
पेरणोलीत गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

पेरणोली तालुका आजरा येथील शालन विष्णू दारुडकर (वय ४९,रा.पेरणोली) या महिलेवर गव्याने हल्ला केल्याने ही महिला जखमी झाली आहे.
शालन यांच्यासह सात-आठ महिला शिवार नावाच्या शेतात ऊस भांगलणसाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास गेल्या होत्या. अचानक नदी पात्राशेजरून गव्याचा कळप शेतात आला. यावेळी शालन यांना एका गव्याने जोराची धडक दिल्यामुळे त्यांच्या तोंडाला मार बसून त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उपचारा दरम्यान वनाधिकारी स्मिता डाके व बालेश न्हावी यांनी भेट देऊन जखमीची चौकशी केली.

जमिनीच्या वाटणीवरुन मारामारी,
७ जणांवर गुन्हे दाखल
बुरुडे (ता.आजरा) येथे जमिनीच्या वाटणी वरुन दोन कुटुंबात मारामारी झाली आहे आजरा पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आबूतालीब चाॅंद व इक्बाल चाॅंद यांच्या मध्ये जमिनीवरुन वाद आहे.१० जुन रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास याच कारणावरून वाद झाला.बुरुडे शेतातील गट नं. १९५ मध्ये जमीनीत माझी वाटणी आहे. मला त्यातील वाटणी पाहिजे तुम्ही जर वाटणी नाही दिला तर तुला व तुझ्या बापास सोडणार नाही असे म्हणून इक्बाल चाॅंद याने फोन करुन आपली मुले व नातेवाईक सादिक इक्बाल चाॅंद, जावेद इक्बाल चाॅंद वसीम इक्बाल चाॅंद, हजरअली अब्दुल मुल्ला, गौस अब्दुल मुल्ला, अलमास इक्बाल चाॅंद यांना बोलावून शिवीगाळी करु लागले. यावेळी हजरत अली अब्दुल मुल्ला याने आबूतालीब यांच्या उजव्या खांद्यावर काठीने मारले. गौस अब्दुल मुल्ला याने पोटावर काठीने मारले तर साजीद, जावेद, वसीम यांनी हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच इक्बाल व त्याची बायको अलमास यांनी दगडफेक केली. यामध्ये मुलगा इरफान हा देखील जखमी झाला आहे. आजरा पोलिसांनी याप्रकरणी ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

आजरा पोलीस ठाणेस नुतन पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांची सदिच्छा भेट व सी. सी. टिव्ही कॅमेरा शुभारंभ कार्यक्रम सपन्न

आजरा येथील नूतन पोलीस ठाणे इमारत व सी. सी. टिव्ही कॅमेरा शुंभारभ तसेच पोलीस ठाणेस भेट देवून पोलीस ठाणेकडील कामकाजाचा आढावा घेवून तसेच पोलीस ठाणे इमारत पाहणी केली. याप्रसंगी आजरा शहरामध्ये आजरा पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल हारूगडे यांनी आजरा शहरामध्ये होणा-या चो-या तसेच मुलीची होणारी छेडछाडी, तसेच गुन्हेगारावरती आळा बसण्यासाठी सी.सी. टि व्ही कॅमेरे बसविण्यासाठी आजरा शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी,बँक, पत संस्था उद्योदक यांची बैठक घेवून सी. सी. टिव्ही कॅमेरे बसविणे का आवशक आहे तसेच पोलीसांविषयी लोकांची विश्वासार्हता वाढेल वा चांगल्या कार्यास प्रेरणा मिळेल सर्व घटनांचे चतुः रस निरीक्षण करणे सोपे होईल याबाबत मार्गदर्शन केलेनंतर वरील लोकांनी त्यास चांगला प्रतिसाद देवून स्वखुशीने लोकवर्गणी दिली. त्यानुसार पुर्ण आजरा शहरातील रहदारीच्या मुख्य ठिकाणी सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले होते. त्यावेळी उपस्थित लोक प्रतिनिधी व नागरिकांनी आजरा शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आजरा पोलीसांनी १० लाखाच्या दरोडयातील आरोपी तात्काळ अटक केलबाबत त्यांचे कौतुक केले. अशा घटना घडु नयेत म्हणून सी. सी. टिव्ही कॅमेरे पॅर्टन राबविण्यात आला त्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा श्री. महेंद्र पंडित मा. पोलीस अधीक्षक , कोल्हापूर, श्री. निकेश खाटमोडे ,अपर पोलीस अधिक्षक , श्री. राजीव नवले ,उपविभागीय पोलीस अधिकारी , गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
यावेळी पंडित यांनी कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, मजकुर, व्हिडिओ सादर करून समाजामध्ये वेगवेगळया धर्मांमध्ये तेढ निर्माण करणा-या लोकांचे विरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, सर्व नगरसेवक, जितेंद्र टोपले, सुभाष नलवडे, राजु पोतनीस, दिलावर चाँद, सह आजरा शहरातील नागरीक उपस्थित होते.
आभार श्री.राजीव नवले यांनी मानले.

निधन वार्ता ….
राधा नार्वेकर

आजरा येथील श्रीमती राधा मुरलीधर नार्वेकर(वय ७८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, मुलगा ,सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे. स्थानिक औषध विक्रेते सुरज नार्वेकर यांच्या त्या मातोश्री होत.



