के.पी. पाटील हे असल्याने के. पी.पाटलांपासून बाजूला होण्याच्या मानसिकतेत देसाई दिसत नाहीत.
अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षाची असणारी तालुकाध्यक्ष पदाची धुरा ही देसाई यांच्यासमोरील फार मोठी अडचण आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्यासोबत राहायचे असेल तर पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नाही. एकंदर ते या पदाचा राजीनामा देऊन के.पी. पाटील यांना मदत करणार की महायुती धर्म पाळून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सोबत राहणार ? या प्रश्नाच्या उत्तराकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.

कासार कांडगाव येथे हत्तीचा धुडगूस
ऊस पिकासह शेती उपयुक्त साहित्याचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कासारकांडगाव ता. आजरा येथे हत्तीने धुमाकूळ घालत शिरमा यशवंत कांबळे यांच्या ऊस पिकासह पाण्याच्या टाकीचे मोठे नुकसान केले आहे.
जिरंग नावाच्या शेतामध्ये बाजीराव कांबळे, शामराव तुकाराम यादव आदींची ऊस व भात पिके आहेत. सध्या भात पिकांची सुगी सुरू असतानाच हत्तीने शेती पिकांमध्ये प्रवेश केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.


‘ पार्वती-शंकर ‘मधील ‘ चतुरंग ‘बुद्धिबळ स्पर्धांना प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता.आजरा येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट व पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या संकुलात ९ व्या वर्षी ” चतुरंग २०२४” या बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत चुरशीने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
या जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धामध्ये एकूण १२१ स्पर्धक सहभागी झाले. १४ वर्षाखालील गटात ७ फेऱ्यांमध्ये १५६ सामने; तर १७ वर्षाखालील गटात ७ फेऱ्यांमध्ये ५२ सामने असे एकूण २०८ सामने पार पडले. .
यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे,गौरवचिन्हे, प्रशस्तीपत्रे , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वी स्पर्धक असे-
१४ वर्षाखालील गट-
प्रथम- अथर्व अमृत तावरे , तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, इचलकरंजी ; द्वितीय- कु. अन्नपूर्णा रमेश मगदूम – न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ ,ता. गडहिंग्लज; तृतीय – हर्षल सतीश बामणे – सिम्बॉयसिस स्कूल, हरळी बुद्रुक ,ता. गडहिंग्लज
१७ वर्षाखालील गट-
प्रथम- स्वरूप राजाराम साळवी -वि. दि. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज ; द्वितीय- समर्थ गणेश पाटील- गडहिंग्लज हायस्कूल, गडहिंग्लज ; तृतीय – गौरांग अनिल शिवगण- जागृती हायस्कूल , गडहिंग्लज

गतवर्षी रस्ता केला यावर्षी बाद झाला…
कासारकांडगाव- चितळे रस्त्यावर खडीचे साम्राज्य

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कासार कांडगाव पासून चितळे मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र खडीचे साम्राज्य पसरले असून गतवर्षी केलेल्या या रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारकातून संताप व्यक्त होत आहे.
गेल्याच वर्षी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्याही लाल माती घालून बुजवण्यात आल्या आहेत. हा रस्ता अपूर्ण आहे की केलेला रस्ता बाद झाला आहे असा प्रश्न पडण्याजोगी रस्त्याची स्थिती दिसत आहे.
साईड पट्ट्या मुजवण्यासाठी टाकलेली लालमाती सध्या पावसाच्या वारंवार हजेरीने चिखलात रूपांतरित होऊन वाहनधारकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याच्या या दुर्दशाला जबाबदार कोण ? असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



