

महीलांवरील अत्याचार रोखण्यास पोलीस प्रशासन सज्ज :सुनिल हारुगडे
भादवण येथे पोलीसांचा सत्कार व घटनेचा निषेध

आजरा: प्रतिनिधी
भादवण येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. महीलांवर होणारे अत्याचार हा चिंतेचा विषय आहे. एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे त्याची फळे सर्व समाजाला भोगावी लागतात. महीलावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी नागरीकांना पूढे यावे व तक्रारी द्याव्यात. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. असे प्रतिपादन आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी केले.
भादवण येथे घडलेल्या घटनेचा तातडीने तपास करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाल्याबद्दल नागरीकांच्यावतीने पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच माधुरी गाडे, उपसरपंच संजय पाटील प्रमुख उपस्थित होते. या सर्व प्रकरणाचा ग्रामस्थांच्यावतीने निषेध करण्यात आला.

श्री. हारुगडे म्हणाले, अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे महीलांच्यावर अन्याय, अत्याचार होत असल्यास त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. ग्रामस्थांनीही वेळीच अशा बाबी निदर्शनास आणून दिल्यास अशा घटना टाळणे शक्य आहे. या पूढे अशा घटना घडू नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाशी निगडीत निर्भया पथकाच्यावतीने योग्य ते प्रयत्न केले जातील. सरपंच सौ. गाडे म्हणाल्या, मार्गशिर्ष महीन्यातील गुरुवारी घडलेली ही घटना निश्चितच घृणास्पद आणि माणूसकीला काळिमा फासणारी आहे. या निषेध करावा तेवढा थोडा आहे. माता भगिनीनी खचून न जाता तक्रारीसाठी पुढे यावे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत. या वेळी हारुगडे यांच्यासह तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. प्राचार्य रणजित गाडे, सेवा सोसायटी संस्थेचे अध्यक्ष पी. के. केसरकर यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी कुंभार मारुती देसाई गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुंभार, बाळकृष्ण स्तार, प्रमोद घाटगे, संगिता देसाई, अश्विनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर खुळे, पोलिस पाटील गीता हरिबा कुंभार, माजी सरपंच भिवा जाधव, श्रीमती बेबीताई लोहार, सुजाता विजय खुळे, बाळासाहेब कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.



अखेर कारखाना प्रशासनाचा खुलासा…
कर्मचारी निलंबित… खातेनिहाय चौकशी सुरू

आजरा : प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्याच्या साखरेच्या गोदामातून दहा मेट्रीक टन साखर गाडीत भरण्याचा परवाना असतांना दोन मे. टन अधिक साखर उचल केल्या प्रकरणी संबंधीत विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना कारखाना प्रशासनाने निलंबीत केले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यासह त्यांची खातेनिहाय चाकशी सुरु केल्याचा कारखाना प्रशासनाच्या वतीने खुलासा करण्यात आला आहे.
गेले दोन दिवस या प्रकरणाची आजरा तालुक्यात जोरदार चर्चा होती. कारखाना प्रशासनाने केलेल्या खुलाशानुसार कारखान्यातून दोन टन जादा साखर ट्रक मध्ये भरून सदर ट्रक गेटमधून बाहेर सोडण्यात आला. परंतु यातील काही चाणाक्ष कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर तातडीने कोल्हाप्रच्या दिशेन जाणारा ट्रक अडवून तो परत साखर कारखान्याकडे आणण्यात आला. सदर ट्रकमधील साखरेचे वजन केले असता दोन मे. टन साखर जादा भरल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी कारखाना व्यवस्थापनाने ट्रक ताब्यात घेवून यामधील दोषी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना निलंबीत केले असल्याचा खुलासा अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी केला आहे.
‘मृत्युंजय महान्यूज’चा दणका
मृत्युंजय महान्यूज ने सर्वप्रथम ही बातमी प्रसिद्ध करून तालुक्यात खळबळ उडवून दिली होती. सदर बातमीत तथ्य नाही असा दावा करणारी मंडळी मात्र प्रशासनाच्या या खुलाशानंतर उघडी पडली आहेत हे निश्चित.



सुधीर देसाई कारखाना व्यवस्थापक मंडळावर जिल्हा बँक प्रतिनिधी

आजरा: प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आजरा साखर कारखान्यावर जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून बँकेचे संचालक सुधीर देसाई यांची नियुक्ती केली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे यांनी तसे कारखान्याला लेखी कळवले आहे.



मनसे वाहतूक सेना आक्रमक

आजरा:प्रतिनिधी
आज दि. १/१/२०२४ रोजी आता ड्रायव्हर मंडळी संदर्भात जो नवीन नियम भाजप सरकारने काढला आहे . त्या विरोधात करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलन इशा-याचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात येणार आहे. तरी सर्व वाहन धारकांनी ठीक ११ वाजता आजरा तहसील कार्यालयासमोर जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे आहे.



आज शहरात…
११.३० वाजता तालुक्यातील मोटार पंप धारक शेतकऱ्यांची व्यापक बैठक.
ठिकाण- रवळनाथ मंदिराच्या माडीवर, आजरा.



.

