mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दिनांक २९ ऑक्टोबर २०२४

आता शिंपी गट, के. पी. पाटील एकत्र येणार…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      राधानगरीसह कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी बेरजेच्या राजकारणास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. मंत्री मुश्रीफ व अशोकअण्णा चराटी एकत्र आल्यानंतर आता माजी आमदार के. पी. पाटील व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असून याबाबत नुकतीच बैठकही पार पडली असल्याचे समजते.

      जयवंतराव शिंपी हे तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गटाचे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अस्तित्व आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये के.पी. व शिंपी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. दोघांमध्ये आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिष्टाई केली असून विधानसभा निवडणुकीत शिंपी यांची समजूत घालून त्यांच्या गटाचा के.पी.पाटील यांना पाठिंबा मिळवून देण्यात यशस्वी झाले असल्याचे समजते.

      याबाबतचे चित्र आज मंगळवारी स्पष्ट होईल.

विधानसभेसाठी जिल्ह्यात शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघात सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी एकूण ६२ उमेदवारांचे ८६ उमेदवारी अर्ज दाखल; हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, विनय कोरे, नंदिनी बाभुळकर कुपेकर, अप्पी पाटील, प्रकाश आबिटकर, शिवाजीराव पाटील, ए. वाय. पाटील, मानसिंग खोराटे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात १० जागांसाठी एकुण १३६ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

     चंदगड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवारांनी २० नामनिर्देशनपत्रे, राधानगरी विधानसभा मतदारसंघात ४ उमेदवारांनी ६ नामनिर्देशनपत्रे तर कागल विधानसभा मतदारसंघात ४ उमेदवारांनी ९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

जिल्ह्यातील इतर मतदारसंघांची अवस्था पुढील प्रमाणे…

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवाराने ७ नामनिर्देशनपत्र,

करवीर विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशनपत्र,

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६ उमेदवारांनी ९ नामनिर्देशनपत्र,

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवारांनी ९ नामनिर्देशनपत्र,

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात ९ उमेदवाराने १० नामनिर्देशनपत्र,

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी ७ नामनिर्देशनपत्र,

शिरोळ विधानसभा मतदारसंघात ६ उमेदवारांनी ६ नामनिर्देशनपत्र दाखल केली.

चंदगड विधानसभा मतदारसंघ काल दाखल नामनिर्देशन पत्रे

१. गोपाळराव मारुतराव पाटील, अपक्ष

२. नंदिनी बाभुळकर कुपेकर, राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार)

३. आण्णासाहेब उर्फ श्रीशैल विनायक पाटील, अपक्ष

४. शिवाजी शातप्पा पाटील. अपक्ष

५. अप्पी उर्फ विनायक गोविंदराव पाटील, अपक्ष

६. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष

७. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष

८. सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

९. सुश्मिता राजेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१०. राजेश. नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

११. राजेश नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१२. नंदिनी बाभुळकर कुपेकर, राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार)

१३. आकाश एकनाथ डवरी, अपक्ष

१४. मनीषा मानसिंग खोराटे, अपक्ष

१५. मनीषा मानसिंग खोराटे, अपक्ष

१६. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष

१७. मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष

१८. सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१९. सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

२०. श्रीकांत अर्जुन कांबळे, बहुजन समाज पार्टी

राधानगरी विधानसभा मतदारसंघ

१. आबिटकर प्रकाश आनंदराव, शिवसेना

२. आबिटकर प्रकाश आनंदराव, शिवसेना

३. रणजितसिंग कृष्णराव पाटील, अपक्ष
४. राजेंद्र यशवंत उर्फ आर वाय पाटील, अपक्ष

५. आनंदराव यशवंत उर्फ ए वाय पाटील, अपक्ष

६. आनंदराव यशवंत उर्फ ए. वाय. पाटील, अपक्ष

कागल विधानसभा मतदारसंघ

१. अजित भारत निकम, अपक्ष

२. अश्विन अर्जुन भुजंग, अपक्ष

३. हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

४. हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

५. हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी

६. नावीद हसन मुश्रीफ, अपक्ष

७. नावीद हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी

८. नावीद हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी

बहुतांशी उमेदवारांनी काल जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

राजेंद्रसिंह सावंत यांचा उबाठा गटाच्या पदाला जय महाराष्ट्र…?

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     गेली ३५ वर्षे  शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक त्यानंतर विभाग प्रमुख, उपतालुकाप्रमुख व तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिलेले आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्रसिंह सावंत यांनी शिवसेना ( उबाठा) मधील आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्याकडे दिला आहे.

      पक्षाचे काम करताना घरावर तुळशीपत्र ठेवून प्रामाणिकपणे काम केले पण सध्या वरीष्ठ कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता कामे करत आहेत. आम्हाला विश्वासात न घेता आमच्या पदाधिकारी यांना अचानकपणे पदावरून कमी करण्यासारखे घृणास्पद प्रकार चालू असून सतत शिवसैनिकांवरती अन्याय होत आहे. नवीन आलेल्या लोकांना पायघड्‌या घातल्या जात आहेत व जुन्या शिवसैनिकांना डावलण्यात येत आहे.. जुने शिवसैनिक फक्त सतरंज्या उचलण्यापूर्वी शिल्लक ठेवले आहेत.या प्रकाराला आता सर्व शिवसैनिक व आम्ही कंटाळलो असून मी माझ्या मला सध्या दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजरा तालुका संघटक या पदाचा राजीनामा देत आहे असे या पत्रात म्हटले आहे.

दिवाळीसाठी बाजारपेठ सजली


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून बाजारपेठेत मोठी गर्दी दिसू लागली आहे.

      दिवाळीसाठी आकर्षक आकाश कंदील, रांगोळ्या, सजावटीचे साहित्य फळे, फुले, विद्युत रोषणाई आतषबाजीचे साहित्य, कपडे खरेदी करण्याकरता विशेषत: महिला वर्ग बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने दिसत आहे.

           लाडक्या बहिणी फॉर्मात…

      दिवाळीपूर्वीच शासनाकडून लाडकी बहिण योजने अंतर्गत घसघशीत रकमा पदरात पडल्याने महिला वर्ग बाजारपेठेत मोठ्या संख्येने दिसत आहे.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लक्ष्मीपूजन पडले चोरट्यांच्या पथ्यावर…

mrityunjay mahanews

प्रा.सुनिल शिंत्रे…एक दिलदार व्यक्तिमत्व

mrityunjay mahanews

उत्तूर – मुमेवाडी जवळ विचित्र  अपघात एक जण जागीच ठार !२५जखमी…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!